District Collector, Mumbai Suburban

District Collector, Mumbai Suburban Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from District Collector, Mumbai Suburban, Government Official, 10th Floor, Administrative Building, near Chetna College, Government Colony, Bandra East.

12/03/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष श...
04/03/2026

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित
महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल
-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

देशातील पहिल्या सर्वेक्षण योजनेतून 15 हजार युवकांना प्रशिक्षण आणि पाच हजार रोजगारनिर्मितीचा संकल्प युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना असून रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने महत्वाचे उचललेले पाऊल राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम भागातील (एच पश्चिम वॉर्ड) सुमारे 55 हजार घरांतील युवकांचा कौशल्य क्षमता कल जाणून घेण्यासाठी सुरू होत असलेल्या ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या योजनेच्या उद्घाटन समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह कौशल्य विकास उपायुक्त आनंद माळी, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे विभागीय संचालक सी.एस. मूर्ती, कौशल्य विकास विभाग मुंबईचे उपायुक्त सचिन जाधव, सहायक आयुक्त शैलेश भगत, नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य नेहा जगतियानी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागातील अधिकारी, उद्योजक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हिंद-की- चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम निमीत्ताने तदनुषंगाने दि.16/02/2026 रोजी 11.00 वाजता मा....
16/02/2026

हिंद-की- चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम निमीत्ताने तदनुषंगाने दि.16/02/2026 रोजी 11.00 वाजता मा.जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई 51 येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद समागम निमित्त आयोजित या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात ...
12/02/2026

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद समागम निमित्त आयोजित या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात तुम्हा सर्वांना हार्दिक आमंत्रण आहे. या महान शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा आणि महापुरुषांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करा.

🗓️ तारीख: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च, २०२६. 📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.

तुमची उपस्थिती विनंती आहे.

*मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७  या वर्षासाठी १४९७ कोटी रुपये प्रस्तावित**२०२५-२६ या वर्षातील शंभर टक्के निधी खर्च होण...
11/02/2026

*मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या वर्षासाठी १४९७ कोटी रुपये प्रस्तावित*

*२०२५-२६ या वर्षातील शंभर टक्के निधी खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व विभागानी काटेकोर नियोजन करा: पालकमंत्री अॅड. आशिष शेलार*

मुंबई, दि.१०: मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या वर्षासाठी ७१० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास आज मंजुरी देण्यात आली आणि ७८७ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली अशी १४९७ कोटी रुपये २०२६-२७ साठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत ११०२.७४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, शंभर टक्के निधी खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व विभागानी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिल्या.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे होते. सभेला जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य, खासदार, आमदार तथा विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई उपनगरामध्ये वाहतूक कोंडीच्या समस्यांवार तातडीने उपाययोजना करणे, कंदलवान संवर्धन करणे, डीपी रस्त्यांचे काम प्राधान्याने करणे, तसेच ड्रग माफिया यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री अॅड. शेलार यांनी या बैठकीत दिले.

*मुंबई उपनगरात राबवीण्यात येणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम*

बोरीवली, अंधेरी व कुर्ला येथे राज्यातील पहिले अत्याधुनिक सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
युवक व महिलांसाठी रोजगार संधी निर्माण करणारा वॉर्ड स्तरीय कौशल्य सर्वेक्षण हा देशातील पहिला पथदर्शी उपक्रम ठरणार आहे. तसेच, केंद्रीय मत्स्य प्रशिक्षण संस्था (CIFE), वर्सोवा येथे महाराष्ट्रातील पहिले मत्स्य आरोग्य क्लीनिक (Fish Health Clinic) स्थापन करण्यात येत असून, यामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वर आधारित डिजिटल ज्ञान केंद्र उपनगरात उभारण्यात येणार आहे. गोराई येथे मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यासाठी रु. 58.22 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

मौजे मालवणी तालुका बोरीवली येथील न.भू. क्रमांक 1916 या शासकीय मिळकतीवरील  28 अनधिकृत  अतिक्रमित झोपड्या निष्कासित करण्या...
10/02/2026

मौजे मालवणी तालुका बोरीवली येथील न.भू. क्रमांक 1916 या शासकीय मिळकतीवरील 28 अनधिकृत अतिक्रमित झोपड्या निष्कासित करण्यात आल्या असून अंदाजे 1800 ते 2000 चौ. मी. क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात आले. सदरची कारवाई मा. श्री. सौरभ कटियार साहेब (मा.जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा), मा. श्री. गणेश मिसाळ साहेब (मा. अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगर), यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनायक पाडवी (मा.प्र.उपजिल्हाधिकारी अति/निष्का मालाड), श्री. इरेश चप्पलवार (मा.तहसीलदार बोरीवली), श्री. कुंदन वळवी (मा.सहायक आयुक्त (पी/उत्तर विभाग बृहन्मुंबई महानगर पालिका), यांच्या अधिकारी/कर्मचारीमार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

Hon'ble Collector Sir ' s visit to Mumbai - Ahmedabad Bullet Train ( National High Speed Rail Corridor) Mumbai Metro Sta...
06/02/2026

Hon'ble Collector Sir ' s visit to Mumbai - Ahmedabad Bullet Train ( National High Speed Rail Corridor) Mumbai Metro Station at BKC.

अतिक्रमण हटउन पर्यावरण रक्षा प्रशासन न्यायालय व लोकप्रतिनिधी दक्ष  वरील ओळी सार्थ ठराव्यात अशीच काहीशी प्रचिती आज वर्सोव...
06/02/2026

अतिक्रमण हटउन पर्यावरण रक्षा
प्रशासन न्यायालय व लोकप्रतिनिधी दक्ष
वरील ओळी सार्थ ठराव्यात अशीच काहीशी प्रचिती आज वर्सोवा भागात पाहायला मिळाली
शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या लालजी मुन्ना यादव या विरोधात गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढले असता मा उच्य न्यायालयात संबंधिताने धाव घेतली होती व न्यायालयाने जैसे थे आदेश दिले होते. त्यामुळे सदर प्रकरणात सतत पाठपुरावा प्रशासनाने जसा केला तसा स्थानिक आमदार अमित साटम यांनी ही प्रशासनाकडे अनेकवेळा पाठ पुरावा केला
प्रशासनाची बाजू ऐकत न्यायालयाने संबंधित व्यक्तीचा दावा तथ्य नसल्याने फेटाळून लावला आणि पर्यावरण संरक्षण साठी प्रशासन न्यायालय व लोकप्रतिनिधी एकत्र असल्याची एक मिसाल या निमित्ताने निदर्शनास आली आहे
सदर जागा आता कांदळवन संरक्षण दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली होती त्यानुसार ताबा वनविभागास देउन जागा सुरक्षित करण्यात आली आहे
या भागातील जागरूक नागरिक ही सदर जागा संरक्षित राहावी या दृष्टीने वारंवार अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती वर लक्ष ठेउन होते.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी पोलीस व महानगर पालिका, अतिक्रमण निष्कासन विभाग सहकार्याने सदर निष्कासन कारवाई केली असून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर पर्यावरण सुरक्षा कायद्यांतर्गत व अतिक्रमण केलेबाबत गुन्हा ही वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे
त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित जमिनीवर आणि कोणत्याही शासकीय जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू नये केल्यास कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागेल हा संदेश ही यातून मिळाला आहे.

26/01/2026
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्नमुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 26 ज...
26/01/2026

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ना.ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलार, मंत्री, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा महोदयांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी सौरभ कटीयार, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा व मनीष कलवानिया, पोलीस उपायुक्त, स्वातंत्र्य सैनिक, शहीद कुटूंबियांचे नातेवाईक व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात रशिया मास्को येथील वर्ल्ड पॉवर लिफ्टींग स्पर्धेमध्ये भारतासाठी श्रीम. सरीता संजय कदम यांनी बेंच प्रेस, डेडलिफ्ट आणि स्कॉट या खेळामध्ये 2 गोल्ड मेडल्स व 1 सिल्वर मेडल जिंकल्यामुळे त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ठ खेळाडू यांचा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेच्या विजयी मंडळांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

मालवणी अंबोजवाडी येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित सुमारे १०००० चौ. मी. जमीन अतिक्रमण मुक्त..
04/11/2025

मालवणी अंबोजवाडी येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित सुमारे १०००० चौ. मी. जमीन अतिक्रमण मुक्त..

17th Tribal Youth Exchange Program inauguration at Police Training Center, Marol, Mumbai.Chief Guest: District Collector...
27/10/2025

17th Tribal Youth Exchange Program inauguration at Police Training Center, Marol, Mumbai.
Chief Guest: District Collector, Mumbai Suburban

Address

10th Floor, Administrative Building, Near Chetna College, Government Colony
Bandra East
400051

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Collector, Mumbai Suburban posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share