Shivsena Social Media

Shivsena Social Media शिवसेनेच्या कार्याचा प्रचार व प्रसार
(52)

08/04/2020
उद्धव बाळा असाच पुढे जात रहा.... आता सर्व तुझ्या खांद्यावर आहे... थोर समाजसेविका सिंधुताई सकपाळ.

उद्धव बाळा असाच पुढे जात रहा...आता सर्व तुझ्या खांद्यावर आहे...थोर समाजसेविका सिंधुताई सकपाळ.

मायमाऊली सिंधुताई सकपाळ यांनी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल व्यक्त केली भावना !08/04/2020

#वरळी
मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेच्या वतीने NSCI Dome, वरळी येथे ५०० कोरोना संशयितांना Quarantine करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

08/04/2020

जे कोणी या युद्धात आपल्यासाठी या युद्धभूमीवर अहोरात्र मेहनत घेत आहेत त्या यंत्रणेतील सर्वांचे धन्यवाद!
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

डाॅक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे सुरक्षा कवच ( #सुरक्षा_सामग्री) महाराष्ट्रात बनविले जाणार.
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

हे युद्ध तर आपण जिंकणारच परंतू या नंतर येणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या युद्धासाठी असेच तयार असु!
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

हे दिवस असेच राहणार नाही!
आपण दक्षतेने सामना केल्यास निश्चित यातून आपण बाहेर पडु!
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

मध्यमवर्गीय नागरिकांच्या देखील अन्न पुरवठ्याबद्दल निर्णय घ्यावा आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी पंतप्रधानांशी चर्चा केली.
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

अन्न छत्रांद्वारे प्रतिदिन साडे पाच ते सहा लाख नागरीकांची तीन वेळ जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

अशा परिस्थितीत जात, पात, धर्म, प्रांतभेद नाही तर,
माणुसकी हा एकच धर्म.
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

#शिवभोजन १ लाख जेवणापर्यंत मंजूर करण्यात आले आहे, गरज भासल्यास त्यात वाढ करण्याची देखील मंजुरी दिली आहे.!
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

केशरी रेशनकार्ड असणाऱ्यांसाठी ८ रु. प्रतिकिलो गहू व १२ रु. प्रतिकिलो तांदूळ देण्याचा राज्य सरकारच्या कॅबिनेटचा निर्णय !
- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे

08/04/2020

आपलं भाग्य आहे की आपल्याला असे लढवय्ये मुख्यमंत्री लाभले आहेत. आपल्यातील प्रशिक्षित आरोग्य सेवकांसाठी या लढाईत सामील होण्याची ही संधी चालून आली आहे. देशसेवा करण्याची वेळ आहे, मागे हटू नका !

08/04/2020

घरोघरी जाऊन तपासणी व चाचणी वाढवल्या आहेत. आता रुग्ण येण्याची वाट बघितल्या जाणार नाही.
- मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020

आपलं घर म्हणजे आपले गड किल्ले आणि गड
किल्ल्यांवरच आपण सुरक्षित राहू शकतो हा इतिहास आहे!
- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे

08/04/2020

घरी बसून गैरसोय होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु याशिवाय दुसरा पर्याय नाही !
- मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे

08/04/2020
CMOMaharashtra

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे -Live

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State

08/04/2020
ShivSena

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे -Live

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State

08/04/2020
08/04/2020

शिवभोजन योजना आता तालुकास्तरावर !

#शिवभोजन #महाविकासआघाडी #ठाकरे_सरकार

08/04/2020

मारूतीरायाने प्रभू रामचंद्रांना हृदयात जपले, आपण देशहितही जपूया !
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !
#शिवसेना

07/04/2020

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.

07/04/2020

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे.
-
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे.


On going Cabinet Meeting under the leadership of CM Uddhav Balasaheb Thackeray.
-
This is the first time in the history of Maharashtra a Cabinet Meeting has been conducted via Video Conference.

07/04/2020
#मातोश्री #उद्धवसाहेब

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे मातोश्रीहून मंत्रीमंडळाच्या बैठकीला जाताना मास्क घालून स्वतःगाडी चालवताना पाहायला मिळाले व तेथे उपस्थित पत्रकारांना मास्क घालण्याची सूचना केली!
#मातोश्री

07/04/2020

खरंच परिस्थिती समजुन घ्यायची असेल तर तथ्यांवर नजर टाका अन्यथा तर्कहीन काथ्याकुट करा...
लोकसंख्येची #घनता #सर्वाधिक असूनही #महाराष्ट्रात युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण किमान ६ एप्रिलपर्यंत सर्वाधिक कमी आहेत. सरकारी पातळीवर तत्काळ केलेल्या उपाययोजना आणि जनजागृतीमुळे..

07/04/2020

माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे...

07/04/2020

कारभाऱ्यांची दिशा योग्यच !

#ठाकरे_सरकार #महाविकासआघाडी

07/04/2020

आमचा नेता ! आमचा अभिमान !

साहेब पक्षप्रमुख म्हणून आम्हा शिवसैनिकांची काळजी घ्यायचे. आता मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याची काळजी जबाबदारीने घेतायेत.

06/04/2020

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आले शेतकऱ्याच्या मदतीला !

#हिंगोली

06/04/2020

आपल्याला कोरोना व्हायरस ची लक्षणे जाणवत असतील तर दिलेल्या कोविड-मदद हेल्पलाईनवर फोन करा - 09513615550.

3000+ डॉक्टर आपल्याला वैद्यकीय सल्ला देण्यास तयार आहेत.

06/04/2020

निदान व तपासणीसाठी राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय प्रयोगशाळांची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यादी केली जाहीर

06/04/2020
उद्धवसाहेब

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर होतोय देशभरातून कौतुकाचा वर्षाव !
महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना से निपटने के लिये जो रूख अपना रहे हैं उसने उनके सियासी दुस्मनों को भी उनका मुरीद बना दिया है।

06/04/2020

अक्षय इंडिकर लिहितात,

आजचं भाषण मला व्यक्तीगत सगळ्यात जास्त आवडलेलं भाषण आहे. जरब जबाबदारी जिद्द जाणीव जेतेपणाच्या सगळ्या सीमा ओलांडून गेलेला हा माणूस आधुनिक काळातील शिवरायासम भासतो आहे

व्यक्तिगत एक अनुभव शेयर करायची इच्छा अनावर होतेय ज्याद्वारे ठाकरे सरकार च्या प्रशासनाच्या कामाच्या वेगाचा अंदाज येईल. आमच्या स्थलपुराण या चित्रपटाच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या निवडीच्या संदर्भाने द हिंदू ह्या वृत्तपत्राने दखल घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला दुपारी एक फोन आला. 022 कोड नंबर. मी म्हणलं होम डिलिव्हरी नाहीतर कुरियर सर्व्हिस चा फोन असेल. नाहीतर कसलीतरी स्कीम सांगणारा फोन असेल. पण फोन होता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातून. अभिनंदन आणि तुमच्या कल्पना सविस्तर आमच्यापर्यंत घेऊन या , मराठी सिनेमा साठी काय करता येईल ,जगभर नव्या सिनेमात काय सुरू आहे याचा अंदाज घेऊन जे शक्य आहे ते ते सगळं करता येईल. आम्ही लवकरच तुम्हाला एक अधिकृत पत्र पाठवतो आहोत.

काही मिनिटांचा फोन. त्यानंतर दोनच दिवसात माझ्या मोबाईल वर एक pdf पत्र येतं. करियर ची नुकतीच सुरवात करणाऱ्या एका तरुण पोरासाठी एवढं करणं म्हणजे सरळ पाठीवर हात ठेवून लढत रहा मी आहे एवढं आयुष्यभर पुरेल असं. एवढ्या तातडीनं सगळ्यावर कारवाई हे कमालीचं चकित करणारं होतं.
कलावंत असलेल्या , कम्पोझिशन चा अफाट सेन्स असलेल्या एका मुख्यमंत्री आर्टिस्टच्या हातात महाराष्ट्र नुसता सेफ च नाहीये तर क्रिएटिव्ह सुद्धा असणार आहे याची मला खात्री आहे.
खुल्या दिलाने आपण कौतुक करूयात आणि काम करण्याची जिद्द वाढवत राहुयात 👍

मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏💪💪💪


06/04/2020

लॉकडाउन सुरू असताना सर्व बँका आणि वित्तीय संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरू ठेवून अनेक संभाव्य अडचणी मिटवल्या आहेत. त्यांच्या तत्पर सेवावृत्तीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

#आम्ही_कृतज्ञ_आहोत

06/04/2020

व्यंगचित्रकार अविनाश पाटील यांनी आपल्या कलेतून दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला मानवंदना.🚩

महाराष्ट्राला वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जाईन :- मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब ठाकरे.
एका वाक्यात जग जिंकले...साहेब 🚩 - व्यंगचित्रकार अविनाश पाटील

06/04/2020
उद्धवसाहेब

"सन्माननीय मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे जी आपणास माझे कोटी कोटी प्रणाम. तुम्ही माझ्या पाठीशी जात, पात, धर्म मागे सोडून मोठ्या भावाप्रमाणे उभे राहिलात त्यासाठी आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत.."

लॉकडाउन मुळे दिल्लीत अडकलेल्या #एलिझाबेथपिंगळे यांची प्रतिक्रिया.

06/04/2020

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने मराठी प्रवाशांना महाराष्ट्र सदनात निवारा !

06/04/2020

लॉकडाऊन मध्ये #शिवभोजन ठरतेय वरदान !

#जळगाव

06/04/2020

लॉकडाऊन...आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे..!

06/04/2020

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य सरकारचे विविध विभाग एकवटले !

05/04/2020

उद्धव ठाकरे यांनी 'ताई' म्हटले आणि मला माझा भाऊच खंबीरपणे पाठीशी उभा असल्यासारखे वाटले - मुलुंडच्या एलिझाबेथ पिंगळेंनी व्यक्त केला आनंद

ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी ताई म्हटले आणि मला माझा भाऊच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यासारखे वाटले. मुख्यमंत्री सरांनी मला मदत केली. मी आताच महाराष्ट्र सदनमध्ये राहण्यासाठी आले. आता मुंबईला कधीही जायला मिळो, मला आत्ताच घरी आल्यासारखे वाटतेय, माझ्या लोकांमध्ये आल्यासारखे वाटतेय, इस्त्राईलहून दिल्लीला परतलेल्या पण लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडलेल्या श्रीमती एलिझाबेथ पिंगळे आनंदाने सांगत होत्या.

एलिझाबेथ पिंगळे, मुलुंडच्या रहिवाशी, आजारी वडिलांना भेटायला इस्त्राईलला गेल्या. दुर्दैवाने वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे तेथील वास्तव्य लांबले. त्या २१ मार्चला निघून २२ मार्चला नवी दिल्लीत पोहोचल्या. संध्याकाळी मुंबईचे विमान होते. परंतु त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले गेले. त्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्या. १४ दिवसानंतर अचानक हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना हॉटेल बंद होत असल्याचे कारण सांगत त्यांची सोय दुसऱ्या हॉटेलमध्ये केली व ते पसंत नसल्यास स्वत:ची व्यवस्था स्वत: करण्यास सांगितले.

श्रीमती एलिझाबेथ यांनी स्वत:सह महाराष्ट्रातील ४० जण येथे अडकले असून या सर्वांना मदत करावी असा संदेश देणारा व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअप वर टाकला. या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एलिझाबेथ पिंगळे यांच्याशी नवी दिल्ली येथे दूरध्वनीहून संपर्क साधला आणि त्यांची व्यवस्था महाराष्ट्र सदन येथे करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ दिवसांच्या क्वारंटाईननंतर आणि आरोग्य विभागाच्या मान्यतेनंतर आज त्या महाराष्ट्र सदन येथे सुखरूप पोहोचल्या.

तुम्ही एकट्या नाहीत. घाबरून जाऊ नका. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत हे सांगणारा आश्वासक संवाद आणि पुढे केलेला मदतीचा हात पाहून मी खूप भारावून गेले आहे. आपल्याच माणसांनी इतकी आस्थेवाईकपणे चौकशी केली. माझी व्यवस्था केली. मी त्या सगळ्यांची विशेषत: मुख्यमंत्री, त्यांचे प्रधान सचिव विकास खारगे सर, महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि इतर अधिकारी या सगळ्यांची खूप आभारी आहे. एलिझाबेथ पिंगळे सांगत होत्या आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामधून उत्साह आणि आनंद ओतप्रोत डोकावत होता.

क्वारंटाईन कालावधी संपलेल्या महाराष्ट्रातील रहिवाशांची सदनात सोय - समीर सहाय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार परदेशातून नवी दिल्ली येथे आलेल्या आणि क्वारंटाईन होण्यास सांगितलेल्या परंतु आता क्वारंटाईन कालावधी संपला आहे आणि त्यांना आरोग्य विभागाने घरी जाण्यास मान्यता दिली आहे अशा महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांची लॉकडाऊन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सदन येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी दिली आहे. ते म्हणाले की विविध देशातून महाराष्ट्रात जाण्यासाठी आलेले नागरिक होम क्वारंटाईनमुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे राज्यात परत जाऊ शकले नाहीत यात इटलीहून परतलेले १५ विद्यार्थीही आहेत. या सर्वाची लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत महाराष्ट्र सदनात व्यवस्था करण्यात आली आहे. काही जण राहण्यासाठी सदनात आले देखील आहेत. उर्वरित लोक त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर आरोग्य विभागाच्या मान्यतेने सदनात दाखल होणार आहेत असेही ते म्हणाले. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील रहिवाशांची अशा पद्धतीने नवी दिल्ली येथे व्यवस्था करणारे महाराष्ट्र सदन हे एकमेव सदन ठरले आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

Address

Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena Social Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

ShareYou may also like