VillageBook,Shirkhed,Morshi,Amravati

VillageBook,Shirkhed,Morshi,Amravati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Shirkhed,Morshi,Amravati, Government Organization, Morshi.

रेल्वे तिकीट बुकिंग आरक्षण सेवाआपले सरकार सेवा केंद्र, शिरखेड
25/11/2021

रेल्वे तिकीट बुकिंग आरक्षण सेवा

आपले सरकार सेवा केंद्र, शिरखेड

बँकिंग सुविधाआपले सरकार सेवा केंद्र, शिरखेड
25/11/2021

बँकिंग सुविधा

आपले सरकार सेवा केंद्र, शिरखेड

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत कराउपमुख्यमंत...
20/07/2021

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णय

मुंबई, दि. २०: राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने दि. १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवून, यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात, राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकित वीज देयके व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकांवरील दंड आणि व्याज वगळून उर्वरित रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून महावितरण कंपनीला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने सदर थकित रक्कम चार हप्त्यात महावितरणला अदा करण्यात आली आहे. या संदर्भात महावितरणकडून तदनंतरच्या देय थकबाकी रकमेची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. महावितरणने वीज बिलापोटी यापूर्वी प्राप्त झालेल्या थकबाकी रकमेची तपासणी करुन योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अप्पर मुख्य सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करुन दि. १५ ऑगस्टपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल आवश्यक शिफारसींसह सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. हा राज्यस्तरीय समितीचा अहवाल येईपर्यंत राज्यातील ग्रामीण/स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीजवसुली, तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवून तसेच यापूर्वी तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

बियाणे अनुदान योजनाज्या शेतकऱ्यांनी बियाणे करिता अर्ज केले होते त्यांना मोबाईल वर पुढील प्रमाणे मेसेज आले आहे. कृषि योजन...
30/05/2021

बियाणे अनुदान योजना
ज्या शेतकऱ्यांनी बियाणे करिता अर्ज केले होते त्यांना मोबाईल वर पुढील प्रमाणे मेसेज आले आहे.

कृषि योजनांच्या ऑनलाईन सोडतीत बियाणे या घटकांतर्गत आपली निवड झाली आहे. सोयाबीन व प्रमाणित बियाण्यांचे वितरण बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यकाशी संपर्क करावा.

तरी संबंधित कृषी विभागा सोबत संपर्क करावा.

आपले सरकार सेवा केंद्र
ग्रामपंचायत कार्यालय शिरखेड
केंद्र चालक - कैलास प्रभाकरराव भिवगडे
मो. नं. - 9371749889 / 8999939871

बियाणे अनुदान योजना २०२१कृषी विभाग सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, खरीप हंगाम २०२१ करिता  शासकीय अनुदानावर बिया...
10/05/2021

बियाणे अनुदान योजना २०२१
कृषी विभाग

सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, खरीप हंगाम २०२१ करिता शासकीय अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांना सोयाबीन, भात, तूर, मुंग, उडीद, तीळ, बी. टी. कापूस, ज्वारी, मका, व बाजरी चे बियाणे हवे असेल त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र शिरखेड येथे ऑनलाईन अर्ज भरणे करिता संपर्क करावा.

अंतिम दिनांक :- २० मे २०२१

आवश्यक कागदपत्रे :-
• आधार कार्ड
• सात बारा व ८ – अ
• राष्ट्रीयकृत बँक पासबुक
• मोबाईल क्र व OTP
• शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहावे.

-: संपर्क :-
आपले सरकार सेवा केंद्र
ग्रामपंचायत कार्यालय, शिरखेड
केंद्र चालक :- कैलास प्र. भिवगडे
मो.नं :- ८९९९९३९८७१/९३७१७४९८८९

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका लोकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हायची खरी संधी देतात. ग्रामीण ...
24/04/2021

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका लोकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हायची खरी संधी देतात. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा महत्वपूर्ण पाया समजली जाणारी पंचायत राज व्यवस्था आहे.
नागरिकांना संधीची आणि दर्जाची समानता मिळावी म्हणूनच पंचायती राज संस्थांची निर्मिती केली. आपले गाव सशक्त तर देश सशक्त म्हणूनच आपणा सर्वांना 💐“राष्ट्रीय पंचायतराज दिवसाच्या” हार्दिक शुभेच्छा !🙏

पीक विमा योजना🌱🌱🌾🎋🌿🌾प्रिय शेतकरी बंधू,प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020-21 रब्बी हंगाम सुरु झाली आहेतरी संपूर्ण शेतकरी बा...
02/12/2020

पीक विमा योजना

🌱🌱🌾🎋🌿🌾
प्रिय शेतकरी बंधू,
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020-21 रब्बी हंगाम सुरु झाली आहे

तरी संपूर्ण शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय शिरखेड येथे भेट देऊन आपला फळपीक विमा आजच भरून घ्यावा.

अंतिम दिनांक
15 डिसेंबर 2020

1. गहू बागायती - 525/-
2. हरभरा (चना) - 375/-
3. भुईमूग (उन्हाळी) - 600/-

★ लागणारे कागदपत्रे ★

★विमा अर्ज / पिकपेरा
★7/12 उतारा (आम्ही काढून देऊ)
★8-अ उतारा (आम्ही काढून देऊ)
★बॅंक पासबुकची झेरॉक्स
★आधार कार्ड

गर्दी होण्याआधी व अंतिम दिनांकच्या आधी किंवा साईट बंद होण्याआधी आपला फळपीकविमा भरून घ्यावा 🙏🏻

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय शिरखेड येथे भेट द्या

सदैव आपल्या सेवेत...

==========================
🔅 संपर्क🔅
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आपले सरकार सेवा केंद्र
ग्रामपंचायत कार्यालय शिरखेड
कैलास प्र. भिवगडे
मो.नं 9371749889 / 8999939871

आम्ही आपल्या सेवेत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सेवेत उपस्थित राहू

🙏🏻धन्यवाद🙏🏻

दशहरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..या वेळचा दशहरा वेगळ्या पद्धतीने साजरा करा.एकमेकांमध्ये ६ फुट अंतर ठेवा,हात साबणा...
26/10/2020

दशहरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..

या वेळचा दशहरा वेगळ्या पद्धतीने साजरा करा.
एकमेकांमध्ये ६ फुट अंतर ठेवा,
हात साबणाने वारंवार धुवा,
कोविड-१९ राक्षसाचा अंत करण्यास सहकार्य करा.

मोहीम कुटुंबाची मोहीम राष्ट्राची
20/10/2020

मोहीम कुटुंबाची मोहीम राष्ट्राची

माझे कुटुंब माझी जबादारीग्रामपंचायत कार्यालय शिरखेड
20/10/2020

माझे कुटुंब माझी जबादारी
ग्रामपंचायत कार्यालय शिरखेड

ग्रामपंचायत कार्यालय शिरखेडपंचायत समिती – मोर्शी, जिल्हा परिषद – अमरावती दिनांक : ११/०९/२०२०📢🔊 मुनादी 🔊📢      ग्रामपंचाय...
12/09/2020

ग्रामपंचायत कार्यालय शिरखेड
पंचायत समिती – मोर्शी, जिल्हा परिषद – अमरावती
दिनांक : ११/०९/२०२०

📢🔊 मुनादी 🔊📢

ग्रामपंचायत कार्यालय शिरखेड, याजकडून सूचित करण्यात येते की, शिरखेड गावातील प्रपत्र ड घरकुल यादीत ज्यांची नावे आहेत व ज्यांच्या घराचा सर्वे झालेला आहे त्या कुंटुंबतील व्यतींचे आधार कार्ड झेरॉक्स ऑनलाइन करणे करिता येत्या १५/०९/२०२० पर्यंत तात्काळ ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करायचे आहे.

आधार कार्ड देते वेळी ज्या व्यक्तीचे आधार कार्ड झेरॉक्स आहे त्या व्यक्तीची सही त्यावर करून स्वसाक्षांकित करून द्यायचे आहे.

आधार कार्ड झेरॉक्स सही करून ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा न केल्यास घरकुलचा लाभ मिळणार नाही तसेच यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

आधार कार्ड झेरॉक्स जमा करायची शेवटची तारीख
➖ 15 सप्टेंबर 2020

प्रशासक/ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत कार्यालय, शिरखेड

Address

Morshi

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+918999939871

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Shirkhed,Morshi,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Shirkhed,Morshi,Amravati:

Share