30/06/2023
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक संपन्न झाली...
चेअरमन आणि व्हा.चेअरमन
पदाच्या नियुक्त्या झाल्या...
एक गोष्ट मात्र नक्कीच मान्य करावी लागेल की,मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेश कारखाना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चालवायला घेतला नसता तर शेतकरी सभासदांच्या मालकीचा कारखाना कोणा खासगी उद्योजकाच्या ताब्यात असता....निवडणूक सुध्दा पाहायला मिळाली नसती.
पण मा.विखे पाटील यांनी शेतकरी सभासदांच्या हितासाठी आव्हानात्मक परिस्थितीत कारखाना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून चालवला म्हणून आज शेतकऱ्यांची मालकी कायम राहीली.
अनेकांनी गणेश कारखान्याला वेगवेगळी बिरूद लावून बदनाम केले.पण विखे पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीची नाळ तुटू दिली नाही....
निवडणूक संपली...सभासदांचा कौल मान्य करीत विखे पाटील यांनी डॉ.विखे पाटील कारखान्याशी झालेल्या कराराची कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट करून कारखाना चालविण्यास सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
परंतू निवडणुकीनंतरचे कवित्व पाहीले तर अनेकांनी डोळ्यावर झापड बांधून गणेश कारखाना आणि थेट विधानसभा निवडणुकीची सांगड घालून केलेल्या विश्लेषणाचे आश्चर्य वाटते.....
पण अंध विश्लेषकांनो एक गोष्ट लक्षात घ्या इतिहास चाळून पाहा...यापुर्वी गणेश कारखान्याच्या अनेक निवडणुकांमध्ये विखे गटाचा पराभवच झाला..पण राजकीय निवडणुकात १९९५ पासून मंत्री विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून लाखो मतांचे मताधिक्य घेवून विजयी होत आहेत.गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा परीणाम इतर निवडणुकात झाला असे कधी घडले नाही आणि घडण्याची शक्यता नाही.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सुध्दा त्यांचे वर्चस्व एकहाती राहीले कारण जनाधार त्यांच्या पाठीशी आहे!
गणेश कारखाना हा नेहमीच कोल्हे यांच्या वर्चस्वाखाली राहीला आहे.सभासदांवर त्यांचा प्रभाव आहे.सभासद वाढविण्यावर त्यांचा भर राहीला.पण आठ वर्ष कारखाना ताब्यात असूनही विखे पाटील यांच्या मनास सभासद वाढविण्यचा विचार शिवला नाही....अन्यथा निवडणुकीचा निकाल वेगळा राहीला असता...गणेश कारखान्याच्या मागील अनेक निवडणुकांची आकडेवारी पाहीली तर पराभव होवूनही विखे गटाचे मताधिक्य वाढतच गेले आहे..नुकत्याच झालेल्या निवडणुकीची आकडेवारी यासाठी पुरेशी बोलकी आहे.हे विश्लेषकांनी सोयीस्करपणे दूर्लक्षित केले.
अनेक आव्हान यापुर्वी विखे पाटील यांच्यासमोर आली...पण जनतेचे पाठबळ विकासाची प्रक्रिया, कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि सहकार चळवळीशी जोडलेली नाळ यामुळेच अभेद्य असा राजकीय गड राखण्यात विखे पाटील कालही यशस्वी झाले उद्याही होणार आहेतच...
फक्त विखे पाटील यांच्या वाढत्या राजकीय प्रभूत्वाची अनेकांना झालेली असूया
आणि काही विश्लेषकांनी डोळ्यावर झापड बांधून मांडलेले ठोकताळे वास्तवतेला धरून निश्चितच नाहीत,दुसरी बाजू सुध्दा अभ्यासायला हवी!
Radhakrishna Vikhe Patil Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP MAHARASHTRA BJP MAHARASHTRA 145+ BJP OBC Morcha Maharashtra BJP Maharashtra BJP OBC Morcha Maharashtra Dr Sujay Vikhe Patil Paresh Kapase