Shivsena Malad Assembly Constituency

Shivsena Malad Assembly Constituency हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.
धर्मवीर आनंद दिघे साहेब.
लोकनेते श्री एकनाथी शिंदे.
शिवसेना मलाड.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.
धर्मवीर आनंद दिघे.
कार्यसम्राट एकनाथ शिंदे साहेब.
विधानसभा संघटक. 162 मालाड पश्र्चिम विधानसभा मुंबई. #शिवसेना. .

Facebook वरील सर्व शिवसेना कुटुंबाला,शुभ दिपावली! 🪔 जय श्रीराम.. 🚩
12/11/2023

Facebook वरील सर्व शिवसेना कुटुंबाला,
शुभ दिपावली! 🪔 जय श्रीराम.. 🚩

2023 | शिवसेना दसरा मेळावा!लवकरच भेटूया..  #शिवसेना  #दसरामेळावा
22/10/2023

2023 | शिवसेना दसरा मेळावा!
लवकरच भेटूया..

#शिवसेना #दसरामेळावा

11/10/2023

11 Oct | आज वाढदिवसानिमित्त आपले राजकीय गुरू, माजी आमदार व शिवसेना राष्ट्रीय सचिव माननीय श्री कॅप्टन अभिजीतदादा अडसूळ यांच्या कार्यालयात आज माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमचे मित्र संजय सावंत, माजी नगरसेवक शंकर हुंडारे साहेब यांच्यासह सर्व मालाड शाखाप्रमुख उपस्थित होते.

सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
जय महाराष्ट्र!

"राज्यातील आमचे सरकार केवळ माझं कटुंब माझी जबाबदारी एवढय़ापुरते मर्यादित नसून ते सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. म्हणूनच आम...
29/07/2023

"राज्यातील आमचे सरकार केवळ माझं कटुंब माझी जबाबदारी एवढय़ापुरते मर्यादित नसून ते सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. म्हणूनच आम्ही घरातून काम न करता (वर्क फ्रॉम होम) थेट चिखलातही रस्त्यावर उतरून लोकांच्या मदतीला धावतो. आमचे ट्रिपल इंजिनचे सरकार सुसाट धावत असून महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला नसता तर राज्य आणखी १५ वर्षे मागे गेले असते."

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

28/07/2023

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तृष्णा विश्वासराव यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा यावेळी शिंदे यांनी केली.

वडाळा परिसरातील चार वेळा नगरसेविका म्हणून जिंकून आलेल्या तृष्णा या २०१७ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना नामनिर्देशित नगरसेविका म्हणून नियुक्त केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महापालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पां...
28/07/2023

घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महापालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजीटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, आर्थिक स्थिती चांगली असलेल्या महापालिकांमध्ये अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी सॅटेलाइटद्वारे छायाचित्रे मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

28/07/2023

"इर्शाळवाडीत फार कठीण परिस्थिती होती. काही लोक व्हॅनिटी व्हॅनने त्याठिकाणी गेले होते. काही लोक चिखल तुडवत गेले होते. मी त्याठिकाणी गेलो, याचा मोठेपणा मी सांगत नाही. परंतु, मी तिथे गेल्यामुळे सगळ्या यंत्रणा वेगाने कामाला लागल्या. इकडे सभागृहात दोन्ही उपमुख्यमंत्री कंट्रोल ठेवून होते. एनडीआरएफसह यंत्रणा मोठ्याप्रमाणावर त्याठिकाणी पोहोचल्याने खूप मदत झाली. नुसता देखावा करायचे काम आम्ही कधी केलं नाही आणि करतही नाही. आम्ही सरकार म्हणून इर्शाळवाडीतील नागरिकांच्या पाठिशी उभे राहिलो. या सर्व नागरिकांची तात्काळ कंटेनरमध्ये राहण्याची सोय केली असून त्यांना सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. आम्ही तिकडेच भूखंडही बघितला. सिडकोला त्याठिकाणी पक्की घरे बांधून इर्शाळवाडीतील लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त बोलून थांबत नाही तर प्रत्यक्षात कृती करतो. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. आम्ही वर्क फ्रॉम होम काम करत नाही."

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज सर्व नवनिर्वाचित शिवसेना शाखाप्रमुख यांचा सत्कार समारोह विधानसभा संघटक श्री नागेश विठ्ठल आपटे यांच्यातर्फे करण्यात आल...
25/07/2023

आज सर्व नवनिर्वाचित शिवसेना शाखाप्रमुख यांचा सत्कार समारोह विधानसभा संघटक श्री नागेश विठ्ठल आपटे यांच्यातर्फे करण्यात आला.

तसेचा मालाड विधानसभेचे विधानसभा प्रमुख श्री रत्नाकर वाळवे, विधानसभा संघटक श्री नागेश आपटे व मालाडचे सर्व शाखाप्रमुख महिला व पुरुष यांच्यातर्फे श्री लाल सिंह राजपूत जी विभाग प्रमुख तसेच विशाखा ताई मोरये महिला विभाग संघटक यांचा सत्कार देखील करण्यात आला.

#शिवसेना

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय आपत्ती व्यवस्था या कार्यालयात भेट दिली व मु...
20/07/2023

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय आपत्ती व्यवस्था या कार्यालयात भेट दिली व मुंबईमधील परिस्थिती संपूर्ण संबंधित अधिकारी सर्वांबरोबर चर्चा केली आणि प्रत्यक्ष पाहणी केली व मुंबई मध्ये कुठे कुठे काय पर्याय व्यवस्था करायची त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली व कुठेही पाणी जास्त प्रमाणात भरले नाही याची प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सर्वाधिकार्‍यांबरोबर बोलले व प्रत्यक्ष या अति पावसामुळे कुठेही व्यवस्थेला कमी न पडता मुंबई महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना सूचना केल्या व सर्वांना तशा प्रकारचे आदेश दिले.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Captain Abhijeet Adsul

शासन आपल्या दारी..शासन आपल्या मालाड विधानसभेत..लवकरच.. पुढील कार्यक्रमांचा लाभ मालाड विधानसभा, लोकसभेतील नागरिकांना घेता...
08/07/2023

शासन आपल्या दारी..
शासन आपल्या मालाड विधानसभेत..

लवकरच.. पुढील कार्यक्रमांचा लाभ मालाड विधानसभा, लोकसभेतील नागरिकांना घेता येईल याची नोंद घ्यावी..

आपला शिवसैनिक..
- नागेश आपटे
- संघटक शिवसेना मालाड
विधानसभा 162 (लोकसभा)

प्रत्येक जिल्ह्यात एकाच छताखाली किमान ७५००० लाभार्थ्यांना लाभ देण्याचा राज्य सरकारचा महान संकल्प.

लाभार्थी कार्यक्रम यादी:

विविध शासकीय विभागांच्या योजना, रोजगार मेळावा, महा आरोग्य शिबीर, रक्तदान व अवयव दान शिबीर, चष्मे वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायदा २५% विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रवेश, कृषी प्रदर्शन, महिलांना 'सखी' कीट वाटप, स्वयं रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल, विविध सरकारी विभाग व महामंडळाचे योजना माहिती स्टॉल, CSR अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे, नव मतदार नोंदणी.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde

शिवसेना २०२३ वर्धापदिनानिमित्त तयार केलेल्या विशेष छत्र्यांचे आज मालाड विधानसभेत वाटप करण्यात आले.CM   MP   SS
01/07/2023

शिवसेना २०२३ वर्धापदिनानिमित्त तयार केलेल्या विशेष छत्र्यांचे आज मालाड विधानसभेत वाटप करण्यात आले.

CM
MP
SS

आषाढी एकादशीला विठूरायांच्या मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या पुजेशिवाय एक आकर्षण म्हणजे छोटा मुलगा.. सलग दोन वर्ष पूजेसाठी हज...
29/06/2023

आषाढी एकादशीला विठूरायांच्या मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या पुजेशिवाय एक आकर्षण म्हणजे छोटा मुलगा.. सलग दोन वर्ष पूजेसाठी हजर होता.. लहान मुलं पूजेसाठी येणं यात महत्वाचं असं काय..? परंतु हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या एकाच पक्षातील दोन कुटुंबाने गेले चार वर्ष पूजा केली.. फरक मात्र जमीन-अस्मानाचा जाणवला..

जे हिंदुत्वाच्या टीमक्या कायम वाजवतात त्यांच्या नातवाचा विठ्ठलाच्या मंदिरात श्वास गुदमरला.. ज्यांना गद्दार म्हणून हिणवता त्यांच्या नातवाने मात्र हसत हसत भल्या पहाटे आपल्या आजोबंसोबत पूजा केली.. ना कसली रडारड.. शेवटी संस्कार हे घरातून येतात, एकनाथ शिंदे-एक मुख्यमंत्री जरी असले तरी त्यासोबत ते एक आदर्श आजोबा देखील आहेत जे नातवाला लहानपणापासून हिंदू धर्माची शिकवण देत आहेत.. राजकारणात हे फार कमी बघायला मिळत..

रुद्राक्ष राजकीय वारसा पुढे नेईल की नाही माहित नाही पण सनातन धर्म मात्र पुढच्या पिढीसाठी नक्की जपेल..

विठ्ठल सुद्धा सच्चा भक्ताला बोलवतोच यात लहान मोठा असा भेदभाव नसतो..

राम कृष्ण हरी पांडुरंग हरी..🚩🙏

जय हिंद!🇮🇳

- जयसिंग मोहन 🚩

Address

Malad West
Malad West
400064

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena Malad Assembly Constituency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share