Shri Narendra B.Verma

Shri Narendra B.Verma Shri Narendra B. Verma is currently the National General Secretary / Spokesperson of the Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar.

He has scaled the heights of success by sheer hard work and unflinching dedication to the cause of fellow Indians.

त्याग आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण अर्थात बकरी ईद@@ यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ​ ​ ​
28/05/2026

त्याग आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण अर्थात बकरी ईद@@ यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ​

आधुनिक भारताचे शिल्पकार आणि देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृ...
27/05/2026

आधुनिक भारताचे शिल्पकार आणि देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
​१७ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी केवळ देश सांभाळला नाही, तर एका सशक्त भारताचा पाया रचला. ​"मोठी धरणे आणि उद्योग ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत," असे नेहरू म्हणायचे. भाकरा-नांगल, हिराकूड सारखी धरणे आणि भिलाई, रुरकेला येथील पोलाद कारखाने उभारून त्यांनी देशाला औद्योगिक क्षेत्रात स्वावलंबी बनवले. आज भारत अंतराळ आणि अणू ऊर्जेत जी भरारी घेत आहे, त्याचे श्रेय नेहरूंच्या दूरदृष्टीला जाते. त्यांनी डॉ. होमी भाभा यांच्या साथीने अणू ऊर्जा आयोग आणि आजच्या ISRO चा पाया रचला. तसेच IIT, IIM आणि AIIMS सारख्या जागतिक दर्जाच्या संस्था सुरू केल्या.
वैज्ञानिक दृष्टिकोन (Scientific Temper), सशक्त लोकशाही आणि आर्थिक प्रगतीची दारे खुली करून देणाऱ्या या महामानवाचे विचार आजही देशाला दिशा दाखवणारे आहेत. आधुनिक भारताच्या या जनकाला कोटी कोटी प्रणाम.

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! ​भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याल...
27/05/2026

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
​भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून, कोट्यवधी उपेक्षितांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या, अथांग संकटांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या माऊली माता रमाई यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
जर माता रमाईंनी बाबासाहेबांना कौटुंबिक चिंतेतून मुक्त केले नसते, तर बाबासाहेब कोट्यवधी दीन-दुबळ्यांचे उद्धारकर्ते बनू शकले नसते. आज आपण ज्या हक्कांचे आणि सन्मानाचे जीवन जगत आहोत, त्यामागे माता रमाईंचा फार मोठा त्याग आहे. त्यांच्या त्यागाला सलाम. ​ #माता_रमाई #रमाई_स्मृतिदिन

भारताला संगणक आणि दूरसंचार क्षेत्राची ओळख करून देणारे आणि १८ वर्षांवरील तरुणांना मतदानाचा अधिकार देऊन युवाशक्तीला बळ देण...
21/05/2026

भारताला संगणक आणि दूरसंचार क्षेत्राची ओळख करून देणारे आणि १८ वर्षांवरील तरुणांना मतदानाचा अधिकार देऊन युवाशक्तीला बळ देणारे दूरदर्शी नेते, ​भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न श्री. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
देशाच्या प्रगतीसाठी आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी त्यांनी दिलेले योगदान देश सदैव लक्षात ठेवेल.

भारतीय उद्योगाचे जनक, महान द्रष्टे आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस आण...
19/05/2026

भारतीय उद्योगाचे जनक, महान द्रष्टे आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस आणि कार्यास विनम्र अभिवादन!
​त्यांनी केवळ उद्योगच उभारले नाहीत, तर आत्मनिर्भर भारताचा भक्कम पाया रचला. त्यांनी भारताला जागतिक पातळीवर मन मिळवून दिला, त्यांना कोटी कोटी प्रणाम.
​ #जमशेटजी_टाटा

क्रांतिकारक सुखदेव थापर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासा...
15/05/2026

क्रांतिकारक सुखदेव थापर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर चढणाऱ्या या महान सुपुत्राचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील.
​ #क्रांतिकारक #जयहिंद

अत्यंत दुःखद!आमच्या शाळेचे आधारस्तंभ आणि विश्वस्त आदरणीय सुहेल सिंग खांबे सर यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त...
14/05/2026

अत्यंत दुःखद!
आमच्या शाळेचे आधारस्तंभ आणि विश्वस्त आदरणीय सुहेल सिंग खांबे सर यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने आमच्या संस्थेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने प्रगतीची अनेक शिखरे सर केली. जानकीदेवी पब्लिक स्कूल या शिक्षण संस्थेसाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि संस्थेला नावलौकिक मिळवून दिला. या साठी संथा त्यांची सदैव ऋणी राहील.
सरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले.
त्यांना ​भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

"रुग्णांची सेवा हीच ज्यांच्या आयुष्याची जनसेवा आहे, अशा सर्व परिचारिकांना 'जागतिक परिचारिका दिना'च्या मनापासून शुभेच्छा!...
12/05/2026

"रुग्णांची सेवा हीच ज्यांच्या आयुष्याची जनसेवा आहे, अशा सर्व परिचारिकांना 'जागतिक परिचारिका दिना'च्या मनापासून शुभेच्छा!
​तुमचे समर्पण आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या अहोरात्र कष्टाबद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत.

#जागतिक_परिचारिका_दिन

भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक प्रवासाचा आणि प्रगतीचा अभिमान व्यक्त करणारा दिवस! ​आज 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस'. १९९८ च्य...
11/05/2026

भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक प्रवासाचा आणि प्रगतीचा अभिमान व्यक्त करणारा दिवस!
​आज 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस'. १९९८ च्या पोखरण अणुचाचणीने भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली. देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना मानाचा मुजरा!

09/05/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते श्री. विकास लवांडे यांच्यावर आळंदीत शाईफेक झाल्याची, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक लावणारी आहे.
श्री. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, पण अशा प्रकारे वैयक्तिक हल्ला करणे ही भ्याडवृत्ती आहे. ही वारकरी संप्रदायाची शिकवण नक्कीच नाही. कोणत्याही व्यक्तीवर संघटित पद्धतीने हल्ला करणे, धमक्या देणे आणि सामाजिक वातावरण दूषित करणे हे कायद्याने गंभीर अपराध आहेत. वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा मिळता कामा नये.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या भ्याड हल्लेखोरांना अटक करावी अशी आमची मागणी आहे!

Address

Shop No. 3, Sanvin Apt. , Near DCB Bank, Popco Colony Road, 7 Bungalows, Yari Road, Andheri West, Mumbai/
Mumbai
400061

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Narendra B.Verma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shri Narendra B.Verma:

Share