Aambavali Kh: My Village

Aambavali Kh: My Village Village Lovers

22/05/2019
!!! सातनंतर चिडीचूप !!!येथे सायंकाळी सातनंतर सारे चिडीचुप असते. पक्षीसुद्धा मौन पाळतात.. या भागात रडणे हेच निषिद्ध मानले...
10/10/2015

!!! सातनंतर चिडीचूप !!!
येथे सायंकाळी सातनंतर सारे चिडीचुप असते. पक्षीसुद्धा मौन पाळतात.. या भागात रडणे हेच निषिद्ध मानले जाते. कुणाला रडायचेच आहे तर त्याने वेशीबाहेर जावे, असा अलिखित नियम आहे. येथे रक्तपात केला जात नाही. येथील श्रीदेव क्षेत्रफळेश्वराला शांतता प्रिय आहे. या देवालयाच्या परिसरात असणा-या वृक्षांना कुणीही हात लावत नाही. या परिसरात एक निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो. पावसाळयात शांत आणि जसा जसा उन्हाळा वाढत जातो तसतशी तळी भरभरून वाहू लागते. या परिसरात जैव विविधतेचा खजिनाच भरलेला आहे. यामुळे रात्री १२ नंतर पहाटेपर्यंत मानवाला या भागात भ्रमंती करण्यास ग्रामस्थ मान्यता देत नाही. वैशिष्टय़पूर्ण आणि निसर्गाच्या नवलाईने भरलेला हा भाग म्हणजे श्रावण गावातील तळेवाडी !!!!
रडणे हा स्वभाव आहे. मग या स्वभावावर बंदी कोण आणू शकणार? असा कुणीही प्रश्न उपस्थित करेल. परंतु, श्रावण गावातील तळेवाडीत सूर्यास्तानंतर सारे चिडीचूप असते. भांडणतंटा नाही.. आरडाओरड नाही.. घरातला टीव्ही अथवा साऊंडचा आवाजही घराबाहेर जाऊ नये याची दक्षता घेतली जाते. येथे कुणीही रडत नाही. तशीच काही अघटित घडला घडली तरी सारे विधी शांततेने पूर्ण केले जातात. हसत-मजेत राहायचे, अशी येथील परंपरा आहे.
देवस्थान आणि येथील निसर्ग यांच्या वैशिष्टयांनी कोकणचा साज सजला आहे. असेच हे एक देवस्थान आहे. या भागातील कुणाला रडणे अनावर झाले तर तो सीमारेषेच्या बाहेर जातो. अन्यथा सूर्योदयापर्यंत तो प्रतीक्षा करतो. कणकवलीपासून १७ कि. मी. वर असणा-या श्रावण गावातील ही परंपरा आहे. गेले अनेक पिढया ही परंपरा गाववाल्यांनी जपली आहे. पूर्वी भय देवाचे असायचे म्हणून देवाच्या नावाने भीती असायची पण आता जैव विवधतेचा अभ्यास केला तर रात्रीच्या प्रवाशांना आपल्या आवाजाचा त्रास का द्यायचा? असे ग्रामस्थ सांगतात आणि देव कधी दु:खीच करणार नसेल तर रडायची भीती कुणाला ? असा ग्रामस्थांचा प्रश्न असतो.
या भागात कुठच्याही पशू अथवा प्राण्याचे रक्त जमिनीवर सांडणे म्हणजे विपरित समजले जाते. समस्त जीवांना अभय असलेल्या या परिसरात निसर्गाची नवलाई तशीच अभूतपूर्व आहे. पावसाळयात नदीनाले तुडुंब होतात. डोंगर हिरवेगार होतात. परंतु, क्षेत्रफळेश्वराची तळीची तहान भागत नाही. पण उन्हाळा जसजसा सुरू होतो तशी पाण्याची पातळी वाढू लागते. उन्हाळयात ती पूर आल्याप्रमाणे वाहते. जणू काही परिसरातील मंडळींना पाण्याची कोणतीही चिंता नको, असेच ती सांगत असते. या तळीवर सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रात शेती केली जाते.
श्रावण हे गाव आपल्या नावाप्रमाणेच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुढे आहे. गावातील प्रत्येक क्षेत्र काही ना काही वैशिष्टयांनी भारले आहे. सरपटणारे प्राणी गावात खुलेआम फिरत असतात.
गाव वैशिष्टयांनी भारलेले
श्रावण या शब्दातून आपल्याला आश्चर्य वाटेल. या श्रावण गावाच्या मुख्य स्टॉपपासून तिठयावरून आत एक नागमोडी रस्ता सुमारे ४ कि.मी. आत घुसतो. तो थेट डोंगराच्या कुशीत तळीवाडीत पोहोचतो. तळीवाडीत पोहोचण्यापूर्वी विस्तीर्ण शेत साथीला असते. कुठे नाचणी, तर कुठे वरी, कुठे भात तर कुठे तिळाची शेती.. या सा-या सौंदर्यातून रस्ता जेथे संपतो तेथे श्रीक्षेत्रफळेश्वराचे मंदिर आहे. प्रचंड वृक्षराईत चिमण्या-पाखरांच्या चिवचिवाटात क्षेत्रफळेश्वर आपल्या दरबारात सर्वाचेच जणू काही स्वागत करत असतो.
पाणी काठ सोडत नाही
या क्षेत्रफळेश्वराच्या उजव्या बाजूला तळी आहे. सुमारे ६ मीटर रुंद, ७ मीटर लांब अशा आयताकृती असलेली या तळीची खोली कोणी मोजलेली नाही. पावसाळयात महापुरातही ही तळी कधीही काठोकाठ भरत नाही. पाणी आपला काठ सोडत नाही आणि उन्हाळयात नोव्हेंबर अखेरपासून ती खळखळू लागते.
तिचे पाणी जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसे वाढत जाते आणि एक ओहोळ सुरू होतो. पाण्याच्या या अखंड स्रेतावर पूर्वी ऊस पिकविला जायचा. आता भुईमूग आणि इतर भाजीपाल्यांचे पीक घेतले जाते. या तळीच्या वाहत्या पाण्याला आणखी जोर द्यावा म्हणून उन्हाळयात येथे लाट घातली जाते.
या लाटेतून पूर्वी पाणी ओढले जायचे आणि श्रावणाचा निम्मा भाग शेतीने फुलून जायचा. ही तळी कोणी बांधली याबाबत गावात पांडवकालीन संदर्भ दिला जातो. हजारो वर्षापूर्वीचे हे बांधकाम सर्वाना आश्चर्यचकित करणारे आहे. तळीतील पाण्याची चवही वेगळीच आहे. चिरेबंदी बांधकामाने बांधलेली ही तळी पिढयान् पिढया आहे, असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात.
तळीशेजारी अनेक वनौषधींचा खजिना आहे. नान्याच्या जुनाट वृक्षाला खांद्यावर घेऊन स्थिरावलेली ही तळी श्रमसंस्कार जपणा-यांना जे जे हवे ते ते पुरविते असे ग्रामस्थ सांगतात. या तळीला उन्हाळयात पूर येतो. ती या भागाला भरभरून पाणी देते आणि पावसाळयात शांत असते. हे असे का व्हावे याबाबत गावातील लोक क्षेत्रफळेश्वराची कृपा समजतात.
पूर्वी या तळीला गावातील क

13/05/2015

आता माझं कोकण पुढे कसं असेल, त्याचं काय
होईल माहित नाही . दर वर्षी फेरी
मारताना प्रत्येकवेळी ओळखीच्या
वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे
निश्चित. माणसं बदलली आणि कोकण पालटत
चाललंय. तरीदेखील आपल्या पिढीने जे कोकण
बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल
का, कोकण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे
चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर
साकारलं जाईल का हे माहिती नाही पण तसं
नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा
प्रयत्न.
कोकण म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व
तिला आधार देणारा दिवा
कोकण म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि
गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं
वासरू
कोकण म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा,
त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी,
तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या
कोकण म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं
जातं, आज्जीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर
झालेला कारभारणीचा चेहरा
कोकण म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ,
सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर,
सागरेश्वर,
कोकण म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव,
रोखून बघत असलेले मानाचे दगड
कोकण म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी
होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला
नारळ
कोकण म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण,
त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची
घाई
कोकण म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा
आवाज, मनात असलेली भीती, वाडवडलांची
पुण्याई
कोकण म्हणजे लाल माती, मोहरत असलेला
आंबा, फणस आणि डोलणारी माडापोफळीची
झाडं
कोकण म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास,
करवंदाची घनदाट जाळी आणि कण्हेरीची फुलं
कोकण म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं,
चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण
कोकण म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला
बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा
ठेचा
कोकण म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या
आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी
कोकण म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे
आणि वाटप घातलेली उसळ
कोकण म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली
पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत
असलेलं लोणचं
कोकण म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार
पाउस, आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर
कोकण म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं,
डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून
वाहणारा व्हाळ
कोकण म्हणजे लाल डब्याची एष्टी, धुरळा आणि
नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले
आजोबा
कोकण म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा भात उसळ
आणि लाऊडस्पीकर
कोकण म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक,
उसळ आणि डबलबाऱ्या
कोकण म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट,
करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल
कोकण म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला
खांब, केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा
कोकण म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती,
शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्या आणि
पोरांचं भजन
कोकण म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा,
पूजा , शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं
कोकण म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप,
धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची
समृद्ध कला
कोकण म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं,
पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि
"टुरलामेंट"
कोकण म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा,
ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं
कोकण म्हणजे चकवणारे मासे, लागलेली रापण,
ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका
कोकण म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या
माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या
कोकण म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची
तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय
आणि सगळ्याचे डोळ्यात आलेलं पाणी
कोकण म्हणजे खूप काही सांगू पाहणारा, पूर्ण न
उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा
काशीविश्वेश्वराचा एक डाव

हर्णै बंदर
06/05/2015

हर्णै बंदर

16/03/2015

Spirit......

Address

दापोली हर्णे रस्ता
Dapoli
415712

Telephone

+919137447188

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aambavali Kh: My Village posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aambavali Kh: My Village:

Share