Nagpur Citizens Forum

Nagpur Citizens Forum Unite, Uplift, Empower

08/09/2026

Traafic Awareness..

🚦 नियम सांगणारे अनेक असतात… पण नियम स्वतः पाळून दाखवणारे किती?‘सुधरा रे नागपूरकर’ मोहिमेअंतर्गत तरवली मेट्रो स्टेशन चौका...
06/09/2026

🚦 नियम सांगणारे अनेक असतात… पण नियम स्वतः पाळून दाखवणारे किती?

‘सुधरा रे नागपूरकर’ मोहिमेअंतर्गत तरवली मेट्रो स्टेशन चौकात नागपूर सिटिझन्स फोरमच्या अध्यक्षांनी ट्रॅफिक अवेअरनेसचा अनोखा उपक्रम राबवला.

डोक्यावर हेल्मेट, हातात जनजागृतीचे फलक आणि त्यावर नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे थेट संदेश…
स्वतः रस्त्यावर उभं राहून नागरिकांशी संवाद साधत “नियम पाळा, सुरक्षित राहा” हा संदेश देण्यात आला.

विशेष म्हणजे, या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ❤️

कारण वाहतूक शिस्त ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही…
ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

👉 हेल्मेट वापरा
👉 सिग्नल पाळा
👉 चुकीच्या दिशेने वाहन चालवू नका
👉 मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका
👉 आपल्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्या.

बदलाची सुरुवात इतरांकडून नाही… स्वतःपासून करूया..

#सुधरारेनागपूरकर

🚦🔥 सुधरा नागपूरकर… बदलाची सुरुवात रस्त्यावरून 🔥🚦हेल्मेट डोक्यावर असणं पुरेसं नाही…वाहतूक नियम डोक्यात असणं गरजेचं आहे 🪖❤...
30/08/2026

🚦🔥 सुधरा नागपूरकर… बदलाची सुरुवात रस्त्यावरून 🔥🚦

हेल्मेट डोक्यावर असणं पुरेसं नाही…
वाहतूक नियम डोक्यात असणं गरजेचं आहे 🪖❤️

नागपूर सिटिझन्स फोरमच्या “सुधरा नागपूरकर” मोहिमेअंतर्गत आज क्रिपलानी चौक, रहाटे मेट्रो स्टेशन जवळ विशेष Traffic Awareness Drive घेण्यात आली.

🚔 वाहतूक पोलिसांचे सहकार्य
🙋‍♂️ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
👦 ८ वर्षांच्या बालसदस्यापासून 👴 ७५ वर्षांच्या ज्येष्ठ सदस्यांपर्यंतचा सहभाग

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — हेल्मेट तुमचा जीव कसा वाचवू शकतं, याचं प्रतिकात्मक सादरीकरण करून नागरिकांमध्ये जनजागृती..

कारण…

❌ सिग्नल तोडणे म्हणजे फक्त नियमभंग नाही.
❌ हेल्मेट न घालणे म्हणजे फक्त दंडाची भीती नाही.
❌ चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे म्हणजे फक्त तुमचा धोका नाही.

👉 तुमची एक चूक… तुमच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते..

म्हणूनच सुधरा नागपूरकर ही केवळ मोहीम नाही, तर नागपूरच्या नागरिकांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न आहे.

यापुढेही प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून अशाच विविध उपक्रमांद्वारे सुरक्षित, सुंदर आणि शिस्तबद्ध नागपूर घडवण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरम प्रयत्नशील राहणार आहे.

💪 नियम पाळूया…
जीव वाचवूया…
नागपूर बदलूया..

❤️ सुधरा नागपूरकर..

🚦 Safe Roads • Responsible Citizens • Better Nagpur

#सुधरानागपूरकर

🗑️ नागपूर की कचऱापूर?“सुधरा नागपूरकर” मोहिमेअंतर्गत जनजागृती अभियाननागपूर आपलं शहर आहे… आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदार...
29/08/2026

🗑️ नागपूर की कचऱापूर?

“सुधरा नागपूरकर” मोहिमेअंतर्गत जनजागृती अभियान

नागपूर आपलं शहर आहे… आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे.
मात्र आजही अनेक ठिकाणी नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला, चौकात किंवा मोकळ्या जागेत कचरा फेकला जातो. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे ही केवळ अस्वच्छता नाही, तर आपल्या शहराप्रती असलेल्या जबाबदारीचा अभाव आहे.

याच सामाजिक जाणिवेतून नागपूर सिटिझन्स फोरमच्या “सुधरा नागपूरकर” मोहिमेअंतर्गत “नागपूर की कचऱापूर?” ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात येत आहे.

या मोहिमेचा उद्देश कोणावर टीका करणे किंवा कोणाला दोष देणे नसून, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे.

🚯 कचरा कुठेही फेकू नका..

घरातील कचरा रस्त्यावर, फुटपाथवर, चौकात किंवा मोकळ्या जागेत टाकू नका.
कचरा नेहमी निर्धारित ठिकाणी किंवा महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेकडेच द्या.

🚛 कचरा गाडी येत नसेल तर?

नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात महानगरपालिकेची कचरा संकलनाची गाडी नियमित येत नसेल, तर संबंधित महानगरपालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या परिसरात नियमित कचरा संकलनाची व्यवस्था सुरू करण्यासाठी पाठपुरावा करा.

स्वच्छ शहरासाठी नागरिक आणि प्रशासन दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

चला, आपण एक छोटासा संकल्प करूया—

“मी सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणार नाही…
आणि दुसऱ्यालाही कचरा फेकू देणार नाही”

🌱 स्वच्छ नागपूर — सुंदर नागपूर
🤝 सुधरा नागपूरकर | नागपूर सिटिझन्स फोरम

#सुधरानागपूरकर

नागपूर पोलीस यांच्या तर्फे शहरवासियांना सूचना...🪔 गणेश चतुर्थी स्वागत मिरवणूक | वाहतूक व सुरक्षितता सूचना 🚔गणरायाच्या आग...
28/08/2026

नागपूर पोलीस यांच्या तर्फे शहरवासियांना सूचना...

🪔 गणेश चतुर्थी स्वागत मिरवणूक | वाहतूक व सुरक्षितता सूचना 🚔

गणरायाच्या आगमनाचा उत्सव आनंदात आणि सुरक्षिततेत साजरा करूया! 🙏🌺

मिरवणुकीदरम्यान वाहतूक नियमांचे पालन करा, वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा, अनधिकृत प्रवासी वाहतूक टाळा आणि रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवा.

आपल्या सहकार्याने मिरवणूक होईल सुरक्षित, शिस्तबद्ध आणि वाहतूक सुरळीत! 🇮🇳

वाहतूक नियम पाळूया,
नागपूर सुरक्षित ठेवूया!

📞 वाहतूक नियंत्रण कक्ष, नागपूर: 0712-2666868

सकारात्मक संवादातून सुरक्षित नागपूरच्या दिशेने… 🚦🌳आज नागपूर सिटिझन्स फोरमच्या सदस्यांनी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आ...
27/08/2026

सकारात्मक संवादातून सुरक्षित नागपूरच्या दिशेने… 🚦🌳

आज नागपूर सिटिझन्स फोरमच्या सदस्यांनी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांची भेट घेऊन नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.

शहरातील वाहतुकीची मोठी वर्दळ असलेली ठिकाणे, अपघातप्रवण क्षेत्रे आणि वारंवार बॉटलनेक निर्माण होणारे चौक/रस्ते यांची माहिती व यादी तसेच त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजनांबाबतच्या सूचना असलेले निवेदन त्यांना देण्यात आले.

यासोबतच “सुधरा नागपूरकर” या मोहिमेअंतर्गत नागपूर सिटिझन्स फोरमकडून सुरू असलेल्या वाहतूक जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली. येणाऱ्या काळात नागरिकांमध्ये वाहतूक नियम, शिस्त आणि सुरक्षिततेबाबत अधिक प्रभावीपणे जनजागृती कशी करता येईल, यावरही सकारात्मक चर्चा झाली.

आगामी सण-उत्सवांच्या काळात वाढणारी वाहतूक लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या संस्थांनी समन्वयाने काम करून वाहतूक कोंडी कमी करणे, नागरिकांची गैरसोय टाळणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे याबाबतही सविस्तर विचारविनिमय झाला.

या भेटीदरम्यान नागपूर सिटिझन्स फोरमच्या वतीने डीसीपी ट्रॅफिक आदित्य मिरखेलकर यांचे सुंदर रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. 🌱

ही भेट केवळ समस्या मांडण्यासाठी नव्हे, तर समस्या + सूचना + प्रशासनासोबत समन्वय + नागरिकांचा सहभाग या माध्यमातून पुढे सकारात्मक काम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले.

सुरक्षित नागपूर, शिस्तबद्ध नागपूर आणि वाहतूक कोंडीमुक्त नागपूरसाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया।

🚦 सुधरा नागपूरकर… कारण सुरक्षित नागपूरची सुरुवात आपल्यापासूनच..

नागपूर सिटिझन्स फोरम

🚦 सुधरा नागपूरकर | वाहतूक जनजागृती अभियाननियम पाळा… स्वतःची आणि इतरांचीही सुरक्षितता जपा.. ❤️नागपूर सिटिझन्स फोरमच्या “स...
23/08/2026

🚦 सुधरा नागपूरकर | वाहतूक जनजागृती अभियान

नियम पाळा… स्वतःची आणि इतरांचीही सुरक्षितता जपा.. ❤️

नागपूर सिटिझन्स फोरमच्या “सुधरा नागपूरकर” मोहिमेअंतर्गत आज गांधीबाग चौक येथे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात आले.

🪧 सिग्नल जंप करू नका
🪖 हेल्मेट वापरा
🚗 सीटबेल्ट लावा
🚶 झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा
⛔ रॉंग साईडने वाहन चालवू नका

या संदेशांचे फलक घेऊन सदस्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. विशेष म्हणजे, काही नागरिकांनी तिथेच हेल्मेट घातले आणि “ही जनजागृती गरजेची आहे” असे म्हणत नागपूर सिटिझन्स फोरमचे आभार मानले.

बदल फक्त प्रशासनाने नाही… आपल्यापासूनही सुरू झाला पाहिजे..

सुधरा नागपूरकर — सुरक्षित नागपूरकर..

Nagpur Police Commissionerate

#सुधरानागपूरकर

रस्ते कधी मिळणार?महानगरपालिका नागरिकांकडून कर नियमितपणे वसूल करते, मग नागरिकांना मूलभूत रस्त्यांची सुविधा कधी मिळणार?खड्...
22/08/2026

रस्ते कधी मिळणार?

महानगरपालिका नागरिकांकडून कर नियमितपणे वसूल करते, मग नागरिकांना मूलभूत रस्त्यांची सुविधा कधी मिळणार?

खड्डे, खराब रस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.

कर भरतोय नागरिक… मग सुविधा मिळणार तरी कधी?

Nagpur Municipal Corporation

#नागपूर #महानगरपालिका #रस्ते #नागरिकांचा_प्रश्न

सुधरा नागपूरकर...📢🙏नागपूर सिटिझन्स फोरमच्या "सुधरा नागपूरकर" मोहिमे अंतर्गत सर्व नागपूरकरांना कळकळीचे आवाहन..येणारा गणेश...
21/08/2026

सुधरा नागपूरकर...📢🙏

नागपूर सिटिझन्स फोरमच्या "सुधरा नागपूरकर" मोहिमे अंतर्गत सर्व नागपूरकरांना कळकळीचे आवाहन..

येणारा गणेशोत्सव, अनेक सण आणि नागपूरात वाढती गर्दी पाहता, आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षितता आपल्या हातात आहे.

ट्रॅफिकचे नियम पाळणे ही केवळ काळाची गरज नाही, तर आपली नैतिक जबाबदारी आहे.

**चला, आपण मिळून प्रतिज्ञा करूया:**

1️⃣ हेलमेटशिवाय दुचाकी न चालवणे (आय.एस.आय. प्रमाणित).
2️⃣ कारमध्ये सीट बेल्टचा वापर अनिवार्य करणे.
3️⃣ वाहतूक सिग्नलचा सन्मान करणे.
4️⃣ ओव्हरस्पीडिंग टाळणे.
5️⃣ मद्यप्राशन करून वाहन न चालवणे.
6️⃣ नेहमी आपल्या लेनमध्ये राहणे.
7️⃣ गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळणे.
8️⃣ धोक्याचे ओव्हरटेकिंग न करणे.

"वाहतुकीचे नियम पाळा"
तुमचं व तुमच्या परिवाराचं संरक्षण करा...

#गणेशोत्सव२०२६

Footpath Free City..     #नागरिकांची_जबाबदारी
19/08/2026

Footpath Free City..

#नागरिकांची_जबाबदारी

Address

Nagpur Road
Area

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur Citizens Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category