21/08/2026
यिनच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग | Young Inspiration Network
दिनांक : १९ ऑगस्ट २०२६ | वार : बुधवार
आज अकोला येथील सकाळ कार्यालयात यिन (Young Inspirators Network) च्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास यिन चा माजी सभासद व माजी जिल्हा प्रवक्ता या नात्याने उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला अकोला शहरातील युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय नगरसेवक मा. आशिष भाऊ पवित्रकार, सकाळचे संपादक मा. योगेश फरपट सर, तसेच शासकीय रक्तपेढी, अकोला येथील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने उपस्थित युवक-युवती यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमादरम्यान यिनचा माजी सभासद व जिल्हा प्रवक्ता म्हणून मला मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. यिनच्या माध्यमातून माझ्या कार्यकाळात केलेल्या विविध सामाजिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांचा अनुभव उपस्थितांसमोर मांडत युवकांनी सामाजिक कार्य, नेतृत्व, शिक्षण आणि समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
“Inspire. Network. Deliver.” या यिनच्या प्रेरणादायी विचारातून घडलेला प्रवास आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. यिनच्या माध्यमातून मिळालेली नेतृत्वाची संधी, सामाजिक जाणीव आणि कार्य करण्याची दिशा ही माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण शिकवण आहे.
यिन अकोल्याचे यिन अधिकारी व माझे मित्र मयूर टाले यांची विशेष आभार सदर कार्यक्रमा आयोजित करून मला कार्यक्रमाला बोलून सन्मान दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..🙏
यिनच्या १२ वर्षांच्या प्रेरणादायी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
Sumit Sheku - सुमित शेकू