जिल्हा माहिती कार्यालय भंडारा

  • Home
  • India
  • Bhandara
  • जिल्हा माहिती कार्यालय भंडारा

जिल्हा माहिती कार्यालय भंडारा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जिल्हा माहिती कार्यालय भंडारा, Government Official, BHANDARA, Bhandara.

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावीराज्य सेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांचे निर्देश; लोकसेवांचा घेतला आढावा...
19/08/2026

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी

राज्य सेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांचे निर्देश; लोकसेवांचा घेतला आढावा

भंडारा, दि. १९ : नागरिकांना नलोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध शासकीय सेवा विहित कालमर्यादेत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांचे अर्ज व प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्यावर तातडीने कार्यवाही करून ती निकाली काढावीत. लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात राज्य सेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विभागप्रमुखांची सार्वजनिक प्राधिकरणाच्या लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत कामगिरीच्या मूल्यांकनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त संदीप देशमुख यांनी लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा, प्राप्त अर्जांची संख्या, निकाली काढलेली प्रकरणे, प्रलंबित अर्ज तसेच विभागनिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही स्तरावर अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाहीत, याची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. भंडारा जिल्ह्यात लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचे काम चांगले असून, ते अधिक प्रभावी करून नागरिकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य द्यावे, असेही आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला असून, नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामात हयगय किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra DGIPR

19/08/2026
19/08/2026
‘कनेक्ट विथ कलेक्टर’ : तरुणांशी संवाद साधणार जिल्हाधिकारीGoogle लिंक भरून कार्यक्रमात सहभागी व्हावे; जिल्हा प्रशासनाचा अ...
19/08/2026

‘कनेक्ट विथ कलेक्टर’ : तरुणांशी संवाद साधणार जिल्हाधिकारी

Google लिंक भरून कार्यक्रमात सहभागी व्हावे; जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

भंडारा, दि. १९ : डिजिटल युगात संवाद आणि कनेक्टिव्हिटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सभागृहात ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जिल्ह्यातील तरुण-तरुणी व विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत.

या संवादातून तरुणांच्या मनातील आकांक्षा, भविष्यासंदर्भातील विचार, शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबतच्या अपेक्षा तसेच भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या कल्पना व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. तरुणाईच्या कल्पकतेला जिल्ह्याच्या विकासाशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींनी Google लिंक भरून नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या पहिल्या १०० तरुण-तरुणींना कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

नोंदणीसाठी Google लिंक :
https://script.google.com/macros/s/AKfycbyOg_3uNCmZpGGMqtrf5Jhl3T9j8QNs6Bv7jfq5o4vzlJRtHpUhXUa2hR43wvGmirX4tw/exec

तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कल्पना, अपेक्षा आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासाबाबतचे विचार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहोचवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

19/08/2026

मृद व जलसंवर्धनासाठी जनजागृती 🌱💧
श्री. महेश सेलुकर यांची विशेष माहिती.
एक रील मातीसाठी, एक रील पाण्यासाठी, एक रील सुरक्षित भविष्यासाठी.
Maharashtra DGIPR
#जलसंवर्धन #जलसंधारण #भंडारा #जलसंधारणसप्ताह Bhandara

जलसंधारण सप्ताह बाबत माहिती देताना जिल्हाधिकारी सावनकुमार.Maharashtra DGIPR
18/08/2026

जलसंधारण सप्ताह बाबत माहिती देताना जिल्हाधिकारी सावनकुमार.
Maharashtra DGIPR

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा — दिनांक २१ ऑगस्ट २०२६, जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे आयोजित.युवक-युवतींनी या संधी...
18/08/2026

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा — दिनांक २१ ऑगस्ट २०२६, जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे आयोजित.
युवक-युवतींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा💼✨
Maharashtra DGIPR

18/08/2026

एक रिल पाण्यासाठी, एक रिल मातीसाठी,
'रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन' राज्यस्तरीय रिल स्पर्धा.
स्पर्धेचे नियम व अधिक माहिती जाणून घ्या.
Maharashtra DGIPR
#वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रिलस्पर्धा

Address

BHANDARA
Bhandara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय भंडारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय भंडारा:

Shortcuts

Share