मुक्तिपथ

मुक्तिपथ Mukipath is a joint initiative of Government of Maharashtra, Tata Trusts and SEARCH to reduce the pr

जगभरातील मृत्यूच्या आणि रोगांच्या प्रमुख तीन कारणांत तंबाखू आणि दारू हयांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यव्यापी गुटखा व सुगंधित तंबाखूबंदी केली असूनही जिल्ह्यामधे तंबाखूचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. गडचिरोली जिल्ह्यातील लोकांत तंबाखू वापराचे सरासरी प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असून तंबाखूवर खर्चही फार मोठ्या प्रमाणावर होतो. ‘सर्च’ ने 2008-09 साली केलेल्या एका अभ्यासानुसार या वर्षात ग

डचिरोलीतील लोकांनी तंबाखूवर 73 कोटी रुपये खर्च केले.
दारू ही देखील आरोग्याला आणि विकासाला मारक ठरते. गडचिरोली जिल्हेयातील जनतेने केलेल्या आंदोलनानंतर गडचिरोलीत 1993 पासून दारूबंदी झाली पण दारूबंदीची अंमलबजावणी अपुरी राहीली. दारूची दुकाने आणि पिण्याचे परवाने रद्द केल्यानंतर अन्य कोणतीच शासकीय कृती न केल्याने अवैध दारूचे प्रमाण बरेच फोफावले.
गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू विकत घेण्यावर लोकांचा प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च होतो. त्यामुळे होणारे दुष्परिणाम – रोग, मृत्यू, उत्पादक शक्ती ची हानी, स्त्रियांवर अत्याचार व अपघात – प्रचंड असणे तर्कसिद्ध आहे. म्हणून गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व दारुचा वापर वेगाने कमी करणे हे आरोग्य रक्षण व आर्थिक विकासासाठी आवश्यक ठरते.
महाराष्ट्र शासन , टाटा ट्रस्ट व सर्च यांच्या संयुक्त पुढाकाराने दारु-तंबाखुचा वापर कमी करण्यासाठी, गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तिपथ’ हा बहु आयामी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सप्टेबर 2016 पासुन या प्रकल्पाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सुरु झाली आहे.

मुक्तिपथकडून चिचोली व आरसोडामध्ये तंबाखूमुक्त जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, फलक व गाण्यांच्या म...
08/09/2026

मुक्तिपथकडून चिचोली व आरसोडामध्ये तंबाखूमुक्त जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, फलक व गाण्यांच्या माध्यमातून गावात तंबाखूविरोधी जनजागृती केली.

मुक्तिपथकडून आरमोरीतील पळसगाव जि. प. शाळेत तंबाखूमुक्त जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले घोष...
05/09/2026

मुक्तिपथकडून आरमोरीतील पळसगाव जि. प. शाळेत तंबाखूमुक्त जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले घोषवाक्यांचे फलक घेऊन गाणी व घोषणांच्या माध्यमातून संपूर्ण गावात तंबाखूविरोधी जनजागृती केली.

डोंगरी येथे शक्तिपथची बैठक घेण्यात आली. मोहापासून लाडू व पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन...
04/09/2026

डोंगरी येथे शक्तिपथची बैठक घेण्यात आली. मोहापासून लाडू व पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात आले.
गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोहफुलापासून विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याबाबत माहिती घेतली.

मुक्तिपथकडून महागाव बुज येथे अहिंसक कृती करण्यात आली. ४५ ड्रम दारुनिर्मितीसाठीचा सडवा नष्ट करण्यात आला.तसेच वाघोली, वेलत...
03/09/2026

मुक्तिपथकडून महागाव बुज येथे अहिंसक कृती करण्यात आली. ४५ ड्रम दारुनिर्मितीसाठीचा सडवा नष्ट करण्यात आला.
तसेच वाघोली, वेलतूर तुकूम, लखमापूर बोरी व चामोर्शी वॉर्ड येथे अहिंसक कृतीदरम्यान देशी दारूसाठा नष्ट करण्यात आला.

मुक्तिपथकडून जांभळी येथील जि. प. शाळेत तंबाखूविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी नागरिकांना तंबाखूमुक्त ज...
02/09/2026

मुक्तिपथकडून जांभळी येथील जि. प. शाळेत तंबाखूविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी नागरिकांना तंबाखूमुक्त जीवनाचा संदेश दिला.
रॅलीमध्ये गावातील प्रमुख व्यक्ती व शाळेतील शिक्षकवृंद सहभागी झाले.

मुक्तिपथकडून आरमोरीतील जोगीसाखरा येथे तंबाखूविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी  घोषवाक्यांसह  तंबाखूविरो...
31/08/2026

मुक्तिपथकडून आरमोरीतील जोगीसाखरा येथे तंबाखूविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांसह तंबाखूविरोधी जनजागृती केली.
पालकांचा सहभाग वाढवून तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

मुक्तिपथकडून नगरी, मेडाराम, रंगायपल्ली, पेंटीपाका आणि घोटसूर या गावांमध्ये तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम आणि जनजागृती रॅली ...
29/08/2026

मुक्तिपथकडून नगरी, मेडाराम, रंगायपल्ली, पेंटीपाका आणि घोटसूर या गावांमध्ये तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम आणि जनजागृती रॅली काढण्यात आली. या उपक्रमाला गावकरी व शाळेतील शिक्षकवृंदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.

आरमोरीतील पिसेवडधा येथे मुक्तिपथची अवैध दारूविरोधात अहिंसक कारवाई.सुमारे ३९ हजारांचा दारूनिर्मितीचा मुद्देमाल जप्त करून ...
27/08/2026

आरमोरीतील पिसेवडधा येथे मुक्तिपथची अवैध दारूविरोधात अहिंसक कारवाई.

सुमारे ३९ हजारांचा दारूनिर्मितीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
मुक्तिपथ गाव संघटना, शक्तिपथ स्त्री संघटना आणि तालुका टीमचा सहभाग.

मुक्तिपथकडून चव्हेला येथील जि. प. शाळेत तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी फलक व घोषवा...
27/08/2026

मुक्तिपथकडून चव्हेला येथील जि. प. शाळेत तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी फलक व घोषवाक्यांसह जनजागृती रॅली काढली.
शक्तिपथ संघटनेचे पदाधिकारी आणि गावातील प्रमुख व्यक्तींनी रॅलीत सहभाग घेतला.

मुक्तिपथकडून आरमोरीतील डोंगरगाव भुसारी जिल्हा परिषद शाळेत तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर...
26/08/2026

मुक्तिपथकडून आरमोरीतील डोंगरगाव भुसारी जिल्हा परिषद शाळेत तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तंबाखू व दारूविरोधी जनजागृती रॅली काढली. रॅलीद्वारे गावकऱ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावकरी उपस्थित होते.

Address

Gadchiroli
Gadchiroli
442603

Alerts

Be the first to know and let us send you an email when मुक्तिपथ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मुक्तिपथ:

Shortcuts

Share