02/06/2026
*गरजू जेष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एक छोटासा प्रयत्न… ☔*
आज मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते मातोश्री गुंजाई फाउंडेशन मार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना मोफत छत्री वाटप उपक्रमाचे शुभारंभपूर्वक अनावरण करण्यात आले.
पावसाळ्यात नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मा. खासदार साहेबांच्या हस्ते छत्रीचे अनावरण होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळेल, असा विश्वास आहे.
मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गुंजाई फाउंडेशनच्या सदस्यांचे अभिनंदन.
Dr Shrikant Eknath Shinde
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे