15/11/2025
मयूर भाऊ मनःपूर्वक आभार !!
#आदर्श_रक्तदाता ❤️
खरंतर निगेटीव्ह रक्तगट म्हंटल की नेहमीची दमछाक होतेच.. त्यातल्या त्यात 'रोशन खडके' या मुलासाठी रक्तदाता शोधणं नेहेमीची दमछाक कारण त्याला प्रत्येक १५ दिवसांनी रक्तदाता शोधावा लागतो. ( थॅलेसेमिया ) पण यावेळेस दिवाळीपासून या मुलासाठी आमची खूप तारांबळ उडाली.. कारण महिन्याभरात याला दोन तीन वेळा रक्तदाते शोधावे लागले ते ही निगेटीव्ह रक्तगटाचे.
पण एक वेळ अशी आली की हॉस्पिलमधून जवळपास दोन वेळा रोशनला परत जावं लागलं रक्तावाचून.. तो भिंवडी ते सायन हॉस्पिटलपर्यंत प्रवास करतो.. आणि हा प्रवास त्याच्यासाठी कोणत्याच दृष्टीने परवडणारा नाही.. खासकरून शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या.. त्यामुळे आधीच HB कमी असल्याने शारीरिक अवस्था कमकुवत होते आणि ही मुलं घाबरू लागतात..मग अशावेळेस कुणीतरी 'रोशन साठी' मेसेज बनवून सोशल मीडियावर फिरवला.. आणि त्याचा परिणाम की रोशन साठी आधी फक्त एक कॉल येत होता.. नंतर सगळीकडून कॉल येऊ लागले.. (सांगायचा उद्देश हाच की कुणाला माहीत नाही की ही केस आपल्याकडेच आहे)
त्यामुळे ताण आणखी वाढला..
पण या Negative रक्तगटाचा ताणतणाव सुरू असताना एक Positive गोष्ट घडली आणि सोशल मीडियावरची पोस्ट पाहून मयूर भाऊंनी स्वतःहून मेसेज केला.. आणि ही धावपळ थांबली..
स्वतः जे जे रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत असणारे मयूर दादा सामाजिक भान ठेवत सायन हॉस्पिटलला जाऊन रक्तदान करून आले. एक अनोळखी व्यक्ती माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीच्या आवाहनाला प्रतिसाद देतो.. आणि आमच्या दोघांसाठी चेहऱ्याने अनोळखी असलेल्या 'रोशन साठी' आम्ही धावपळ करू शकतो ही आहे सोशल मीडियाची ताकद... हे आर्वजून नमूद करावंसं वाटतं !! ❤️
मयूर दादा तुमचा हा पुढाकार आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता... त्यासाठी तुमचे आम्ही ऋणी असू !! ❤️
थॅलेसेमिया आजार असलेल्या मुलांच्या शरीरात रक्त तयार होत नाही त्यामुळे रोशन सारख्या अश्या अनेक मुलांना रक्ताची वारंवार गरज लागते.. तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन या अश्या मुलांना त्यांचं जगणं सुखकर करण्यासाठी मदत् करू शकता...
नक्की संपर्क करा ! ❤️
#लढारक्तदानाचा