15/09/2025
असं म्हणतात कि माणसाने कृतज्ञ असाव पण कृतघ्न नसाव..
तत्व आणि विचारधारेला मुठमाती देऊन राजकारण करणे हे अलीकडच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे वैशिष्ट्य बनले आहे.
काँग्रेस पक्षाने चव्हाण कुटुंबाच्या दोन पिढ्याना 4 वेळा मुख्यमंत्री पदाची संधी दिली.
सत्ता, पद आणि प्रतिष्ठा दिली तरीही हे आदर्श नेते काँग्रेस वर टीका करत आहेत.
अशोकरावजी चव्हाण साहेबांचे वडील स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब 1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. नांदेडचे नगराध्यक्षपद (1956 ), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्षपद आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालपद अशी विविध पदे त्यांनी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रुवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रुवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
1975 ते 1977 पर्यंत आणि 13 मार्च 1986 ते 26 जून 1988 पर्यंत दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
'आदर्श ' मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पुढील पदे उपभोगली.👇
1984 : काँग्रेस पक्षात प्रवेश आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस झाले.
मार्च 1987 - नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेत निवडून आले
1989 : लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या डॉ. व्यंकटेश काब्दे कडून पराभूत झाले.
1992: शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तसेच उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री झाले.
फेब्रुवारी 1993 : विधानपरिषदेवर नियुक्ती झाली.
ऑक्टोबर 1999 : तत्कालीन मुदखेड विधानसभा मतदार संघातून विजयी.
02 नोव्हेंबर 1999 : विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळात अशोकरावजी महसूलमंत्री झाले.
सप्टेंबर 2003 : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अशोकरावजी परिवहनमंत्री झाले.
ऑक्टोबर 2004 : मुदखेड मतदारसंघातून विजयी होऊन, उद्योग खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती झाली.
2008 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.
ऑक्टोबर 2009 : भोकर मतदारसंघातून विजयी.
नोव्हेंबर 2009 : अशोकरावजी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
2010 : आदर्श घोटाळ्याचा आरोप, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
मे 2014 : नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी
जानेवारी 2017 : काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.
मे 2019 : भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून 42 हजार मतांनी पराभूत झाले. तद्नंतर लगेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
ऑक्टोबर 2019- भोकरमधून 97,500 मताधिक्याने विजयी झाले.
डिसेंबर 2019 - शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले.
जुन 2022 - शिवसेनेत शिंदे गटाने बंडखोरी केली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, सबब मंत्रिपद गेले.
जेलमध्ये जाण्याऐवजी भाजप मध्ये गेलेलं बर हा विचार केलेल्या या महाशयांनी अशा कितीही कथा रंगवून, लोकांना काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोक वेडी नाहीत हे यांना समजायला हवं 😄
आता तुम्हीच सांगा यांना काँग्रेस पक्षाने अजून काय द्यायला हवं....???
✍️ डॉ. लखन भोगम
9049847575