MHADA

MHADA Maharashtra Housing and Area Development Authority offering affordable houses under various scheme
(1)

शिवसृष्टी हाईट्स, वडाळा येथील रहिवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या विविध मागण्या व परिसरातील समस्यांचा आढावा घेतला.अतिक्रम...
02/08/2026

शिवसृष्टी हाईट्स, वडाळा येथील रहिवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या विविध मागण्या व परिसरातील समस्यांचा आढावा घेतला.

अतिक्रमण हटविणे, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पिण्याचे पाणी, सांडपाणी व रस्त्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि नियोजनबद्ध परिसर उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे.

क्रिकेटची मॅच,गच्चीवरच्या गप्पा,लपाछपीचे खेळ,आणि एका हाकेवर धावून येणारे मित्र...काळ बदलला...पण अनेकांसाठी बालपण सुंदर ब...
02/08/2026

क्रिकेटची मॅच,
गच्चीवरच्या गप्पा,
लपाछपीचे खेळ,
आणि एका हाकेवर धावून येणारे मित्र...
काळ बदलला...पण अनेकांसाठी बालपण सुंदर बनवणाऱ्या त्या आठवणींचा पत्ता आजही त्या ‘आपल्या हक्काच्या इमारती’ मध्येच आहे.
--------------------------------------------------------------------------------
Cricket matches,
Conversations on the terrace,
Games of hide-and-seek,
And friends who came running at the sound of a single call... 👬

Times may have changed, but for many of us, the address of our most cherished childhood memories still remains that one place we proudly called home. 💓

01/08/2026

मुंबई-पुणे हायवेलगत असणाऱ्या ताथवडे, पुणे येथील टप्पा– २ ह्या म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात ६३४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध!

अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा गृहसंकुलात आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरु करण्याची ही संधी सोडू नका. आजच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करा.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण घरांचे स्वप्न अधिक वेगाने साकार करण्याच्या दृष्टीने म...
01/08/2026

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण घरांचे स्वप्न अधिक वेगाने साकार करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्प व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना २.०, एमएमआर ग्रोथ हब, महिला व विद्यार्थी वसतिगृह, क्लस्टर डेव्हलपमेंट तसेच विभागीय मंडळांच्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेत पुढील वाटचालीसाठी आवश्यक दिशा निश्चित करण्यात आली.

लेखणी सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!-------------------------------------------------...
01/08/2026

लेखणी सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
---------------------------------------------------------------------------------
Remembering the legendary people's poet and literary icon, Lokshahir Annabhau Sathe, with heartfelt tributes on his birth anniversary.

31/07/2026
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्...
31/07/2026

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आधुनिक नगररचना तत्त्वांवर आधारित या उपक्रमातून भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे.

या विकास आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण, आधुनिक वाहनतळ, पालखी मार्ग व समाधी मंदिर परिसराचा विकास, वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण, सार्वजनिक सुविधा, तलाव, बगीचे तसेच आरक्षित जागांचा नियोजनबद्ध विकास अशा विविध कामांसाठी म्हाडामार्फत सुमारे ₹५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

श्रद्धा, सुविधा आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधत अक्कलकोटला अधिक सुबक, नियोजनबद्ध आणि भाविक-केंद्रित तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे.

ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, योग्य मार्ग दाखवणाऱ्या आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम!गुरु...
29/07/2026

ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, योग्य मार्ग दाखवणाऱ्या आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम!

गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌼🙏

नाशिकमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची हीच आहे योग्य वेळ! 🏡नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ऑनलाईन सो...
25/07/2026

नाशिकमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची हीच आहे योग्य वेळ! 🏡

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ऑनलाईन सोडती अंतर्गत ७४४ निवासी सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा.

--------------------------------------------------------------------------

Now is the perfect time to make your dream of owning a home in Nashik come true! 🏡

The Nashik Housing and Area Development Board is offering 744 residential apartments for sale through its online housing lottery.

Apply only through MHADA's official website: https://housing.mhada.gov.in

Address

Grihanirman Bhavan Kalanagar
Bandra East
400051

Alerts

Be the first to know and let us send you an email when MHADA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MHADA:

Shortcuts

Share