01/09/2026
28 ऑगस्ट 2026
#न्याया संस्थेच्या वतीने एन. सी.पी.ए नरिमन पॉइंट इथे #संविधान_फेलोशिप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बाल न्याय समिती, मुंबई उच्च न्यायालय, या समितीच्या अध्यक्षा मा. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) आर. बी. चव्हाण सर तसेच महिला बाल विभाग मंत्री अदिती तटकरे मॅडम पण उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशीका हिचे वाचन करण्यात आले. अथांग प्रणाली ह्या मुलाने सुंदर वाचन केले. त्यानंतर धारावीतील युवकांच्या गटाने सादरीकरण केले. आणि संविधान फेलोसाठी निवड झालेल्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमापूर्वी या फेलोकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यांनी काय काम करणे अपेक्षित आहे यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत लीला पाताडे आणि संतोष शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
Santosh Shinde Vidhayak Bharti