18/06/2025
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष (PM DA-JGUA) अभियान अंतर्गत धुळे जिल्ह्यातील २१३ अनुसूचित जमाती वास्तव्य असणाऱ्या गाव / पाडा / वस्ती / मध्ये आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून रस्ते,पक्की घरे, पाण्याची व्यवस्था , विद्युत पुरवठा ,अंगणवाडी केंद्र बांधणे,पोषण स्थिती सुधारणे, कोशल्य विकास प्रशिक्षण देणे , कृषी , मस्त्य , पर्यटनाचा विकास इत्यादी घटकांचा समावेश असून या योजनांच्या माध्यमातून गाव पाड्याचा विकास करण्याची कार्यवाही जिल्हास्तरीय यंत्रणे मार्फत करण्यात येत आहे. सदर योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना व्हावा यासाठी दिनांक १५ जून २०२५ ते ३० जुन २०२५ या कालावधीत Dharti Aaba Abhiyan Awareness and Benefit Saturation Camps चे नियोजन खालील आश्रमशाळा मध्ये करण्यात आलेले आहे.
1. दिनांक- 19.6.2025 सुकापूर ता साक्री व कोडीद ता. शिरपूर
2. दिनांक – 20.6.2025 उमरपाटा ता साक्री व लौकी ता. शिरपूर
3. दिनांक – 23.6.2025 बोपखेल ता साक्री व उमरदा ता. शिरपूर
4. दिनांक – 24.6.2025 शेवगे ता साक्री व जामन्यापाडा ता. शिरपूर
5. दिनांक – 25.6.2025 शिरसोले ता साक्री व हिवरखेडा ता. शिरपूर
6. दिनांक – 26.6.2025 रोहोड ता साक्री व अर्थे खुर्द(शिरपूर टोलनाका जवळ) ता. शिरपूर
7. दिनांक – 27.6.2025 नवापाडा ता साक्री / अक्कलकोस ता. शिंदखेडा
8. दिनांक – 30.6.2025 राईनपाडा ता साक्री व कुसुंबा ता. धुळे
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी सदर कॅम्प मध्ये उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी केले आहे