वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत

  • Home
  • India
  • Airoli
  • वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर

21/08/2026

स्मार्ट मीटर ग्राहकांच्या ग्राहकांच्या मर्जिविरुद्ध लावण्यात आले तर, ग्राहकांना घेऊन आम्ही स्मार्ट मीटर फोडून टाकू - वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या ऐरोली येथील घरी भेट...
21/08/2026

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या ऐरोली येथील घरी भेट दिली.

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या ऐरोली येथील घरी भेट दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष यांच्या जगताप कुटुंबाच्यावतीने युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांचे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी म्हटले की,"विचारांची प्रगल्भता आणि अथांग ऊर्जा असलेले युवा नेते सुजातदादा आंबेडकर आज आमच्या घरी स्नेहभोजनासाठी आले होते.एवढ्या मोठ्या आंबेडकर घराण्याचा वारसा असूनही त्यांचा साधापणा आणि आपुलकी मनाला स्पर्शून गेली. अगदी घरातील सदस्यासारखे बसून त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा आणि नव्या पिढीची जबाबदारी यावर त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सुजातदादा, तुम्ही आमच्या सर्वसामान्य कुटुंबाला दिलेला हा वेळ आणि दाखवलेला आपलेपणा आम्ही कधीच विसरणार नाही. धन्यवाद दादा! तुमच्या पुढील जनसेवेच्या प्रवासात आम्ही नेहमी सोबत आहोत." असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडी दिघा विभाग महासचिव अक्षय दावणे आणि महिला जिल्हाध्यक्षा शिल्पाताई रणदिवे यांचे चिरंजीव आयुष रणदिवे यांचा वाढदिवस सुद्धा सुजातदादा याच्या उपस्थितीत साजरा करण्यात आले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शिल्पाताई रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, महासचिव अजय शिंदे,उपाध्यक्ष दीपक बाणाईत,नमिताताई भालेराव,सुरेखाताई वानखेडे, कविताताई हिवाळे,संदेश हत्तरगे, संदीप वाघमारे,रामदास कांबळे,ऐरोली तालुकाध्यक्ष राजेश भालेराव, आकाश भारदे, प्रतीक शिंदे,अनिल अंगरख,संभाजी वाघमारे, पल्लवीताई शिंदे, वैभव वाघमारे,अनुराधाताई माने आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

20/08/2026
20/08/2026

समस्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी अजिबात पिछा सोडत नाही हा वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे.

दिघा विभागातील महापुरुषांच्या नामफलकांबाबत वंचित बहुजन आघाडीची मागणी: "आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा सन्मान त...
19/08/2026

दिघा विभागातील महापुरुषांच्या नामफलकांबाबत वंचित बहुजन आघाडीची मागणी: "आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा सन्मान त्वरित परत मिळावा"

*रवि पी. ढवळे सर*
*ब्युरो चिफ /कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य*

*ठाणे, दिघा*: दिघा विभागातील ईश्वर नगर येथील स्वामी विवेकानंद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव असलेला नामफलक अचानक गायब झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने महापालिका प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा केवळ फलक गहाळ होण्याचा मुद्दा नसून एका महापुरुषाचा अवमान असल्याचे वंचित बहुजन आघाडी यांचे म्हणणे आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईश्वर नगर येथील स्वामी विवेकानंद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याला पूर्वी "आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे मार्ग" असे नामकरण करण्यात आले होते. मात्र सध्या त्या ठिकाणचा नामफलक अदृश्य झाला आहे. समाजाच्या प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषाचे नाव अशा प्रकारे दुर्लक्षित होणे हे अत्यंत निंदनीय आहे.

यासोबतच दुसरी मागणी करताना संघटनेने सांगितले की, दिघा विभागातील ठाणे-बेलापूर रोडवरून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाला "कै. वस्ताद लहुजी साळवे चौक" असे नाव आहे. या ठिकाणीही "आद्यक्रांतीगुरू" हा सन्माननीय उल्लेख नसल्याने जुना नामफलक काढून त्याठिकाणी "आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे चौक" असा नवीन नामफलक त्वरित लावण्यात यावा.

*नेमक्या कोणत्या मागण्या?*
- *ईश्वर नगर, स्वामी विवेकानंद शाळा रोड*: गायब झालेला "आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे" यांचा नामफलक सन्मानपूर्वक पुन्हा तात्काळ लावावा
- *रामनगर चौक, ठाणे-बेलापूर रोड*: सध्याच्या "कै. वस्ताद लहुजी साळवे" या फलकाऐवजी "आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे चौक" असा नवीन फलक बसवावा

निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेश भालेराव म्हणाले, "आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे हे बहुजन समाजाला स्वाभिमानाची शिकवण देणारे पहिले क्रांतीगुरू आहेत. त्यांच्या नावाचा फलक गायब होणे म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून ७ दिवसांच्या आत दोन्ही ठिकाणी नवीन नामफलक लावावेत."

यावेळी तालुका संघटक प्रतीक शिंदे, अनिल अंगरख अक्षय दावणे, संतोष गुत्तेदार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी १९ व्या शतकात अस्पृश्यता आणि गुलामीविरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे त्यांच्या नावाचा सन्मान राखणे ही केवळ औपचारिकता नसून सामाजिक जबाबदारी आहे, असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे आता दिघा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला ज...
19/08/2026

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब

नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर तुटलेली गटारे, खराब रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, नियमितपणे न उचलला जाणारा कचरा तसेच भटक्या जनावरांमुळे निर्माण झालेली अस्वच्छता यांसह अनेक समस्या निदर्शनास आल्या. या परिस्थितीमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना तसेच ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी समोर आले. तेथील परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, परिसरातील मूलभूत सोयी-सुविधा अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे पाहणीतून दिसून आले.

या समस्यांची पाहणी केल्यानंतर मंगळवारी (दि. १८) वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांनी आपल्या साईनगर रबाळे येथील कार्यकर्त्यांसह घणसोली एफ वार्डचे सहायक आयुक्त संजीव तडवी यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासन नेमके कोणासाठी काम करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

परिसरातील या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत, तर घणसोली एफ वॉर्ड कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे मल्लिनाथ सोनकांबळे यांनी दिला.

यावेळी रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले, रबाळे विभाग उपाध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी,रबाळे विभाग उपाध्यक्ष पिराजी दांडगे, अंकुश तेलंगे,एम. डी.गायकवाड, सीताताई अदमाने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
जोपर्यंत नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली.

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला ज...
18/08/2026

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब.

नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर तुटलेली गटारे, खराब रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, नियमितपणे न उचलला जाणारा कचरा तसेच भटक्या जनावरांमुळे निर्माण झालेली अस्वच्छता यांसह अनेक समस्या निदर्शनास आल्या. या परिस्थितीमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना तसेच ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी समोर आले. तेथील परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, परिसरातील मूलभूत सोयी-सुविधा अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे पाहणीतून दिसून आले.

या समस्यांची पाहणी केल्यानंतर आज दिनांक १८/०८/२०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांनी आपल्या साईनगर रबाळे येथील कार्यकर्त्यांसह घणसोली एफ वार्डचे सहायक आयुक्त संजीव तडवी यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासन नेमके कोणासाठी काम करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

परिसरातील या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत, तर घणसोली एफ वॉर्ड कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे मल्लिनाथ सोनकांबळे यांनी दिला.

यावेळी रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले, रबाळे विभाग उपाध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी,रबाळे विभाग उपाध्यक्ष पिराजी दांडगे, अंकुश तेलंगे,एम. डी.गायकवाड, सीताताई अदमाने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
जोपर्यंत नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली.

एसआयआर अंतर्गत प्राप्त अर्जांचे डिजीटलायझेशन पूर्ण – 24 ऑगस्टला प्रसिध्द होणार प्रारूप मतदार यादी           भारत निवडणूक...
18/08/2026

एसआयआर अंतर्गत प्राप्त अर्जांचे डिजीटलायझेशन पूर्ण – 24 ऑगस्टला प्रसिध्द होणार प्रारूप मतदार यादी

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआर अंतर्गत 30 जूनपासून 17 ऑगस्टपर्यंत नागरिकांचे गणनाअर्ज भरून घेऊन त्यांचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फ डिजीटलायझेशन करून घेण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे.
दि. 17 ऑगस्ट 2026 पर्यंत 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघात 4,97,380 मतदारांपैकी 2,78,228 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे माहिती भरून जमा करण्यात आलेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे.
त्याचप्रमाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील 4,22,317 मतदारांपैकी 2,56,986 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे आवश्यक माहिती भरून जमा झालेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे.
बीएलओ यांच्यामार्फत गणनाप्रपत्रे संकलित झाल्यानंतर 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
मतदारांनी आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे का हे तपासण्यासाठी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) यांचेशी संपर्क साधावा अथवा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (www.voters.eci.gov.in) ला भेट देऊन ऑनलाईन तपासावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी केले आहे.
या प्रारूप मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश नसल्यास किंवा कोणाच्या नावाच्या समावेशाबाबत हरकत असल्यास मतदार नोंदणी अधिका-यांकडे याबाबत हरकती अथवा दावे 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत दाखल करण्याची मुदत आहे.
हे दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर आहे.
दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे.
मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता व अद्ययावतपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘कोणतीही पात्र व्यक्ती मतदार यादीतून वगळली जाणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश असणार नाही’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून करण्यात आलेल्या या एसआयआर कार्यक्रमामुळे योग्य मतदारांचीच नावे मतदारयादीत राहिल्याने मतदार यादी शुध्द होणार आहे.
हा कार्यक्रम योग्य रितीने राबविण्यासाठी व याची माहिती व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) व मतदार नोंदणी अधिकारी, सहा.मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित सर्व घटकांसह नागरिक व सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, प्रतिनिधींनीही मोलाचे सहकार्य केले आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामांमुळेच हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून या सर्वांचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अभिनंदन केले आहे.


Maharashtra DGIPR Urban Development Department Government of Maharashtra MyGov Maharashtra Maharashtra SEC

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर
18/08/2026

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

Address

घणसोलीगाव
Airoli
400708

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share