Aam Aadmi Party Latur

Aam Aadmi Party Latur "आप"ल्याच लोकांचे, "आप"ल्याच लोकांसाठीचे लोकराज्य.

मागील दोन वर्षापासून भ्रष्टाचारा विरूध्द जन लोकपाल मागणीसाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले. दोन वर्षात या आंदोलनाने देशातील सर्व पक्षांचा पर्दाफाश केला. या देशात कुठल्याही पक्षाकडून भ्रष्टाचारमुक्त भारताचे अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मागील दोन वर्षात आम्ही सगळं करून पाहिलं. सरकार बरोबर चर्चा केली, सर्व पक्षांना विनंती केली, त्यांना विणवण्या केल्या, धरणे धरली, प्रदर्शने केली आणि तीन वेळेला अनिश्चित कालीन

उपोषणेही केली. परंतु या पक्षांनी नाही मानलं. वारंवार जनतेला फसवलं गेलं. आता विनंत्या करून काम होणार नाही. आता पूर्ण व्यवस्था बदलायला हवी. आम्ही हे नाही म्हणत की जे लोक राजकारणात आहेत ते सर्व भ्रष्ट आहेत. आम्ही हेही नाही म्हणत की केवळ आम्हीच प्रामाणिक आहोत. आम्ही हे म्हणतोत की आपल्या देशाची राजकीय व्यवस्था दुषित झालेली आहे आणि ही व्यवस्था पुर्णपणे बदलायला हवी. अशी व्यवस्था हवी की ज्यात थेट जनतेच्या हातात सूत्र असावीत. म्हणून आम्ही सत्तेच्या उपभोगासाठी नव्हे तर राजकीय परिवर्तनासाठी ही लढाई लढत आहोत.

Address

Sunil Deshmukh Manora, Near Lagaskar Building, Old Ausa Road
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share