Audumbar Panchal Honalikar

Audumbar Panchal Honalikar जिल्हा परिषद सदस्य,लातूर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस🇮🇳
समाजसेवक | देशभक्त
मो.नं-9763400440

"ही लातूर हाय पिल्लू !" या संवादातून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!   ...
16/06/2026

"ही लातूर हाय पिल्लू !" या संवादातून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
😎

💐 माझे आधारस्तंभ,मा.श्री अभय दादा साळुंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून संघर्षाच्...
16/06/2026

💐 माझे आधारस्तंभ,मा.श्री अभय दादा साळुंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून संघर्षाच्या बळावर उभे राहून, विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला प्रवास आज लातूर जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करणारा ठरला आहे. सलग दुसऱ्यांदा लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होणे ही त्यांच्या नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांमधील विश्वासाची मोठी पावती आहे.

जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन चालणारे, एकदा भेटलेल्या व्यक्तीला नावानिशी लक्षात ठेवणारे, ग्रामीण मातीतली साधी-सरळ पण प्रभावी भाषणशैली जपणारे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे नेतृत्व म्हणजे अभय दादा साळुंके.

"ही लातूर हाय पिल्लू!" या संवादातून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या दादांनी आपल्या खेडवळ शैलीने आणि जनसामान्यांशी असलेल्या नाळेमुळे लाखो लोकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

ईश्वरचरणी प्रार्थना की, आपल्याला निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेचे अधिक सामर्थ्य लाभो.

जनतेचा नेता, कार्यकर्त्यांचा आधार, संघर्षातून घडलेले नेतृत्व — अभय दादा साळुंके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🌹

माझे मार्गदर्शक, देवणी तालुक्याची आन बान शान  आदरणीय मा.श्री.मलिकार्जुन मानकरी सावकार तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते...
05/06/2026

माझे मार्गदर्शक, देवणी तालुक्याची आन बान शान आदरणीय मा.श्री.मलिकार्जुन मानकरी सावकार तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या कार्यातून समाजाला नेहमीच प्रेरणा मिळत राहो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यशाची अखंड साथ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🌹
शुभेच्छुक
– औदुंबर पांचाळ होनाळीकर
सदस्य, जिल्हा परिषद लातूर
प्रतोद महाविकास आघाडी लातूर

26/05/2026
मा. श्री. डॉ.शिवाजीराव काळगे साहेब यांची भेट घेऊन देवणी तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत चालण्यासाठी तसेच नवीन डीपीचे कनेक्श...
25/05/2026

मा. श्री. डॉ.शिवाजीराव काळगे साहेब यांची भेट घेऊन देवणी तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत चालण्यासाठी तसेच नवीन डीपीचे कनेक्शन तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध विकासकामे व प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

😎

आज लातूर येथे माझे प्रेरणास्थान श्री अभय दादा साळुंखे यांची लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या 'जिल्हाध्यक्ष' पदी निवड झाल्...
25/05/2026

आज लातूर येथे माझे प्रेरणास्थान श्री अभय दादा साळुंखे यांची लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या 'जिल्हाध्यक्ष' पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक ,:–जिल्हा परिषद सदस्य.औदुंबर पांचाळ होनाळीकरdeshmukh

_shivaji_kalge

😎

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होनाळी येथे ध्वजरोहन सोहळा संपन्न..      होनाळी येथे आज दिनांक 1मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व...
01/05/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होनाळी येथे ध्वजरोहन सोहळा संपन्न..
होनाळी येथे आज दिनांक 1मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त होनाळी येथील *औदुंबर पांचाळ होनाळीकर* (जिल्हा परिषद सदस्य लातूर) यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेचा ध्वजरोहन करण्यात आला. या वेळी सरपंच, मा.सरपंच, जिल्हा परिषदेचे शिक्षक,अंगणवाडी ताई,ग्राम पंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🌹सरस्वती माध्यमिक विद्यालय होनाळी येथे ध्वजरोहन सोहळा संपन्न..      होनाळी येथे आज दिनांक 1मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व...
01/05/2026

🌹सरस्वती माध्यमिक विद्यालय होनाळी येथे ध्वजरोहन सोहळा संपन्न..
होनाळी येथे आज दिनांक 1मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त होनाळी येथील *औदुंबर पांचाळ होनाळीकर* (जिल्हा परिषद सदस्य लातूर) यांच्या हस्ते विद्यालयात ध्वजरोहन करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे सचिव श्री उत्तमराव बाबाराव कारभारी,मुख्याध्यापक श्री. एम. एन. काकनाळे, श्री. एस ए बिराजदार, पाटील एस. एम., बिरादार डि. आर., सुधीर साबणे, बिरादार एम. जी., बिरादार जी. एम., देशमुख आर. एम., इंद्राळे डि. टी.सह कर्मचारी उपस्थित होते.

आज बोरोळ येथे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी बैठक घेण्यात आली यावळी जिल्हा परिषद सदस्य औदुंबर पांचाळ होनाळीकर,पंचायत समित...
16/04/2026

आज बोरोळ येथे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी बैठक घेण्यात आली यावळी जिल्हा परिषद सदस्य औदुंबर पांचाळ होनाळीकर,पंचायत समिती सदस्य गजानन भैया भोपणीकर,सरपंच कृष्णा पाटील,पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, पाणी पुरवठा गुत्तेदार, गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..


deshmukh

Address

Deoni
413519

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Audumbar Panchal Honalikar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share