04/06/2026
यवतमाळ–वाशीमच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत सेवा करण्याची संधी दिली, यासाठी मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.
गेल्या दोन वर्षांत खासदार म्हणून यवतमाळ–वाशीमच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे मी कार्य करत आहे. या प्रवासात येथील मायबाप जनतेने मला आपल्या मुलाप्रमाणे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिला. जनतेच्या या प्रेमाने आणि पाठिंब्याने माझी जबाबदारी अधिक वाढली असून, प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.
यवतमाळ–वाशीमच्या जनतेने दिलेले प्रेम, स्नेह आणि विश्वास हीच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे. आपल्या आशीर्वादाच्या बळावर विकास, जनकल्याण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी यापुढेही अधिक समर्पित भावनेने कार्य करत राहीन.
आपले प्रेम, आशीर्वाद आणि साथ हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.
~ संजय उत्तमराव देशमुख
खासदार यवतमाळ वाशिम लोकसभा
#यवतमाळ #वाशिम #लोकसभा #२वर्ष #संजयदेशमुख