Shree Ram Mandir Vaishya Vasahat,Chiplun

Shree Ram Mandir Vaishya Vasahat,Chiplun श्री राम मंदिर हे गुरु परंपरेतील असून त्याची स्थापना सन १८१७ मधे करण्यात आली .

चिपळूण शहरातील, वैश्यवसाहत प्रभागातील,श्री समर्थ रामदास स्वामी सांप्रदायीक, सज्जनगड शिष्यगण गुरुपरंपरेतील,श्रीराम मंदिर सन १८१७ मध्ये स्थापन करण्यात आले.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळी श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्र उपासना पद्धती राजकीय प्रचारासाठी सुरु केली. कोंकण प्रांतात श्री रामदासी संप्रदायाचे कै. गांगशेठ शेट्ये हे एक मुख्य प्रचारक होते, त्यांना गोसावी या

नांवे संबोधीत असत. त्यांना श्रीराम पादुका वृद्धकाळात श्री समर्थ रामदास स्वामींनी पूजेसाठी दिल्या. त्यांनी त्या प्रथम 'लक्ष्मीकेशव'(लक्ष्मी-नारायण) देवस्थानात ठेवल्या. नंतर त्यांचा पणतू कै. शेट्याप्पा शेट्ये यांनी सादर श्रीराम मंदिर सन १८१७ च्या सुमारास बांधून पादुका येथे आणल्या व स्वतंत्र श्रीराम जन्म उत्सव व इतर कार्यक्रम सुरु केले.

श्री समर्थ कल्याण स्वामी यांचे शिष्यगण परंपरेतील पणतू श्री लक्ष्मण स्वामी यांनी स्वहस्ते सदर मंदिरातील श्रींच्या मूर्तिची प्रतिष्ठापना सज्जनगडावरून मूर्ती आणून केली.

श्रीराम मंदिरामध्ये सज्जनगडावरील गुरुपरंपरेनुसार वार्षिक व नित्यनैमित्तिक उत्सव कार्यक्रम साजरे केले जातात. मंदिरात प्रतिवर्षी श्री रामनवमी, श्री हनुमान जयंती,काकड आरती,त्रिपुरारी पौर्णिमा, नामसप्ताह, रामदास नवमी, अधिक मास - नाम जप आदी कार्यक्रम साजरे केले जातात.

श्री स्वामी सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) शाखा श्रीराम मंदिर सेवा केंद्र, चिपळूण यांनी श्रीराम मंदिर, व...
19/08/2026

श्री स्वामी सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) शाखा श्रीराम मंदिर सेवा केंद्र, चिपळूण यांनी श्रीराम मंदिर, वैश्य वसाहत, चिपळूण येथे बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुका दर्शन सोहळा आयोजित केला होता व उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले. श्री स्वामी समर्थ🙏

प्रथम श्रावणी सोमवार व नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा🙏
17/08/2026

प्रथम श्रावणी सोमवार व नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा🙏

30/07/2026

स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त🙇‍♂️🌺

सादरकर्ते: श्रीराम प्रासादिक भजन मंडळ व श्री मुरलीधर संगीत भजन मंडळ, चिपळूण

30/07/2026

रामदासी भजन, नैवेद्य, वीणा पूजन, पारंपारिक काला आणि श्रींची आरती व नैवेद्य या सर्व कार्यक्रमांनी हरिनाम एक्क्याच्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस श्रीराम मंदिर, वैश्य वसाहत येथे साजरा करण्यात आला.

रामदासी व पारंपारिक काल्याचे भजन तसेच वीणा पूजन आणि नैवेद्य🙏❤️
30/07/2026

रामदासी व पारंपारिक काल्याचे भजन तसेच वीणा पूजन आणि नैवेद्य🙏❤️

हरीनाम एक्का कार्यक्रम, रामदासी भजन आणि वीणा पूजन🙏❤️
29/07/2026

हरीनाम एक्का कार्यक्रम, रामदासी भजन आणि वीणा पूजन🙏❤️

15/06/2026

श्रीराम मंदिर, वैश्य वसाहत, चिपळूण येथील अधिकमास सांगता २०२६🙏❤️

दोन वर्षांनी येणारा अधिकमास यावर्षी दिनांक १७ मे ते १४ जून २०२६ या कालावधी मधे होता. तरी दररोज संध्याकाळी ५ ते ६ या वेळे...
15/06/2026

दोन वर्षांनी येणारा अधिकमास यावर्षी दिनांक १७ मे ते १४ जून २०२६ या कालावधी मधे होता. तरी दररोज संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत श्रीराम मंदिर, वैश्य वसाहत, चिपळूण येथे श्रीराम जय राम जय जय राम या सामूहिक जपाचे, रामरक्षा व प्रार्थना यांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व श्रीराम भक्तांनी यात सहभाग घेऊन अधिकमासाची सांगता केली.

Address

Chiplun

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ram Mandir Vaishya Vasahat,Chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share