Ajay Sadashiv Kothewar

Ajay Sadashiv Kothewar माजी ग्राम पंचायत सदस्य, गोरेगांव,
केंद्रीय सचिव महाराष्ट्र राज्य,
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद माजी अध्यक्ष जिल्हा शाखा गोंदिया.

१४/०४/२०२६आज चंद्रपुरटोली, गोरेगाव येथील बौद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण...
14/04/2026

१४/०४/२०२६

आज चंद्रपुरटोली, गोरेगाव येथील बौद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या महान विचारांची आठवण करून देत समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

#डॉबाबासाहेबआंबेडकर #संविधान #भारतरत्न #शिल्पकार #महामानव

१४/०४/२०२६📍 भा.ज.प कार्यालय, गोरेगावआज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वाताव...
14/04/2026

१४/०४/२०२६
📍 भा.ज.प कार्यालय, गोरेगाव

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या महान कार्याचा गौरव करत समाजात समानता आणि संविधानिक मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या प्रेरणेतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

#डॉबाबासाहेबआंबेडकर #भारतरत्न #संविधान #शिल्पकार #महामानव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏समाजातील अन्याय, विषमता आणि भेदभावाविरुद्ध लढा देत ...
14/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

समाजातील अन्याय, विषमता आणि भेदभावाविरुद्ध लढा देत त्यांनी समानतेचा दीप प्रज्वलित केला. भारतीय संविधानाच्या रूपाने त्यांनी देशाला लोकशाहीची भक्कम पायाभरणी दिली.

त्यांचे विचार आजही प्रत्येकाला शिक्षण, स्वाभिमान आणि हक्कांसाठी जागृत करतात.

“जीवन मोठं नाही, महान असलं पाहिजे” — हा त्यांचा संदेश आपल्याला प्रेरणा देत राहो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार सदैव आपल्या मार्गदर्शनासाठी प्रेरणादायी राहतील.

जय भीम! 💙

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

#डॉबाबासाहेबआंबेडकर #शिल्पकार #महामानव #भारतरत्न #संविधान

अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणारे,शोषितांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारे,स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महा...
11/04/2026

अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणारे,
शोषितांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारे,
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महान विचारवंत
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

त्यांचे कार्य आणि विचार हे केवळ इतिहास नाही,
तर आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आहे.

चला, त्यांच्या समतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांना पुढे नेऊया
आणि एक सशक्त समाज घडवूया.

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

#क्रांतिसूर्य #ज्योतिबा_फुले #महात्मा #शिक्षण #समाजसुधारक

माननीय आमदार श्री. संजयजी पुराम (आमगांव देवरी विधानसभा)आणि सौ. सविताताई पुराम (माजी सभापती व सदस्य, जिल्हा परिषद गोंदिया...
10/04/2026

माननीय आमदार श्री. संजयजी पुराम (आमगांव देवरी विधानसभा)
आणि सौ. सविताताई पुराम (माजी सभापती व सदस्य, जिल्हा परिषद गोंदिया)
यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…! 🎉

आपले सहजीवन आनंदी, निरोगी आणि समृद्ध राहो,
हीच शुभेच्छा.

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

अखंड भारताच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे,धैर्य, शौर्य आणि स्वाभिमानाचे अजरामर प्रतीकछत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथ...
03/04/2026

अखंड भारताच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे,
धैर्य, शौर्य आणि स्वाभिमानाचे अजरामर प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏

रयतेचा राजा म्हणून त्यांनी दिलेला न्याय,
आणि स्वराज्यासाठी केलेला पराक्रम
आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
जय शिवराय! 🚩

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

#शिवाजीमहाराज #स्वराजसंस्थापक_श्रीछत्रपती #महराज # #आराध्यादैवत

गोरेगाव येथे मा. श्री. अमोलजी भेंडारकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या आयटी व सोशल नेटवर्किंग कंपनीला भेट देण्यात आली....
02/04/2026

गोरेगाव येथे मा. श्री. अमोलजी भेंडारकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या आयटी व सोशल नेटवर्किंग कंपनीला भेट देण्यात आली. या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यास पुढील यशाच्या शुभेच्छा दिल्या.💐

गोरेगाव परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक युवकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि डिजिटल क्षेत्रातील प्रगतीमुळे जनसंपर्क अधिक सक्षम होईल. तसेच, समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत सकारात्मक व रचनात्मक विचार पोहोचविण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला गेला.

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

शौर्य, निष्ठा आणि सेवाभाव यांचे अधिष्ठान असलेल्या प्रभू श्री हनुमान यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.त्यांच्या आद...
02/04/2026

शौर्य, निष्ठा आणि सेवाभाव यांचे अधिष्ठान असलेल्या प्रभू श्री हनुमान यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजात एकता, अनुशासन व राष्ट्रहिताची भावना अधिक दृढ होवो, हीच अपेक्षा. 🙏

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

मा.श्री. अश्विनजी मोहनकर यांच्या आशीर्वाद समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या सुंदर सो...
02/04/2026

मा.श्री. अश्विनजी मोहनकर यांच्या आशीर्वाद समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

या सुंदर सोहळ्यातील उत्साह, आपुलकी आणि स्नेहभाव मनाला स्पर्शून गेला.

नवदांपत्याच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड आनंद नांदो, तसेच त्यांच्या सहजीवनाची वाटचाल यशस्वी व प्रेरणादायी ठरो, हीच हार्दिक शुभेच्छा. 🙏

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

गोंदिया जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. शैलेशजी नंदेश्वर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपले जनसेवेतील कार्...
25/03/2026

गोंदिया जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. शैलेशजी नंदेश्वर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपले जनसेवेतील कार्य, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि प्रभावी नेतृत्व असेच अधिक बळकट होत राहो.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व उज्ज्वल यश लाभो, हीच शुभेच्छा!

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार

मा. श्री. स्मित जी सांगोडे यांच्या “अद्विका ट्रेडर्स” या नव्या व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून उद्घाटन सोहळा ...
23/03/2026

मा. श्री. स्मित जी सांगोडे यांच्या “अद्विका ट्रेडर्स” या नव्या व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून उद्घाटन सोहळा पार पाडला. या सुंदर उपक्रमाची सुरुवात उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.

त्यांच्या या नव्या प्रवासासाठी हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

श्री. अजयकुमार सदाशिव कोठेवार
समाज सेवक, गोरेगाव

Address

Goregaon Gondia
Gondia
441801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay Sadashiv Kothewar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category