15/07/2024
कायदे जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम
दिनांक 13.07.2024
आर्णी/जवळा:- श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय जवळा येथे पोलीस स्टेशन आर्णी ठाणेदार श्री केशव ठाकरे यांनी दिनांक 01 जुलैपासून देशात लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता, या तीन कायदे, पोस्को कायदा 2012, बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, घरातून कोणाला ही न सांगता पळून जाणाऱ्या मुला मुलींचे हाल घरच्यांची परिस्थिती काय होते व त्याचे दुष्परिणाम काय होतात हे विद्यार्थ्यांना सांगितले जीवनातील ध्येयाला पूर्णविराम लागेल अशा कोणत्याही वाईट कृत्याला बळी पडू नये असे आव्हान केले व पोलीस हे नेहमीच विद्यार्थ्यांचे हितासाठी जनतेच्या हितासाठी कार्य करतात व विद्यार्थ्यांच्या जनतेच्या समस्या सुटावा यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत व अनेक चांगल्या सवयींचे सखोल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांप्रती असलेले प्रश्न भीती काढून टाकली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश मोरे साहेब यांनी जवळा बस स्थानकावरील वाहनांची भरदळ, व शाळेला सुट्टी झाल्यानंतर होणारी गर्दी व विनाकारण वाहन घेऊन फिरणारे मुलांसंदर्भात माहिती दिली व यावर योग्य पाऊल उचलाल या संदर्भात विनंती केली. यावेळी मुख्याध्यापक श्री. नंदकुमार चव्हाण सर, जमदार श्री.चव्हाण साहेब, पोलीस पाटील श्री सुरेश जाधव, पत्रकार श्री गणेश एकंडवार, श्री. अमोल ठक व माजी विद्यार्थी समाजकार्यकर्ते योगेश तडसे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
देशात नवीन लागू झालेले कायदे जनतेच्या हिताचे असून ब्रिटिश काळातील दोष काढून ते सोपे व सुटसुटीत करून नवीन कायदे लागू केले आहेत. अशा या फौजदारी कायद्याची माहिती विद्यार्थी व जनतेला व्हावी म्हणून कायदे जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगत सर प्रास्ताविक श्री तिलक मांडवगडे सर व आभार राऊत मॅडम यांनी केले.