Pradeep Jaiswal

Website Contact the organization

Pradeep Jaiswal MLA from Chhatrapati Sambhajinagar (Central) Constituency , Maharashtra

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।अ...
03/10/2026

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#अभिजात_मराठी_भाषा_दिन #मराठी_भाषा #मराठी_अभिमान ाराष्ट्र

जय जवान, जय किसान या महान घोषणेमुळे देशाला दिशा दाखविणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लालबहादुर शास्त्री ...
02/10/2026

जय जवान, जय किसान या महान घोषणेमुळे देशाला दिशा दाखविणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#लालबहादुरशास्त्री

सत्य व अहिंसा या मूल्यांवर आधारित सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर नेणारे राष्ट्रपिता महात्मा ...
02/10/2026

सत्य व अहिंसा या मूल्यांवर आधारित सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर नेणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती.

शांततेचे व अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधींचा देश अशीच आजही भारताची जगभरात ओळख आहे. त्यांच्या शिकवणीचा सर्व देशवासीयांनी अवलंब करणे हेच आजच्या काळात महात्मा गांधींना खरे अभिवादन ठरेल. महात्मा गांधीजी यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !

#महात्मागांधी

29/09/2026

🏹 आज पदाधिकारी बैठक संपन्न झाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला.

“मेरा धर्म सिर्फ मातृभूमी की सेवा करना है!”मातृभूमीसाठी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान देणारे थोर क्रांतिकारक शहिद भगतस...
28/09/2026

“मेरा धर्म सिर्फ मातृभूमी की सेवा करना है!”

मातृभूमीसाठी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान देणारे थोर क्रांतिकारक शहिद भगतसिंग यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!

#शहिद_भगतसिंग #जयंती #अभिवादन

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!महाराष्ट्रातील सुमारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आपल्या छ...
26/09/2026

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

महाराष्ट्रातील सुमारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्क माफी, रोहयोच्या कामांना प्राधान्य तसेच पिण्याचे पाणी, चारा आणि अन्नधान्याची व्यवस्था अशा विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. जलसंधारणाची कामे, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन यासोबतच शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना-महायुती सरकार ठामपणे उभे आहे.

#दुष्काळ

निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी…चुकले आमचे काही, तर क्षमा असावी…गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या !! #अनंत_चतु...
25/09/2026

निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी…
चुकले आमचे काही, तर क्षमा असावी…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या !!

#अनंत_चतुर्दशी #गणेशोत्सव

शेतकऱ्यांच्या पाठीशी तत्पर...ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट आले. त्या त्या वेळेस त्याच्या पाठीशी शिवसेना मुख्य नेते व उ...
24/09/2026

शेतकऱ्यांच्या पाठीशी तत्पर...

ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट आले. त्या त्या वेळेस त्याच्या पाठीशी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब ताकदीने उभे राहिले आहेत. सद्यस्थितीला राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात आहेत. त्याचे दुःख, वेदना जाणून घेण्यासाठी शिंदे साहेबांनी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेट दिली आणि दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याच्या पाठीशी तत्पर असल्याचे सांगत शिंदे साहेबांनी शेतकऱ्याला आधार दिला. गेल्या वर्षी दिवाळीच्या तोंडावर शेतकरी महापुराच्या तडाख्यात कोलमडला होता. तेव्हा शिंदे साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ दिली नव्हती. या वेळेस देखील शिंदे साहेब शेतकऱ्याची दसरा - दिवाळी काळी होऊ देणार नाहीत. कारण शिंदे साहेबांनी शेतकऱ्याला शब्द दिला आहे, तो ते कृतीतून पूर्णही करणार आणि शेतकऱ्याच्या दसरा - दिवाळी सणाला आनंदाचे, सुखाचे तोरणही लावणार.

Address

Aurangabad
431127

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradeep Jaiswal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pradeep Jaiswal:

Shortcuts

Share