आम्ही बारामतीकर

आम्ही बारामतीकर तुम्ही बारामतीकर जो माझ्यावर विश्वास दाखवता त्या विश्वासाला तडा जाणार नाही हा मी शब्द देतो.
अजित पवार,सुनेत्रा अजित पवार

'बारामती'चे लाडके सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. #अजित #दादा पवार हे 1982 पासून राजकारणात सक्रिय आहेत. बारामतीतल्या सर्वसामान्य माणूस, वडीधारी मंडळी, माता - भगिनी व युवक - युवती नेहमीचं अजित पवारांच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळेचं 1991 पासून ते आजतागायत ' #बारामती' विधानसभेचं नेतृत्व #अजितदादा पवार हे करीत आहेत. दादांचा सलग सहा वेळा विधानसभा आणि एकदा लोकसभा असा राजकीय आलेख राहिला आहे. त्या

तून #दादा आणि बारामतीकरांचं एक वेगळं नातं तयार झालं आहे. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि संवेदनशीलता दादांना जशी बारामतीकरांविषयी आहे, अगदी तशीचं भावना बारामतीकरांची दादांच्या बाबतीत आहे. त्यामुळे दादांचं आणि बारामतीकरांच हे नातं घट्टचं राहावं. राज्याच्या कारभाराचा गाडा हाकताना दादा कुठेही असले तरी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, आवश्यक धोरणे, दौरे, पाहाणी, कामे बारामतीकरांच्या पर्यत वेळेत पोहचावी या हेतूने हे पेज चालविले जात आहे. इथून पुढे या सोशल माध्यमाद्ववारे आपण दादांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, बैठका, आढावा किंवा दौरे यांची विस्तृत माहिती घेणार आहोत. तसेच त्यांच्या दैनंदिन कामाची माहिती सुध्दा येथे आपणाला दररोज वाचायला मिळेल. त्यामुळे दादांच्या कामाचा हा विस्तार बारामतीकरांच्या पर्यत पोहचविण्याचे माध्यम म्हणजे 'आम्ही बारामतीकर' हे पेज आहे.

Address

Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही बारामतीकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share