Student Fedration Of India,Kolhapur

Student Fedration Of India,Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Student Fedration Of India,Kolhapur, Political organisation, Anandi prasad bulding, Near Juna Deval club, Bindu chowk, Kolhapur.

एसएफआयचे संस्थापक राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांचे दुःखद निधन !विनम्र अभिवादन! अखेरचा लाल सलाम!एसएफआयचे ...
18/09/2020

एसएफआयचे संस्थापक राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांचे दुःखद निधन !

विनम्र अभिवादन! अखेरचा लाल सलाम!

एसएफआयचे संस्थापक राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी आज सकाळी समजली. त्यांच्या निधनामुळे चळवळीला सतत दिशा देणारे मार्गदर्शक आपण गमावले आहे. कोणत्याही परिस्थितीत ते नेहमी आपल्याला चांगल्या सूचना करत असत. मोरे सरांचे निधन अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहे. कारण नुकतेच ५ सप्टेंबर रोजी मोरे सरांचे सहकारी कॉ. उद्धव भवलकर यांचेही निधन झाले. आणि त्याआधी जूनमध्ये त्यांचे दुसरे सहकारी प्रा. कॉ. अरुण शेळके सर यांचे निधन झाले. मोरे सर, शेळके सर आणि कॉ. भवलकर यांनी सोबतच एसएफआयची सुरुवात केली.

१९७० साली मोरे सर यांनी तिरुअनंतपुरम येथे झालेल्या एसएफआयच्या स्थापना अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. तेथून परत आल्यावर मराठवाड्यात विद्यार्थ्यांना संघटित करून जबरदस्त आंदोलन उभारले. मराठवाडा विकास आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ साली उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे झालेल्या महाराष्ट्र एसएफआयच्या पहिल्या राज्य अधिवेशनात ते पहिले राज्य अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आणि त्यानंतर त्यांनी एसएफआयला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनात घर करून दिले. त्यांच्याच प्रयत्नातून आणि सहकार्यातून ९ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत आदर्श विद्यालयामध्ये एसएफआयच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आजी-माजी कार्यकर्त्यांचा मेळावा यशस्वी झाला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेच होते. ते डीवायएफआय या आपल्या भतृभावी युवक संघटनेचे देखील संस्थापक राज्य अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेचे कार्य केले.

वाशी येथील महाविद्यालयात प्राध्यापक आणि रेणापूर व किल्लारी येथील महाविद्यालयात ते प्राचार्य होते. हा सर्व व्याप त्यांच्यामागे असताना त्यांनी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे शहीद भगतसिंग महाविद्यालय स्थापन केले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. तसेच राज्यशास्त्र विभाग अभ्यासक्रम मंडळावर देखील ते होते. त्यांनी विद्यार्थी दशेपासून सुरू केलेले कार्य आजतागायत सुरूच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने आपले खूप नुकसान झाले आहे. एक अभ्यासू व चिकित्सक मार्गदर्शक, लढाऊ नेते, पुरोगामी, मार्क्सवादी, धर्मनिरपेक्ष विचारवंत आपण गमावला आहे.

एसएफआयच्या मागील ५० वर्षाच्या वाटचालीत मोरे सरांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या कार्याला आम्ही कायम स्मरणात ठेवू. मोरे सर यांच्या निधनाबद्दल एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी शोक व्यक्त करते आणि मोरे कुटुंबियांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी होते.

प्रा. डॉ. विठ्ठल मोरे सर अमर रहे !

अलविदा कॉम्रेड!
अखेरचा लाल सलाम!

◆ SFI महाराष्ट्र राज्य कमिटी

महान क्रांतिकारक शहीद राजगुरू यांना जन्मदिनी SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !देशाच्या स्वातंत्र्या...
24/08/2020

महान क्रांतिकारक शहीद राजगुरू यांना जन्मदिनी SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य देऊन सर्वोच्च त्याग करणारे, समाजवादी भारताच्या निर्माणासाठी लढणारे योद्धे, महाराष्ट्राच्या मातीतील नवतरुण ज्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ब्रिटिश साम्राज्य हादरवून सोडले, शहीद भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत क्रांतिकार्यात नेहमी अग्रेसर राहिलेले लढवय्ये महान क्रांतिकारक शहीद राजगुरू यांचा आज २४ ऑगस्ट रोजी जन्मदिवस. शहीद राजगुरू यांच्या क्रांतिकार्यास सलाम! क्रांतिकारी अभिवादन!


स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) कोल्हापूर जिल्हा कमिटी तर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
15/08/2020

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) कोल्हापूर जिल्हा कमिटी तर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !



ठाणे-पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी उठावाच्या प्रणेत्या, अखिल भारतीय किसान सभेच्या आजवरच्या एकमेव महिला राष्ट्रीय अध्यक...
14/08/2020

ठाणे-पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी उठावाच्या प्रणेत्या, अखिल भारतीय किसान सभेच्या आजवरच्या एकमेव महिला राष्ट्रीय अध्यक्षा, कम्युनिस्ट नेत्या, 'जेव्हा माणूस जागा होतो' या साहित्य अकादमी विजेत्या पुस्तकाच्या लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या महिला वकील कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांना जन्मदिनी SFI कोल्हापूर जिल्हा कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !


कोल्हापूर : SFI च्या वतीने विस्तार अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन. https://www.maharashtrajanbhumi.in/2020/08/Kolh...
11/08/2020

कोल्हापूर : SFI च्या वतीने विस्तार अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन.
https://www.maharashtrajanbhumi.in/2020/08/Kolhapur-Statement-of-various-demands-to-the-extension-officers-on-behalf-of-SFI.html

कोल्हापूर : SFI च्या वतीने विस्तार अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन. Kolhapur: Statement of various demands to the extension officers on behalf of SFI

11/08/2020

९ ऑगस्ट || क्रांतिदिनीकामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी एकजूट जिंदाबाद !
07/08/2020

९ ऑगस्ट || क्रांतिदिनी
कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी एकजूट जिंदाबाद !

प्रा.डॉ. सुभाष जाधव : नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचे खाजगीकरण करणारे; SFI आयोजित व्याख्यानात प्रतिपादन.कोल्हापूर : स्टुडंट...
07/08/2020

प्रा.डॉ. सुभाष जाधव : नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचे खाजगीकरण करणारे; SFI आयोजित व्याख्यानात प्रतिपादन.

कोल्हापूर : स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटी ने "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०" यावर विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी उपस्थितींंना संबोधित केले. झूम ॲप द्वारे झालेल्या व्याख्यानात ६२ जणांनी सहभाग घेतला.

प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले की, नवीन धोरण हे फक्त वाचतानाच आकर्षक वाटते परंतु प्रत्यक्षात अवलंबताना याचे अनेक दुष्परिणाम उद्भवू शकतात अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या शैक्षणिक धोरणातील बदल सकारात्मक वाटत आहेत परंतु त्याची पूर्णता स्पष्टता दिली गेली नसल्यामुळे अनेक संभ्रम निर्माण होत आहेत. जसे की प्रलंबित सर्व शिक्षक भरती करू पण किती कालावधीत करून याची स्पष्टता नाही, शाळा एकत्रीकरण(क्लस्टर शाळा) करणे देखील योग्य वाटते पण सरकारी की खाजगी शाळा याची स्पष्टता नाही, कमी पटाच्या शाळा बंद करणार का? व त्यामुळे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जास्त अंतरावरील क्लस्टर शाळेत जावे लागनार का ? २०३५ पर्यंत २६ टक्के वरून ५० टक्के पर्यंत पटसंख्या वाढवणार पण त्यासाठी शाळांची संख्या दुप्पट कराव्या लागतील याबद्दल स्पष्टता नाही, सरकारी शाळेत सर्व सुधारणा करण्याचे बोलले आहे पण त्यासाठी किती अनुदान देणार याची स्पष्टता नाही, महाविद्यालये एकत्रीकरण केल्यामुळे जवळपास तीस हजार महाविद्यालय बंद करावे लागतील याबद्दलही स्पष्टता नाही.

पुढे बोलताना डॉ. जाधव म्हणाले की, नवीन धोरण अमलात आणल्यानंतर दहा वर्षाच्या कालावधीत सर्व शिक्षण संस्थांना स्वायत्त व्हावे लागेल पण त्यासाठी वित्तीय निधी कसा गोळा करणार त्यामुळे विद्यार्थ्यांची फी वाढणार का याबद्दल स्पष्टता नाही. जर फी परवडत नसेल तर विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घ्यावे असं सुचवलं आहे, म्हणजेच बहुसंख्य गरीब विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून बाहेर फेकले जातील. अनेक खाजगी व विदेशी विद्यापीठांना परवाने मिळणार आहेत, त्यामुळे शिक्षणाचे १०० % बाजारीकरण होणार यात शंका नाही. तसेच सगळ्यात महत्त्वाचं जातीय आरक्षणाबाबत कोणतीच स्पष्टता नाहीये. ८ ग्रेड पर्यंत स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण देणे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढेल, या शब्दात कौतुकही केले.

एकंदरीत हे नवीन शिक्षण धोरण भविष्यात गरीब व श्रीमंत विद्यार्थ्यांमधील दरी वाढवेल व त्यासाठी सर्व विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना यांनी वेळोवेळी विरोध करण्यास सज्ज राहिले पाहिजे, असे ही डॉ. जाधव म्हणाले.

सदर व्याख्यानासाठी एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष सर्वेश सवाखंडे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, मालोजीराव माने, प्रा. विनोदसिंह पाटील, अमोल नाईक, दत्ता चव्हाण, वैशाली दाभाडे, राजेंद्र पाडवी, मानसी गुरव, सुवर्णा पाटील, सविता पडदुणे, बाळासाहेब मोठे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा सचिव रत्नदीप सरोदे तर आभार जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मोरे यांनी व्यक्त केले.

          ्राडॉसुभाषजाधव
05/08/2020



्राडॉसुभाषजाधव

नवीन शैक्षणिक धोरणात मुलभूत सुधारणा करा.
05/08/2020

नवीन शैक्षणिक धोरणात मुलभूत सुधारणा करा.

नवीन शैक्षणिक धोरण - २०२० नाकारा !देशव्यापी आंदोलन दिवस || ४ ऑगस्टआंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र करा !
03/08/2020

नवीन शैक्षणिक धोरण - २०२० नाकारा !
देशव्यापी आंदोलन दिवस || ४ ऑगस्ट
आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र करा !




Address

Anandi Prasad Bulding, Near Juna Deval Club, Bindu Chowk
Kolhapur

Telephone

9921976460

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Student Fedration Of India,Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share