03/02/2023
आपण सर्वांच्या हिमतीतून आणि प्रेरणे मुळे मी ही एवढी मोठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीचा चेहरा जरी माझा असला तरी निवडणूक आपण सर्व मिळून लढलो आहोत, संपूर्ण तयारी आणि कार्य करणारे आपण सर्व आहात, यामध्ये किंचितही शंका नाही. त्यामुळे मी आभार मानायचे तर कुणाचे हेच मला दोन दिवसांपासून समजत नाही, मन भरून येते. एक एक सहकारी सर्व मतभेद विसरून अतिशय चोख पणे तन, मन, धन लावून आपली जबाबदारी पार पाडत होता. आमचे प्रभारी, राज्य समिती, विदर्भ समिती, सर्व जिल्हा व शहर तालुका समिती सदस्य आणि सर्व कार्यकर्ते ज्यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून मला साथ दिली. आयटी व सोशल मीडिया, बुथ मॅनेजमेंट, भोजन व्यवस्था असेल किंवा इतर कार्य, संपूर्ण टीम ची कामगिरी अतिशय उत्तम होती. एकूणच आपण सर्वांनी जे कार्य केले ते आभार मानण्या पलिकडील आहे, माझ्याकडे शब्द नाहीत, यवढेच मी म्हणेल. नावांची यादी खूप मोठी आहे, सर्वांनी आपसी मतभेद विसरून आपली स्वतःची निवडणूक म्हणून कार्य केले, नागपूर सह प्रत्येक जिल्ह्यातील टीम कडून झालेले कार्य हे वाखण्याजोगे आहे, आपण सर्वांची नावे लिहायची आहेत परंतु कुणाचे नाव सुटायला नको हेही तेवढेच महत्वाचे आहे. आव्हाने खूप मोठी होती, बिजेपी - काँग्रेस, त्यांची मंत्री, खासदार, आमदार सर्व प्रचारात होते, त्यांनाही आपण सर्व मिळून टक्कर दिली, निकाल काय आला हे महत्वाचे नाही, याची मला बिलकुल चिंता ही नव्हती, परंतु अल्पशा संसाधनामध्ये आपण पूर्ण तयारी करून निवडणूक लढलो, याचा आपल्याला अभिमान आहे. माझ्यात आपले आभार मानण्याची हिम्मत नाही, मी सदैव आपण सर्वांचा ऋणी राहू इच्छितो 🙏🙏🙏
आपला स्नेही
देवेंद्र वानखडे