10/03/2024
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शोषणातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. महिलांना शिक्षण देणे, बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे, सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. एवढंच नाही तर अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी देखील त्यांनी महत्वाचं काम केले. त्या समाजसुधारक, समाजशिक्षिका तर होत्याच, पण कवयत्रीही होत्या. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्त त्यांच्या कार्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्रिवार वंदन..!
सुख-दु:ख काही
स्वार्थपणा नाही,
परहित पाही। तोच थोर!!
- सावित्रीबाई फुले