Clicky

Maha Info Centre, New Delhi

Maha Info Centre, New Delhi Official page of Maharashtra Information Centre, Directorate General of Information & Publ

Operating as usual

महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता ; केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता                    ...
06/05/2022

महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता ; केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता
: बंदरे विकास मंत्री अस्लम शेख

नवी दिल्ली, 6 : महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता असून यासाठी केंद्र शासनाचे सहकार्याची आवश्यकता असल्याची भुमिका राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी आज येथे मांडली.

येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमालाची ३ री शिखर बैठक पार पडली. यावेळी श्री शेख बोलत होते. याबैठकीची अध्यक्षता केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय शिक्षण मंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनू ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विविध राज्यांचे बंदर विकास मंत्री उपस्थित होते. राज्याचे बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी राज्याच्यावतीने उपस्थित होते.
राज्याला 720 किलो मीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्ह्यात अंदाजे 114 कि.मी., ठाणे व पालघर जिल्हा मिळून 127 कि.मी., रायगड जिल्ह्याला 122 कि.मी., रत्नागिरी जिल्ह्याला 237 कि.मी., तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 कि.मी. ची किनारपट्टी आहे. या किनारपट्टीवर जवाहरलाल नेहरू बंदर विश्वस्त ही 2 बंदरे केंद्र शासनाच्या अंतर्गत व इतर 48 बंदरे राज्याच्या किनारपट्टीवर आहेत. या 48 बंदरांवर राज्य शासनाकडून विविध विकासकामे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून केली जात असल्याची माहिती श्री शेख यांनी बैठकीत दिली. 52 दशलक्ष टनापेक्षा अधिक मालवाहक कामे केली असल्याची माहिती श्री शेख यांनी यावेळी दिली. राज्यातील रो-रो (रोल टू रोल) सेवेबद्दल राज्यातील प्रवाशांनकडून मिळत असलेला प्रतिसाद बघता राज्यात रेडीयो क्लब, मुरूड-जंजीरा, एलीफंटा, पद्मदूर्ग, सुवर्णदूर्ग या 5 ठिकाणी प्रवासी तसेच पर्यटन जेट्टी उभारण्याची मंजुरी राज्याला प्रदान करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत श्री शेख यांनी केली. यामुळे याठीकाणी रो-रो सेवा सुरू करता येईल, असेही श्री शेख यांनी सांगितले.
बंदरे औद्योगिक क्षेत्र (पोर्ट इंडस्ट्रीयल झोन) काळाची गरज
बंदरे औद्योगिक क्षेत्र आता काळाची गरज आहे. बंदरे औद्योगिक क्षेत्रामुळे बंदरे क्षेत्राशी निगडीत आधुनिक सोयीसुविधा किना-यालगतच उपलब्ध करता येतील, असे सांगुन यासाठी जमीनीची गरज आहे. जमीन अधिग्रहण हा विषय केंद्र शासनाच्या अख्यारीत आहे. बंदर औद्योगिक क्षेत्रासाठी राज्य शासनाला जमीन उपलब्ध व्हावी, अशी मागणी करीत श्री शेख यांनी राज्य शासन यासाठी 50 % टक्के चा वाटा उचलण्याची ग्वाही दिली.
समुद्रातील साचलेल्या गाळामुळे मच्छीमारांना आणि रो-रो सेवेवर त्याचा दूष्‍परिणाम होत आहे. ही बाब केवळ राज्याची नसून ज्या राज्यात समुद्र किनारे आहेत त्यांनाही समुद्री गाळाची समस्या भेडसावत असल्याचे सांगत, केंद्र शासनाने याकडे लक्ष देऊन राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी श्री शेख यांनी बैठकीत केली.
समुद्री किना-याला लागून महामार्ग आणि रेल्वे सेवा कशा करता येतील यावरही केंद्र शासनाने लक्ष देण्याची गरज अधोर‍ेखित करत, वाहतुक संपर्क साधने समुद्री किना-यालगत असल्यास त्याचा अधिक लाभ होऊ शकेल, असे सांगुन यामध्ये राज्यशासनही आपली भागीदारीता देईल, यावरही श्री शेख यांनी दुजोरा दिला.
यावेळी बैठकीत बंदराच्या अन्य विषयासंदर्भातही आढावा घेण्यात आला.

06/05/2022

दिल्लीत आयोजित राष्ट्रीय सागरमाला अपेक्सच्या बैठकीत आज राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री असलम शेख यांनी केलेल्या विविध मागण्यांविषयी महाराष्ट्र परिचय केंद्राला माहिती दिली.👇

05/05/2022

आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्राणपणाने लढलेले एक कृतिशील आणि प्रयोगशील राजे छत्रपती #शाहूमहाराज यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी येत्या ६ मे रोजी सकाळी १० वा. १०० सेकंद उभे राहून छत्रपती शाहूंना अभिवादन करू या.

#लोकराजाशाहू
#शाहूस्मृतीशताब्दी
#वंदनलोकराजाला

02/05/2022

' जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले.. ' या अप्रतिम रचनेचे गझलकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी महासंचालक तथा मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये ही गझल सादर केली. डॉ. पांढरपट्टे यांची आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट.

02/05/2022

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी महासंचालक तथा मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ.दिलीप पांढरपट्ट यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. डॉ.पांढरपट्टे एक उत्तम गझलकार असून त्यांनी यावेळी'जीवनाचा गोषवारा' गझल सादर केली.

62nd State Day celebrated with an Array of cultural Dances at Maharashtra SadanNew Delhi, 01: The 62nd Maharashtra Stat...
01/05/2022

62nd State Day celebrated with an Array of cultural Dances at Maharashtra Sadan

New Delhi, 01: The 62nd Maharashtra State Day was celebrated with great fervor at Maharashtra Sadan, in New Delhi with an array of cultural folk dances, Ovi-Bhupali, Vasudev dance, Lavni, Bharud, Gondhal and Powada, mesmerizing the audiences.

The Resident Commissioner Dr Nirupama Dange lighted the lamp and the cultural evening commenced at Maharashtra Sadan, K.G.Marg. The Assistant Resident Commissioner, Shri Rajesh Adpawar and other officers and staff was also present during this event.

A cultural evening was organized by the office of Maharashtra Sadan and the department of cultural affairs, government of Maharashtra. The cultural troupe from Kolhapur, Shreeja Lok Sanskriti Kala Sansthan presented an array of cultural dances, showcasing a variety of traditional and cultural heritage of the State. The event also celebrated the “Azadi Ka Amrit Mahotsav” along with the Ministry of Culture, government of India. The Delhiites got to witness various cultural performances from all over the state. Prior to this evening, Dr. Dange had hoisted the flag at both the Sadans of Maharashtra in the morning.

The event started with the “Ganesh Vandana”. A total of 25 artists presented a vibrant show mesmerizing the audiences. The show directed by Chandrakant Patil (Prithvi Innovations), Kolhapur, presented a variety of traditional folk dances including Vasudev dance which is sung delicately and with whirling dance steps narrating anecdotes of Lord Krishna. It was followed by the Shetkari (Farmers’ dance), Adivasi dance, Waghya Murali or a Bhaktigeet, which is a dance of the pair Waghya and Murali who devote their entire lives in the worship of Khandoba of Jejuri. And dance to the accompaniment of percussion instruments and bells. Jogwa, and the widely acclaimed Lavni Dance, Koli (Fishermen danceform), Gondhal, a dance form said to be created when warrior-sage Parashuram killed the demon Betasur. Then came the Dhangari (Shepherd) dance. With this, followed the Povada- a dance form that showcases the lifetime achievements of Chhatrapati Shivaji Maharaj. The audience was spellbound with the Lavani, a well known dance form.

The event started by praying Lord Ganesh with the Ganesh Vandana, Ovi-Bhupali and concluded by reciting the divine Shivgeet and Maharashtra Geet.
************
AKArora/ engnews/1.5.2022

दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र दिन’उत्साहात साजरानवी दिल्ली,1: महाराष्ट्र राज्याच्या ...
01/05/2022

दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र दिन’उत्साहात साजरा

नवी दिल्ली,1: महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त आज महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भुपाळी, वासुदेव नृत्य,जात्यावरील ओवी, भारूड, गौळण, लावणी, कोळीनृत्य आदि समृध्द लोककलांच्या दमदार सादरीकरणाने राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

कस्तुरबागांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेटहॉल मध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निरुपमा डांगे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही महाराष्ट्र दिनाच्या औचीत्याने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारस्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने कोल्हापूर येथील श्रीजा लोककला संस्थेच्या कलाकारांच्या चमुने यावेळी दमदार सादरीकरण केले.

महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

भुपाळीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले. मंगळागौर सणाची झलकच यावेळी रंगमंचावर बघायला मिळाली. यावेळी मंगळागौरीचे विविध गाणे गात त्यावर कलाकारांनी ठेका धरला. नारळी पोर्णिमेचा सण व कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगितांचे सादरीकरणही झाले. वारकरी संताचे प्रसिध्द भारूडही यावेळी सादर झाले. लावणी ,गौळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

राज्यातील आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, वाघ्या-मुरळी आदींनी रसिकांच्या टाळया मिळविल्या. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.
00000

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरानवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे ...
01/05/2022

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला.निवासी आयुक्त (अ.का.), डॉ.निरूपमा डांगे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गायनासह उपस्थितांनी ध्वज वंदन केले. या कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक (अ.का.) तथा जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून आलेले व महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“महाराष्ट्र दिना”निमित्त नवीन महाराष्ट्र सदनातील बँक्वेट हॉलमध्ये सायं.5.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निवासी आयुक्त (अ.का.), डॉ.निरूपमा डांगे (भा.प्र.से.) यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
AK Arora /वृत्त वि. क्र.72/ दिनांक 01.05.2022

01/05/2022

#महाराष्ट्रदिन

१ मे १९६० महाराष्ट्र स्थापना दिवस असा साजरा झाला...

💐महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

#MaharashtraDay
#महाराष्ट्रदिन

5 हजाराच्या खाली प्रलंबित केसेस आणण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न :संसदीय कार्यमंत्री अनिल परब नवी दिल्ली दि. 30 : प्रलंबित ...
30/04/2022

5 हजाराच्या खाली प्रलंबित केसेस आणण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न :

संसदीय कार्यमंत्री अनिल परब

नवी दिल्ली दि. 30 : प्रलंबित न्यायालयीन केसेसच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकषांची पुर्तता करून प्रलंबित केसेस कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस पाऊले उचलली जात असून येत्या काळात 5 हजाराच्या खाली केसेस आणण्याचे लक्ष्य राज्य शासन लवकरात लवकर पुर्ण करणार असल्याची, माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी आज येथे दिली.

विज्ञान भवनात राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या 11 व्या संयुक्त परिषदेचे आयोजन केंद्रीय विधी मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती यु. यु. ललित, विधीमंत्री किरेन रिजिजू आणि विधी राज्य मंत्री एस. पी. सिंग बघेल, मंचावर उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश, राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपाल या परिषदेला उपस्थित होते. बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिपाकंर दत्ता, बॉम्बे उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे या परिषदेस उपस्थित होते.
न्यायपालिकेला सशक्त करण्यासाठी पुरक व्यवस्था देण्याचे काम राज्यशासनाकडून केले जात आहे. यासह न्यायपालीकेकडून पायाभुत सुविधा अथवा अन्य कामांसाठी निधीची मागणी केली जाते, त्याप्रमाणे राज्यशासन न्यायपालिकेला निधी उपलब्ध करून देत असतो. वर्ष 2016 मध्ये झालेल्या परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांची अमंलबजावणी राज्य शासनाकडून केली गेली असल्याची माहिती श्री परब यांनी यावेळी दिली.
वर्ष 22-23 च्या अर्थसंकल्पात न्यायालयीन
पायाभूत सुविधेसाठी 495 कोटींची तरतूद
न्यायालयीन व्यवस्था मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधा पुर‍विणे महत्वाचे असून यासाठी वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पात राज्यशासनाने 495 कोटींची तरतूद केली असल्याचे श्री परब यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय प्रायोजित योजनेतून 60 टक्के निधी आणि राज्यशासनाकडून 40 टक्के निधी देण्याचे निश्चित आहे. त्याप्रमाणे राज्यशासनाने तरतूद केलेली आहे. यातंर्गत नवीन न्यायालय इमारत, आणि निवासी घरे बांधण्यात येईल, अशी माहिती श्री परब यांनी यावेळी दिली.
यासह 1 एप्रिल ला राज्यशासनातर्फे काढण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यात 14 कौटूंब‍िक न्यायालय नियमीत केली गेली आहेत, असेही श्री परब यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील न्यायीक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी एकूण 2357 न्याय‍ीक अधिका-यांची पदे मंजुर करण्यात आलेली आहेत. प्रलंबित न्यायालीयन केसेसचा निपटारा करण्यासाठी राज्यात 23 ग्राम न्यायालय कार्यरत आहेत. राज्यात एकूण 138 फास्ट ट्रॅक न्यायालयांना मान्यता दिलेली आहे. यापैकी 38 न्यायालय पोस्कोसाठी वापरली जातील. राज्यात 16 व्यावसायिक न्यायालयांना मान्यता आहे. त्यापैकी 6 न्यायालये मुंबई शहरात सुरू आहेत अशी माहिती श्री परब यांनी याप्रसंगी दिली. .
45 कंत्राटकी न्यायालयीन व्यवस्थापक पदे मंजुर केलेली असून सध्या ही पदे कार्यरत आहे. राज्यशासनाने वर्ष 2021-2022 मध्ये 32 कोटी 92 लाख 97,000 हजार रूपयांचा निधी कायदेशीर मदतीसाठी राखीव ठेवला होता, त्यापैकी 28 कोटी 61 लाख 84,000 हजार रूपयांचा निधी खर्च झालेला आहे. यावर्षी 2022-2023 मध्ये 35 कोटी 68 लाख 99,000 हजार रूपयांचा निधी कायदेशीर मदतीसाठी अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आलेला असल्याची माहिती श्री परब यांनी दिली.
आतापर्यंत राज्यातील अकोला, गडचिरोली, जळगाव, रायगड, वाशीम, अहमदनगर, औरंगाबाद, औरंगाबाद उच्च न्यायालय, नंदूरबार, सिंधुदुर्ग या 10 ठीकाणी पर्यायी विवाद निराकरण केंद्र उभारण्यात आलेले आहे. यासाठी 14 कोटी 57 लाख 22 हजार 081 रूपयांचा निधी खर्च करण्यात आलेला असल्याचे श्री परब यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरीनवी दिल्ली दि. 30 :राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र ...
30/04/2022

राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 30 :राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन साजरी करण्यात आली.

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांनी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनअभिवादन केले.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आम्हाला ट्विटर वर फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

27/04/2022

पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्ली येथे आयोजित रायसीना चर्चेत (Raisina Dialogue 2022) सहभाग घेवून विचार मांडले.

27/04/2022

पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित रायसीना चर्चेत (Raisina Dialogue 2022) सहभाग घेवून विचार मांडले.

27/04/2022

पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी आज #दिल्ली येथे रायसीना चर्चेत (Raisina Dialogue 2022) सहभाग घेतला, याविषयी त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला माहिती दिली.

Union Railway Minister Assures to Integrate NCMC Card along with other pending Maharashtra’s Rail Projects— Tourism Mini...
26/04/2022

Union Railway Minister Assures to Integrate NCMC Card along with other pending Maharashtra’s Rail Projects
— Tourism Minister Aditya Thackeray

New Delhi, 26: Integration of National Common Mobility Card along with Mumbai Subarbun Rail and various other pending projects will be expedited. An assurance in this regards was given by the Union Railway Minister, informed State’s Tourism Minister, Shri Aditya Thackeray, here today.
The Tourism and Environment Minister, Shri Aditya Thackeray called on the Union Railway Minister, Shri Ashwini Vaishnaw at Rail Bhavan. A meeting with regards to National Common Mobility Card (NCMC) and various pending rail projects of the state was held between both the Ministers.
After the meeting, Shri Thackeray informed the mediapersons about the deliberations held with the Union Railways Minister. He informed that, he urged the Union Minister to integrate services of the Mumbai Suburban Rail network with the National Common Mobility Card, which was launched by the Chief Minister, Shri Uddhav Thackeray on Monday.
Informing further, Shri Thackeray said, the Union Minister has given his consent to integrate with the NCMC and assured of all cooperation and that he would expedite it for the railways. He further informed about the station and station area development along with civic services and other modes of public transport.
Discussions on various issues with Shri Ashwini Vaishnaw like Delisle Road bridge, MMRDA metro- railway crossings and joint ops with BMC for pre monsoon works and more importantly, it’s role in the Dharavi Redevelopment Plan were also deliberated, informed Shri Thackeray.
Shri Thackeray said that the Union Rail Minister has assured of all cooperation.
Tributes To Chhatrapati Shivaji Maharaj
After the meeting, Shri Thackeray visited Maharashtra Sadan and paid humble tributes to the great Maratha Warrior, Chhatrapati Shivaji Maharaj. Later, he inspected the premises of Maharashtra Sadan and took a review meeting of the works executed by sadan officials and he was accompanied by Senior Members of Parliament, Shri Anil Desai and Ms Priyanka Chaturvedi during this time.
*********************************
AKArora/ engnews/2022

Address

A/8 Sate Emporium Building, Baba Kharak Sing Marg, New Delhi-11000
Delhi
110001

Telephone

+911123367830

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Info Centre, New Delhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maha Info Centre, New Delhi:

Videos

Nearby government services


Other Government Organizations in Delhi

Show All

Comments

*भारतविरोधी खोटी वृत्ते पसरवल्याबद्दल 35 यूट्यूब चॅनेल्स, 2 संकेतस्थळे ब्लॉक* *आपल्या बातम्या व जाहिरात संपर्क 8329354008*
कोव्हीड प्रतिबंधक लस ही पुर्णपणे सुरक्षित आहे. तरी, पात्रतेनुसार त्वरीत लसीच्या मात्रा घ्या. असे आवाहन अभिनेता भारत गणेशपुरे यांनी केले आहे. Bharat Ganeshpure | जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती | Collector Office Amravati -जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती | Amravati Municipal Corporation | Maharashtra DGIPR | Maha Info Centre, New Delhi #MahaVaccination #VaccineSaves #VaccinationIsEssential #VaccinationHaiJaroori #GetVaccinated #WearMask #StaySafeStayHealthy #MahaArogya #IECBureau #Maharashtra
#AICTEdge Watch webinar on 360 Degree Feedback (👉https://smartcookie.in/AICTE-360degreefeedback) for faculty members of #Engineering & #Polytechnic Inst. recognized by All India Council for Technical Education in #Bihar, #Maharashtra & #MadhyaPradesh on April 12 at 3pm. LIVE on http://youtube.com/MediaAICTE Ministry of Education Dr.Ramesh Pokhriyal Nishank Sanjay Dhotre Press Information Bureau - PIB, Government of India Press Information Bureau in Maharashtra Directorate of Technical Education, Madhya Pradesh Department of Higher Education, Madhya Pradesh Bihar Education Department Maha Info Centre, New Delhi
#AICTEdge #Online Talk by #GlobalTeacherPrize 2020 Winner #RanjitsinhDisale - #Teacher who transformed #girls #education with QR coded textbooks. LIVE @ http://youtube.com/MediaAICTE on 16 Mar 2021 @ 4pm Ministry of Education Dr.Ramesh Pokhriyal Nishank Sanjay Dhotre Smriti Zubin Irani Press Information Bureau - PIB, Government of India Maha Info Centre, New Delhi Maharashtra State Innovation Society Maharashtra National Council for Teacher Education Ministry of Women & Child Development, Government of India https://youtu.be/mfGTiB11qNA Video: Global Teacher Prize
सुंदर काव्यवाचन
नमस्कार
The Governor of Maharashtra Shri Bhagat Singh Koshyari hosted a reception for the cadets of Maharashtra National Cadet Corps, returning from the Republic Day Camp and felicitated prize-winning cadets at Raj Bhavan, Mumbai, today The Governor complimented Maharashtra NCC for winning the second Best Directorate trophy at RDC held in New Delhi. Maj Gen Y P Khanduri, Additional DG, Maharashtra NCC, officers of armed forces and members of Maharashtra NCC contingent were present. DDSahyadri Allindiaradionews Nagpur All India Radio News Mumbai All India Radio News Pune Maha Info Centre, New Delhi Maharashtra DGIPR
#Maharashtra Chief Minister felicitates 26 National Cadet Corps cadets from the state for excellent performance in Republic Day Parade 2021 Maharashtra NCC contingent stood in overall 2nd position out of 17 Directorates for the prestigious Prime Minister’s banner 📒pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1694369 ADGPI - Indian Army DDSahyadri All India Radio News Mumbai All India Radio News Pune Allindiaradionews Nagpur Maharashtra DGIPR Maha Info Centre, New Delhi
‘इफ्फी’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट माईघाट आणि मल्याळम चित्रपट जलीकट्टू हे दोन चित्रपट भारतातर्फे 'सुवर्ण मयुर पुरस्कार' स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहेत. २० देशांचे १५ चित्रपट ईफ्फी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. IFFI Goa #InternationalFilmFestivalGoa #Film #IFFIGoa #SuvarnaMayurAward #सुवर्णमयुरपुरस्कार #माईघाट #जलीकट्टू Maharashtra Information Centre PR Activity
LANGUAGE OF THE UNIVERSE Infinite objects scenario in the universe is a miracle. It opens up a different angle whether there is any other universe? Just look at the sky and harmonious behaviour of the nature. Our safe day to day life on earth is apparently due to absence of collusions at a noticeable scale except natural wear and tear of objects. This safety is because of gravitation impact of each object and regulated space in between. Gravitation impact must be in varying degrees due to prevalent conditions from object to object. Lesser is the gravitation, more is the energy output. So E=mc2 on earth could undergo a change elsewhere as for the said equation conditions on the earth are specific. There are two evident groups in universe, living and nonliving; both carrying soul energy, the former with self-activation and latter needing external support. The energy in nonliving is not as powerful as that in living. Ageing in both is natural, entry and exit is beyond imagination. The exit may be absorbed in nature. Nothing happens at random but on a calculated format which is not restricted to known mathematics. Oxygen for living is on earth. This might be in different manner on other objects. So there is a certainty of living elsewhere too, may be even in advanced technology. Perhaps knowing other living pattern would go a long way as medical support and backup. The existence of other universal setups cannot be ruled out; as there may be safe distance between them like objects in the known universe. It appears that there must be one common language in waves spread in the universal frames for communication purpose and on which footing the natural phenomenon rests on sound and safe pillars. The language is made known to us by thunders, lightening, and sounds of waves. Further the universal language is presented through beautiful seasons. Our weather forecasts depend upon wave movements and degrees of sound. Study of atomic sub particles in communication waves would pave way to understand some threads of universal language. Once this is analysed, messages of any calamities would be in sight along with remedy routes. This is complicated but simple once energy wave functioning is within our reach through common universal language. To put the best foot forward, framing a full-fledged probe of the nature is essential. Natural rules will ever remain permanent and scripting thereof is paramount. Flow of waves encompasses the universe covering all that exists in visible and invisible sectors. Nature is a big treasure and atomic sub particles are the basics. Interestingly all objects might be having soul energy and inter 2 communications must be on with some common language in waves as otherwise concealed harmonious splendor is impossible. Segregation of communication waves is the prime need to enrich discovery dimensions. Everything is in abundance and only routes are to be revealed. Like mobile operations some code numbers of the universal setups and that of each object may be functioning, decoding of which is possible through atomic sub particle wave communicators. Virtual reality is nature is not completely known to science; even a part is also incomplete. Green neighborhoods on earth will be a good step for environment care. Tapping and transformation in waves is responsible for universal installation and development. Due to environment disturbances, wear and tear and fast ageing of objects including earth, a changed scenario can occur. A new ball moves efficiently but damaged one would restrict its action; likewise ageing of objects would develop wobbling in rotations causing problems beyond control. Such a situation would affect life. So clean environment is to be maintained to help the earth in particular and the universe in general to at least some extent. Mathematics and knowledge of atomic sub particles is to be achieved through universal language for which segregation of communication wave areas is to be sourced out. Perhaps then regular and irregular tapping and transformation of atomic sub particles may be in sight with causes thereof which would benefit to prevent natural crisis situations. At the end everything is in plenty in the universal sub particle waves, out of which communication waves are to be separately studied to know universal language. This universal language would take us beyond horizon to reach the sky, the common universal umbrella. This route will open windows for immeasurable parameters so far unknown to benefit the mother earth by which minimum inputs and maximum results will be on the card for world citizens welfare. Basically world citizens are first universal citizens and therefore nature would look after the earth through our sincere efforts to keep the atmosphere pollution free. 3 In mathematics 1 plus 1 equals to 2 on the earth but if values thereof differ on other objects due to different gravitation range, the result of 2 on the earth would be either less or more for energy output. The net result of energy is after defying gravitation only. Again square of any figure is more than addition; but in case of square 1 and 2 it is not so; 1 plus 1 = 2 and square of 1 is 1 and 2 plus 2 = 4 and square thereof is also 4. Therefore some combination is needed through universal language to support probing calculation of the universal working. Finally the universal language is the only source to decipher universal conditions and codes to have sound accounting system to adopt the theory of relativity between the earth and the rest of the universe in totality. This may be termed as a magic method but its relevance requires to be investigated to improve quality of life on the earth. Science is important for which science of science is essential to relate the earth conditions to the rest of the universe for better results as the earth is a part of the sprawling universe. H V Navangul Age 83
*नमस्कार...* *मी राजेश चौकेकर...* आज मला तुमच्याशी या माध्यमातुन बोलण्याची संधी मिळाली...या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो... *माझा विषय असा होता...* या रोजच्या धकाधकिच्या जीवनात आपण जगत आहोत... आपण लहान होतो कधी मोठे झालो. वया नुसार लग्नाच्या बंधनात आलोकधी कळलंच नाही... मुलं ही झाली. प्रत्येकावर जबाबदारीचं ओझं आलं... प्रत्येकजण कशात ना कशात गुंतला आहे... पण स्वःताला वेळ मात्र देवु शकत नाही. कुटुंबाला वेळ देणं तर लांबच विचार करा आपण आतुन खुप खुप त्रस्त आहोत... रोज तेच तेच हा सगळा विचार करता... यातुन एक विषय जो माझ्या हाती लागला...त्याला यश आलं आणी जर्मनी मधुन या विषयाला सादर केल्यास श्री.नागेश कुमारधारा यानां या विषयातली डॉक्टरी पदवी दिली... थोडक्यात सांगण प्रचंड अवघड आहे मित्रहो...पण ज्या कंपनी मध्ये मी सभासद आहे...त्या कंपनीच नावं आहे lets treval free ही कंपनी आपल्याला भारतात अनलिमिटेड तुमची ईच्छा असेल त्या वेळी *जम्मु कश्मीर पासुन कन्याकुमारी* पर्यंत फिरण्याची सोय करते. त्या मध्ये आपल्या इच्छेने पाहीजे त्या स्टेट मध्ये ते ही free.... *3 स्टार , 4 स्टार , 5 स्टार हॉटेल* मध्ये राहण्याची सोय करते. व साईड सिन ते ही दोन ते तीन दिवस , त्यामध्ये सकाळी नाश्ता , दुपारचं जेवण , रात्रीच जेवण.... *विश्वास ठेवा मित्रहो* सकाळी नाश्ता करिता 85 + प्रकारचे मेनु , दुपारच्या जेवणात 100 + प्रकारचे मेनु (वेज नॉनव्हेज) आणी रात्रीच्या जेवणात 100 + प्रकारचे मेनु (वेज नॉनव्हेज) अनलिमिटेड प्रत्येकाची चव घ्यायची जरी म्हंटली तरी आपण 20व्या मेनु पर्यंत पोचत नाही...इतकं अप्रतिम रॉयल जेवण तुम्ही कल्पना ही करू शकतं नाही... या कंपनी मार्फत आपल्याला विदेशात ही अनलिमिटेड फिरण्याची सोय करून देते. तुमची ईच्छा असेल त्या वेळी *श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, दुबई, बाली इंडोनेशिया,* अश्या बऱ्याच फॉरेन टूर फिरण्याची सोय करते. त्या मध्ये आपल्या इच्छेने पाहीजे त्या इंटरनेशनल टूर वर आपण जाऊ शकतो.. ते ही free.... *3 स्टार , 4 स्टार , 5 स्टार हॉटेल* मध्ये राहण्याची सोय करते. व साईड सिन ते ही चार ते पाच दिवस त्यामध्ये सकाळी नाश्ता , दुपारचं जेवण , रात्रीच जेवण.... *विश्वास ठेवा मित्रहो...* सकाळी नाश्ता करिता 100 + प्रकारचे मेनु , दुपारच्या जेवणात 100 + प्रकारचे मेनु (वेज नॉनव्हेज) आणी रात्रीच्या जेवणात 100 + प्रकारचे मेनु (वेज नॉनव्हेज) अनलिमिटेड. प्रत्येकाची चव घ्यायची जरी म्हंटली तरी आपण सर्व मेनु पर्यंत पोचत नाही...इतकं अप्रतिम रॉयल जेवण तुम्ही कल्पना ही करू शकतं नाही... आणी विशेषतः त्यात विमानप्रवास सुद्धा free 10 लाखांचा इन्शुरन्स सुध्दा त्या मध्ये समाविष्ट आहे...तो ही अगदी free *विश्वास ठेवा...* *फिरून आल्यानंतर तुमच्या तोंडुन आपसुक नक्की निघेल.* आयुष्य खुप सुंदर आहे.आणी जगण्याला आता खरी मजा आहे. *विश्वास बसत नसेल तर* *एकदा नक्की चर्चा करा...* *आणी आपलं अधुर स्वप्न साकर करा...आणी स्वर्गातला आनंद या प्रुथ्वितलावरच घ्या....* *-: अधिक माहितीसाठी संपर्क :-* श्री.राजेश साबाजी चौकेकर. *9158856037* संपुर्ण भारतात सेवा...