Jalgaon Index

Jalgaon Index जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी एक अराजकीय व्यासपीठ !

🎙️ स्वरसम्राज्ञी Asha Bhosle यांचे आज (१२ एप्रिल २०२६) वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.भारतीय संगीत क्षेत्रातील त्...
12/04/2026

🎙️ स्वरसम्राज्ञी Asha Bhosle यांचे आज (१२ एप्रिल २०२६) वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 🙏

आदरणीय,खा. स्मिता ताई वाघ,जळगाव लोकसभा मतदारसंघसप्रेम नमस्कार..🙏🏻आपण संसदेत जळगाव जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्न प्रभाव...
25/03/2026

आदरणीय,
खा. स्मिता ताई वाघ,
जळगाव लोकसभा मतदारसंघ
सप्रेम नमस्कार..🙏🏻

आपण संसदेत जळगाव जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्न प्रभावीपणे मांडलेत, याबद्दल 'जळगाव इंडेक्स' ग्रुपतर्फे आपणास मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत.💐

'जळगाव इंडेक्स' ग्रुपतर्फे यापूर्वी आपणास सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या. आपण त्या मागण्यांची दखल घेत, त्या थेट संसदेत मांडून जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

आपल्या या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात मोठा दिलासा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.

आज 'जळगाव इंडेक्स' ग्रुपतर्फे आदरणीय खा. स्मिता ताई यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.💐

आपण भविष्यातही अशाच पद्धतीने जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहाल, ही अपेक्षा व्यक्त करतो.

ताई, पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.🙏🏻

आपला विश्वासू,
जळगाव इंडेक्स ग्रुप.

https://www.loksatta.com/nashik/jalgaon-mp-smita-wagh-meets-railway-minister-ashwini-vaishnaw-udhana-pune-train-demand-rnb-99-5781025/?utm_source=DailyHunt&utm_medium=Referral

🚧 जळगावकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी!गिरणा नदीवरील बांभोरी पुलाच्या नव्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून ₹79.23 कोटींचा ...
20/01/2026

🚧 जळगावकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी!

गिरणा नदीवरील बांभोरी पुलाच्या नव्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून ₹79.23 कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे.

🏗️हा पूल सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, वाहतूक कोंडी व अपघातांच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. 🚗➡️🚚

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी जी यांचे मनःपूर्वक आभार 🙏
तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार मा. स्मिता वाघ यांचे विशेष आभार 👏

या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट गर्डर तंत्रज्ञानाने केले जाणार असून, पूल अधिक मजबूत, सुरक्षित व दीर्घकाळ टिकाऊ राहणार आहे 💪
🔹 नवीन पुलासोबत जुन्या पुलाचे मजबुतीकरण
🔹 कालिंका माता मंदिर–खोटेनगर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग
🔹 आरसीसी गटारी व पूरक विकासकामे

या सर्व कामांमुळे जळगावची वाहतूक अधिक गतिमान होऊन व्यापार, उद्योग व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे 📈

तसेच, बांभोरी–निमखेडी दरम्यान सुरू असलेल्या समांतर पुलासाठीही ₹40 कोटींचा निधी मंजूर आहे.

✨ जळगावच्या सर्वांगीण विकासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड!

20/01/2026

🚆 प्रवासीहिताचा निर्णय – मध्य रेल्वेचे मनःपूर्वक स्वागत! 🙏

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून :
🚉 भुसावळ–मिरज अनारक्षित विशेष गाडी (01209/01210)
आणि
🚉 अमरावती–पनवेल अनारक्षित विशेष गाडी (01416/01415)

सुरू केल्याबद्दल मध्य रेल्वे व भुसावळ मंडळ व खा. स्मिता वाघ ह्यांचे मनःपूर्वक स्वागत व आभार..!🙏

📅 भुसावळ → मिरज | गाडी क्र. 01209
🕓 सुटणार : 23 जानेवारी, दुपारी 4.50 वा. (भुसावळ)
🕗 पोहोचणार : 24 जानेवारी, सकाळी 8.50 वा. (मिरज)

📅 मिरज → भुसावळ | गाडी क्र. 01210
🕖 सुटणार : 26 जानेवारी, सायं. 7.00 वा. (मिरज)
🕧 पोहोचणार : 27 जानेवारी, दुपारी 12.30 वा. (भुसावळ)
📍 थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली 🚉

📅 अमरावती → पनवेल | गाडी क्र. 01416
🕛 सुटणार : 22 जानेवारी, दुपारी 12.00 वा. (अमरावती)
🕓 पोहोचणार : 23 जानेवारी, पहाटे 4.00 वा. (पनवेल)

📅 पनवेल → अमरावती | गाडी क्र. 01415
🕢 सुटणार : 26 जानेवारी, रात्री 7.50 वा. (पनवेल)
🕛 पोहोचणार : 27 जानेवारी, दुपारी 12.00 वा. (अमरावती)
📍 थांबे : बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा, कर्जत 🚉

🎓 नोकरी | 🧑‍💼 व्यवसाय | 🏥 उपचार | 🛍️ बाजारपेठ | 🧳 दैनंदिन प्रवास करणाऱ्या खान्देश–विदर्भ–पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना या गाड्यांचा मोठा लाभ होणार आहे.

🧾 संपूर्ण गाडी अनारक्षित असल्याने तिकीट टंचाईचा ताण कमी होऊन 🚶‍♂️🚶‍♀️ सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व परवडणारा प्रवास मिळेल.
🎉 सण-उत्सव व गर्दीच्या काळात नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय निश्चितच प्रवासीहिताचा आहे.

👉 भविष्यातही प्रवाशांच्या गरजेनुसार गाड्या व थांबे वाढवावेत, ही अपेक्षा!

🚆

Address

Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalgaon Index posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category