Jagadguru Swami Shantigiriji Maharaj

Jagadguru Swami Shantigiriji Maharaj Shantigiriji Maharaj is continuing the work of Janardhan Swami. He is coveted with “Dharma Sanskar”, with his work towards common man and the society.

As the Jagadguru of Juna Akhada and the dedicated Uttaradhikari of Nishkam Karmayogi Jagadguru Janardan Swami (Maungiriji) Maharaj, Swamiji is committed to carrying forward the divine mission of his Guru.Join us on this journey of faith & selfless service He has received the honor of Shri Shri 1008. He believes that this honor has increased his responsibilities towards the nation and its people. W

ith the blessing of Babaji, he is confident of completing the work of Babaji with the help of all you devotees.

📖🙏 ।। श्री गणेशाय नमः ।।‘श्री सार्थ एकनाथी भागवत’ हे भक्ती, ज्ञान व सद्गुरु कृपेचे दिव्य मार्गदर्शन आहे. चला, भागवत अध्य...
31/05/2026

📖🙏 ।। श्री गणेशाय नमः ।।
‘श्री सार्थ एकनाथी भागवत’ हे भक्ती, ज्ञान व सद्गुरु कृपेचे दिव्य मार्गदर्शन आहे. चला, भागवत अध्ययनातून जीवन समृद्ध करूया. 🚩
#श्रीसार्थएकनाथीभागवत #भागवत

ॐ निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी, अध्यात्म शिरो...
29/05/2026

ॐ निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी, अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत अधिक मासानिमित्त भक्त परिवारासाठी श्रीक्षेत्र खलघाट येथे विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा समारोप अनुष्ठानाची सांगता व यज्ञपूर्णाहुतीने करण्यात आला. यावेळी हजारो भाविक व संत महंतांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. समारोपाच्या महाप्रसादासाठी हजारो भाविकांना आमरसाची पंगत करण्यात आली.

॥ श्रीक्षेत्र खलघाट - अधिक मास विशेष कार्यक्रम ॥ॐ निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज या...
27/05/2026

॥ श्रीक्षेत्र खलघाट - अधिक मास विशेष कार्यक्रम ॥

ॐ निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी, अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत अधिक मासानिमित्त भक्त परिवारासाठी श्रीक्षेत्र खलघाट येथे विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरूंच्या बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा स्नान व विधी, कन्यापूजन, अनुष्ठान असे विविध उपक्रम संपन्न होत आहे. या ठिकाणी सहभागी झालेल्या भाविकांनी बाबांच्या श्रमदान परंपरेत सहभागी होऊन आश्रमीय परिसराची स्वच्छता केली.

🌼📖 ॥ श्री सार्थ एकनाथी भागवत ॥ 📖🌼🙏 सद्गुरु कृपा • भक्ती • नामस्मरण 🙏ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा दिव्य संदेश देणारे📚 श्री...
24/05/2026

🌼📖 ॥ श्री सार्थ एकनाथी भागवत ॥ 📖🌼

🙏 सद्गुरु कृपा • भक्ती • नामस्मरण 🙏

ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा दिव्य संदेश देणारे
📚 श्री सार्थ एकनाथी भागवत
हे केवळ ग्रंथ नाही, तर जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक दीप आहे। ✨🪔

🌿 संतसंग मन शुद्ध करतो
🌿 सद्गुरु कृपा जीवन उजळवते
🌿 हरिनाम मनाला शांती देते

💫 “हरिनामातच मनाचे समाधान आणि जीवनाचे कल्याण आहे.” 💫

🙏 ॥ जय हरि विठ्ठल ॥
🙏 ॥ जय सद्गुरु ॥
🙏 ॥ जय बाबाजी ॥

🌼📖✨🪔🙏🌿💫

#श्रीसार्थएकनाथीभागवत #एकनाथमहाराज #भागवतधर्म #सद्गुरु #नामस्मरण #भक्ती #आध्यात्मिकविचार #मराठीपोस्ट #जयबाबाजी #हरिनाम

📖 श्री सार्थ एकनाथी भागवत🌺 अध्याय १ – ओवी १ 🌺🙏ॐ नमो श्रीजनार्दना ।नाही भवाभवभावना ।न देखोनी मीतूपणा ।नमन श्रीचरणा श्रीसद...
23/05/2026

📖 श्री सार्थ एकनाथी भागवत
🌺 अध्याय १ – ओवी १ 🌺

🙏
ॐ नमो श्रीजनार्दना ।
नाही भवाभवभावना ।
न देखोनी मीतूपणा ।
नमन श्रीचरणा श्रीसद्गुरुराया ।।१।।

🪔 मराठी अर्थ :
हे श्रीसद्गुरु जनार्दन स्वामी! आपणास नमस्कार असो.
आपल्या स्वरूपात जन्म-मृत्यू, संसार-असंसार असा कोणताही भेद नाही.
‘मी’ आणि ‘तू’ असा अहंभावही तेथे नाही.
अशा अद्वैतस्वरूपी सद्गुरु श्रीजनार्दनांच्या पवित्र चरणांना माझे विनम्र नमन. 🙏🌺

✨ सद्गुरु चरणी अहंकार विरघळतो आणि आत्मज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो. ✨

📚🙏🌺

#श्रीसार्थएकनाथीभागवत #अध्याय१ #ओवी१ #संतएकनाथमहाराज #जनार्दनस्वामी #सद्गुरु #भक्ती #ज्ञान #नामस्मरण #भागवतधर्म #मराठी #आध्यात्म #जयहरि 🙏📖

📖🌼 ॥ श्री सार्थ एकनाथी भागवत ॥ 🌼📖🙏 भागवत धर्म – संत परंपरा – सद्गुरु कृपा 🙏जीवनात सुख-दुःख, लाभ-हानी येत राहतात; पण भागव...
23/05/2026

📖🌼 ॥ श्री सार्थ एकनाथी भागवत ॥ 🌼📖

🙏 भागवत धर्म – संत परंपरा – सद्गुरु कृपा 🙏

जीवनात सुख-दुःख, लाभ-हानी येत राहतात; पण भागवत धर्म आणि सद्गुरुंचा मार्ग मनाला स्थैर्य, श्रद्धा आणि भक्ती देतो। 🌺

📚 श्री सार्थ एकनाथी भागवत आपल्याला शिकवते —
✨ संतसंग हे जीवनाचे भूषण आहे
✨ सद्गुरु कृपा ही आध्यात्मिक उन्नतीची किल्ली आहे
✨ नामसंकीर्तन हे कलियुगातील श्रेष्ठ साधन आहे

🕉️ सद्गुरुंचे स्मरण, हरिनामाचा जप आणि सदाचारयुक्त जीवन हेच खरे आध्यात्मिक धन। 🙏

🌿 “हरिनामातच मनाचे समाधान आणि जीवनाचे कल्याण आहे.” 🌿

🙏 जय हरि विठ्ठल । जय सद्गुरु । जय बाबाजी । 🙏

#श्रीसार्थएकनाथीभागवत #भागवतधर्म #सद्गुरु #संतसंग #नामस्मरण #भक्ती #एकनाथमहाराज #जयबाबाजी #आध्यात्मिकपोस्ट #मराठीविचार

ॐ निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी, अध्यात्म शिरो...
20/05/2026

ॐ निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी, अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत 'ॐ जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा' अत्यंत उत्साहात, भक्तीमय वातावरणात पार पडला.
संपूर्ण जगामध्ये शांतता नांदो आणि सर्वांचे कल्याण व्हावे, या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रोच्चारांच्या जयघोषात आणि अखंड नंदादीपाच्या साक्षीने देवतेचा विधीवत महाअभिषेक व यज्ञकर्म पूर्ण झाले. यामुळे संपूर्ण परिसर पवित्र ऊर्जेने न्हाऊन निघाला होता. या सोहळ्यात केवळ उपासनाच नव्हे, तर 'सेवा'ही घडली. अनेक भाविकांनी अत्यंत उत्साहाने श्रमदान उपक्रमात आपला सहभाग नोंदवत 'सेवा परमो धर्म:' हा संदेश सार्थ केला. श्री बाबाजींच्या विचारांचा आशिर्वादाचा हा सोहळा कोकणवासियांसाठी आणि येथे आलेल्या प्रत्येक भाविकासाठी एक अविस्मरणीय आणि आत्मिक आनंद देणारा ठरला.
JaiBabaji

03/05/2026

गुरुकुल प्रवेश महोत्सव सुरू झालेले आहे, मर्यादित जागा असल्याने कृपया काळजी घेणे.

https://jaybabaji.org/registration-2025-rzp/

"श्रमातून घडली सृष्टी, भक्तीने लाभली दृष्टी"निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या ...
03/05/2026

"श्रमातून घडली सृष्टी, भक्तीने लाभली दृष्टी"

निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या आशीर्वादाने उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत बौद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जनशांती धाम, ओझर (मिग), जि.नाशिक येथे भव्य श्रमदान आणि सत्संग मार्गदर्शन उत्साहात संपन्न झाले.
​ हजारो हातांनी एकत्र येत सद्गुरूंचा जयघोष करत परिसराची स्वच्छता आणि विकासकामात अनेकांनी सहभाग नोंदविला. तहान-भूक विसरून भाविक आश्रमीय परिसरात मग्न झाले होते. यावेळी झालेल्या सत्संगात महात्माजींनी मार्गदर्शनातून "श्रम आणि धर्म" यांचे महत्त्व पटवून दिले. "जो करील श्रमदान, त्याची घडेल चारीधाम" या बाबाजींच्या विचारांचा आदर्श भाविकांनी जपत ही परंपरा चालू ठेवली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पडला. जगतगुरु जनार्दन स्वामींच्या या श्रमदान परंपरेचा वारसा आपण असाच अखंड चालू ठेवूया.

Address

Om Jagadguru Janardan Swami (Maungiriji) Maharaj Ashram, Verul (Ellora), Tq. Ratnapur (Khultabad), Dist. Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra 431102
Ellora
431102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagadguru Swami Shantigiriji Maharaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jagadguru Swami Shantigiriji Maharaj:

Share