22/06/2024
नीट परीक्षेच्या निकालातील घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालक संतप्त आहेत. ३२ लाखात आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका विकणाऱ्या टोळ्यांच्या नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडत चाललाय. परीक्षाकडे गांभीर्याने बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायचं कायं? कारण सरकार सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतेय, ‘परीक्षा पे चर्चा’ नावाचा इव्हेंट करणारे मोदीं या विषयावर मात्र गप्प आहेत.