29/10/2025
निमा शाखा बार्शी व आयुष व्यसनमुक्ती केंद्र जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धनत्रयोदशी दिवशी “धन्वंतरी जयंती” आयुष व्यसनमुक्ती केंद्र येथे साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी धन्वंतरी पूजन केले त्यानंतर धन्वंतरी स्तवन झाले.
यावेळी निमा शाखा बार्शीचे अध्यक्ष डॉ प्रदीप जाधव यांनी उपस्थितांना आजारीच पडु नये यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या दिनचर्या विषयी सविस्तर माहिती दिली. निमा शाखा बार्शीच्या वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ सौ मिरा गोदेपुरे यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना मनावरील ताण कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता कसा घालवावा याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.प्रीतम इंगळे यांनी केले तर आभार आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे सीईओ डॉ संदीप तांबारे यांनी मानले. यावेळी उपस्थित डॉ प्रशांत घोंगडे व डॉ अजित जाधव यांनीही धन्वंतरी जयंतीनिमित्त आपले विचार मांडले.
यावेळी निमा शाखा बार्शीचे सचिव डॉ विजयसिंह पवार, डॉ विकास नागरगोजे, डॉ जयंत मोरे व डॉ श्रावणी मोरे हे उपस्थित होते.
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹