BJP4Gadchiroli Shahar

BJP4Gadchiroli Shahar BJP Gadchiroli Shahar Vidhansabha
This Is Official Page

30/11/2025

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी सौ. अॅड प्रणोती सागर निंबोळकर सक्षम नेतृत्व ! 2 तारखेला कमळाचं बटन दाबून बहुमताने विजयी करा!

28/11/2025

"गडचिरोलीसाठी मनापासून... जनतेच्या मनाचा उमेदवार." "गडचिरोली शहराचा विकास करणारा उमेदवार सौ. अॅड प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर)

#भाजप



#प्रणोतीसागरनिंबोरकर



#नगराध्यक्षउमेदवार #नगरपरिषदइलेक्शन2025
Pranoti Nimborkar



#गडचिरोलीनगरअध्यक्षउमेदवार2025

25/11/2025
25/11/2025

वचनपूर्ती

कृषी विभागाच्या भव्य सभागृहासाठी
#गडचिरोली_नगर_परिषद_क्षेत्मध्ये
मा. आम. डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या विशेष प्रयत्नाने
#₹12_कोटी_मंजूर

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक - 2025

सौ. ऍड प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर)

#भाजप

#प्रणोतीसागरनिंबोरकर

#नगराध्यक्षउमेदवार #नगरपरिषदइलेक्शन2025
#गडचिरोलीनगरअध्यक्षउमेदवार2025
#नगरपरिषदगडचिरोली

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra Ashok Nete MP Milind Ramji Narote Dr.Deorao Holi Krushana Damaji Gajabe M L A Pranoti Nimborkar

21/11/2025

गडचिरोली नगर परिषद निवडणुकीनिमित्त प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
चामोर्शी बस स्टॉप समोर, चामोर्शी रोड, गडचिरोली
उद्या | सकाळी 11:30 वाजता

मा. चंद्रशेखर बावनकुळे
मंत्री, महसूल विभाग - महाराष्ट्र राज्य

भव्य प्रचार कार्यालय उदघाटन सोहळा
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही
विनंती.
#गडचिरोली िषद

*_मा.खा.अशोकजी नेते यांची नव शारदा उत्सव मंडळ सोनापुर काँम्प्लेक़्स व नवदुर्गा उत्सव मंडळ,कलेक्टर कॉलनी गडचिरोली येथे नव...
11/10/2024

*_मा.खा.अशोकजी नेते यांची नव शारदा उत्सव मंडळ सोनापुर काँम्प्लेक़्स व नवदुर्गा उत्सव मंडळ,कलेक्टर कॉलनी गडचिरोली येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्त सदिच्छा भेट..._*
दिं. १० ऑक्टोंबर २०२४
गडचिरोली शहरातील नव शारदा उत्सव मंडळ सोनापुर काँम्प्लेक़्स व नवदुर्गा उत्सव मंडळ,कलेक्टर कॉलनी या मंडळाच्या वतीने विराजमान माँ. शारदा माता,माँ. दुर्गा देवींची स्थापना करण्यात आली.
या नवरात्री उत्सवा निमित्ताने माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती म.रा.चे अशोकजी नेते यांनी भक्तिमय वातावरणात पूजा-आरती करून मनोभावे दर्शन घेतले आणि देवींच्या चरणी नतमस्तक झाले.तसेच उपस्थित सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मा.खा.नेते यांना सोनापूर कॉम्प्लेक्स व कलेक्टर काँलनी येथील नागरिकांनी‌ वार्डातील रोड, नाल्यासंबंधी समस्या सांगितले यावेळी जनतेच्या समस्या जाणून घेत आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासित केले.

यावेळी भाजपा नेते जनार्धनजी साखरे,भालचंद्र कोटगले, डोरलीकर,ड्रायव्हर मारोडेजी, प्रभाकर बुल्ले, राजू फुकटे, दिपचंद डोंगरे, पवन मेश्राम, प्रभाकर खोब्रे, प्रशांत टेकाम
सचिन राऊत, अजित बिक्कड तसेच मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येनी भाविक भक्त व नागरिक बंधू भगिनीं उपस्थित होते.

*भाजपा युवा मोर्चा ची जिल्हा बैठक मा.खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*गडचिरोली:-भारतीय जनता पार्टी युवा मोर्च...
11/10/2024

*भाजपा युवा मोर्चा ची जिल्हा बैठक मा.खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*

गडचिरोली:-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली ची बैठक दिं.०९ आक्टोंबर २०२४ ला.शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या जिल्हा युवा मोर्चाच्या बैठकीला अध्यक्षीय म्हणून मार्गदर्शन करतांना माजी खासदार अशोकजी नेते यांनी म्हणाले अगोदर माझी ही सुरुवात भाजपाचा युवा मोर्चा पासुनच झाली. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचे का मी युवा मोर्चा पासूनच सुरुवात केली.त्यांनतर हळूहळू मी संघटनेचे काम वाढवून गडचिरोलीत भारतीय जनता पार्टी हा पक्ष मोठा करण्यात माझाही मौलाचा वाटा आहे. त्याचच श्रेय आपल्याला मिळत आहे.यासाठी युवा मोर्चांनी चांगलं प्रभावीपणे काम करावे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांची महत्त्वाची जबाबदारी असून या युवकांनी भाजपाचा विजयाचा संकल्प करत संघटनेचे काम करावे.संघटने मध्ये काम करत असतांना अनेक अडीअडचणी येतात.यावर मात करत संघटन वाढवावे पदाची गरिमा काम करणाऱ्याच व्यक्तीवर अवलंबून असते.या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकासाभिमुख कामे मि केलेले आहेत.जसे रेल्वेे,चिचडोह, कोटगल बँरेजेस,गोंडवाना विद्यापीठ, मेडिकल कॉलेज,कृषी महाविद्यालय,रस्त्याचे, नॅशनल हाँयवेचे कामे असे अनेक विकास कामे केलेले आहेत हे जनतेपर्यंत युवा मोर्चानी पोहोचवावे.असे प्रतिपादन मा.खा.नेते यांनी या युवा मोर्चाच्या जिल्हा बैठकीत केले.

मंचावर बैठकीला प्रामुख्याने माजी.खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती म.रा. श्री. अशोकजी नेते,आमदार डॉ.देवरावजी होळी,प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे बाबुरावजी कोहळे,प्रदेश चिटणीस भाजयुमो चिंतामण जी जोशी,प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो अनिलजी डोंगरे, प्रदेश सोशल मिडिया प्रमुख व्हि.एन.रेड्डी जी, जिल्हाध्यक्ष भाजयुमो गडचिरोली अनिलजी तिडके,भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर,आशिषजी कोडापे, मंगेशभिऊ रणदिवे,रोहणकर जी तसेच बैठकीत जिल्ह्यातील भाजयुमो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*_गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांवर माजी खा.अशोक नेते यांची राज्यपालांसोबत चर्चा..._**_सिंचन, रस्ता, आरक्षणासह ओब...
03/10/2024

*_गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांवर माजी खा.अशोक नेते यांची राज्यपालांसोबत चर्चा..._*

*_सिंचन, रस्ता, आरक्षणासह ओबीसी जनगणनेची मागणी.._*

दिं.०२ ऑक्टोंबर २०२४

गडचिरोली : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आज बुधवारी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांची निवेदने स्वीकारली. यावेळी माजी खासदार आणि भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी त्यांना चार मुद्द्यांबाबत निवेदन देऊन राज्यपालांशी चर्चा केली.
त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याची नोंद घेतली.

जिल्ह्यातील सिंचन, रस्ते, बंगाली समाजाचे आरक्षण आणि ओबीसी जनगणना या मुद्द्यांना मा.खा.नेते यांनी या चर्चेत हात घातला.

त्या चार मुद्द्यांमध्ये महाराष्ट्रातील पुनर्वसित बंगाली बांधवांमधील नमोशुध्द्र पोंड्रो व राजवंशी यांना पूर्वीप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यासाठी 2019 मध्ये बार्टीकडून झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी महाराष्ट्र शासनाला शिफारस करण्याची मागणी करण्यात आली. इतर राज्यांप्रमाणे या बंगाली बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

तसेच चामोर्शी ते हरणघाट मुल या राज्य मार्ग क्र.378C या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी. हा राज्यमार्ग चंद्रपूर-गडचिरोली-राजनांदगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.930 आणि साकोली-गडचिरोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 353C ला चामोर्शीला जोडतो. चामोर्शी ते मूल या 27 किमी अंतरात सध्या
सध्या खूप जास्त प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. या राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केल्यास दोन्ही महामार्ग जोडल्या जाऊन परिसराचा विकास होऊ शकतो, असे नेते यांनी राज्यपालांना सांगितले. चामोर्शी-हरणघाट-मूल या रस्त्याची निविदा होऊन खुप दिवस झाले आहेत, परंतु संबंधित कंत्राटदारानी कामाची सुरवात अतिशय संथगतीने केली असून कामाचा दर्जाही खराब आहे.

Address

Gadchiroli
Gadchiroli
442605

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP4Gadchiroli Shahar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP4Gadchiroli Shahar:

Share