SwamiShantigiriji

SwamiShantigiriji Shantigiriji Maharaj is continuing the work of Janardhan Swami. He is coveted with “Dharma Sanskar”, with his work towards common man and the society.

As the Jagadguru of Juna Akhada and the dedicated Uttaradhikari of Nishkam Karmayogi Jagadguru Janardan Swami (Maungiriji) Maharaj, Swamiji is committed to carrying forward the divine mission of his Guru.Join us on this journey of faith & selfless service He has received the honor of Shri Shri 1008. He believes that this honor has increased his responsibilities towards the nation and its people. W

ith the blessing of Babaji, he is confident of completing the work of Babaji with the help of all you devotees.

26/08/2026

पुष्प-१ श्रीमद भागवतकथा वक्ते ब्र.रामानंदजीमहाराज श्रीजनेश्वर महादेवमंदिरवर्धापनदिन श्रीक्षेत्रवावी

🌺 नागपंचमी जपानुष्ठान सोहळ्याची भक्तिमय सांगता! 🌺श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्...
25/08/2026

🌺 नागपंचमी जपानुष्ठान सोहळ्याची भक्तिमय सांगता! 🌺

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या वार्षिक परंपरेतील नागपंचमी जपानुष्ठान सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत ‘ॐ जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा’ संपन्न झाला. यावेळी भक्तिरसात भाविक न्हाऊन निघाले.
सांगतेच्या दिवशी श्री बाबाजींची भव्य पालखी मिरवणूक सवाद्य त्र्यंबकनगरीतून काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. त्यानंतर तीर्थराज कुशावर्त येथे भाविकांनी दर्शन घेत भक्तीचा आनंद अनुभवला. या सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विशेष भेट देऊन श्री बाबाजींचे शुभाशीर्वाद घेतले. आश्रमातील संतांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनुपम संगम असलेल्या या सोहळ्याने त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिमय झाली.

🌺 त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीमय नागपंचमी जपानुष्ठान सोहळा! श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगु...
24/08/2026

🌺 त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीमय नागपंचमी जपानुष्ठान सोहळा!

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या वार्षिक परंपरेतील नागपंचमी जपानुष्ठान सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्याला साधू-संतांची विशेष उपस्थिती लाभली. 🙏 या निमित्ताने आश्रमात आगमन झालेल्या साधू-संतांच्या सेवेसाठी भव्य संत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. संतसेवा, भक्ती, साधना आणि अध्यात्मिक परंपरेचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळत आहे.
🌿 संतसेवेतून अध्यात्म, साधनेतून आत्मशांती आणि भक्तीतून समाजकल्याणाचा संदेश!
🙏 जय बाबाजी!

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज वार्षिक परंपरेतील ना...
24/08/2026

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज वार्षिक परंपरेतील नागपंचमी जपानुष्ठान सोहळा त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या सोहळ्याला
त्र्यंबकेश्वर-इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर, सिन्नर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विठ्ठलराव उगले यांनी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले.

24/08/2026

पुष्प०२श्रावण मास-नागपंचमी निमित्त🕉जगद्गुरूजनशांतीधर्म सोहळा २०२६ त्र्यंबकेश्वर

23/08/2026

पुष्प ०१ श्रावण मास-नागपंचमी निमित्त🕉 जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा २०२६ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर

नागपंचमी जपानुष्ठान सोहळ्यात आध्यात्मिक अनुभूतीचा जागरश्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु...
22/08/2026

नागपंचमी जपानुष्ठान सोहळ्यात आध्यात्मिक अनुभूतीचा जागर

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या वार्षिक परंपरेतील नागपंचमी जपानुष्ठान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत हा भव्य-दिव्य सोहळा सुरू आहे..या सोहळ्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्त कुंभमेळा समन्वयक तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वरजी नाईक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्म जागरण विभागाचे प्रचारक महेंद्रजी रायचूरा यांनी भेट देऊन दर्शन घेतले. कार्यक्रम समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उपस्थित भाविकांना संबोधित करत आध्यात्मिक साधना, संस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले..श्रद्धा, साधना आणि सेवाभावाने भारलेल्या या सोहळ्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी श्री बाबाजी स्थापित हृदयेश्वर महादेव मंदिराचे दर्शन मान्यवरांनी घेतले.

🚩 || ॐ त्र्यंबकेश्वराय नम: || 🚩ॐ जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा || पवित्र गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी, ब्रह्मगिरी पर्वताच्या...
20/08/2026

🚩 || ॐ त्र्यंबकेश्वराय नम: || 🚩
ॐ जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा ||

पवित्र गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी, ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज वार्षिक परंपरेतील नागपंचमी जपानुष्ठान सोहळा त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या निमित्ताने आयोजित 'ॐ जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा' अतिशय भक्तिमय वातावरणात सुरू आहे. श्रावण मास व नागपंचमीच्या पावन पर्वावर आयोजित या अनुष्ठान, अभिषेक, अखंड नंदादीप व सत्संग सोहळ्यात सहभागी होऊन अनेक भाविक सज्जन श्री बाबाजींचा कृपाशीर्वाद प्राप्त करत आहेत.
२४ ऑगस्टपर्यंत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (ॐ जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रम), ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे हा सोहळा संपन्न होत आहे. वृक्षरोपण,संतपूजन व भंडारा, महिलांना वस्त्रदान, अन्नदान, शोभायात्रा, कुशावर्त स्नान व गोदावरी आरती अशा उपक्रमांच्या आयोजन सोहळ्यात करण्यात आले आहे.

17/08/2026

पुष्प ०२ श्रावण मास - नागपंचमी निमित्त 🕉 जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा २०२६ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर

16/08/2026

पुष्प ०१ श्रावण मास - नागपंचमी निमित्त 🕉 जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा २०२६ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर

Address

Om Jagadguru Janardan Swami (Maungiriji) Maharaj Ashram, Verul (Ellora), Tq. Ratnapur (Khultabad), Dist. Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad)
Ellora
431102

Alerts

Be the first to know and let us send you an email when SwamiShantigiriji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SwamiShantigiriji:

Shortcuts

Share