04/09/2026
📅 ०३/०९/२०२६
📍 मोताळा
महावितरणच्या भोंगळ व मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात!
आमरण उपोषण — दिवस १ ला
महावितरणच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी, ग्राहक आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून आपल्या वीजविषयक समस्या व अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेत, त्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन ठामपणे पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.
उपोषणाची पुढील दिशा, आंदोलनाची भूमिका आणि शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी करण्यात येणाऱ्या पाठपुराव्याबाबत पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
या वेळी मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांची उपस्थिती लाभली.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार!
मागण्या मान्य होईपर्यंत लढा थांबणार नाही!
#आमरणउपोषण #महावितरण #शेतकरी #मोताळा #शिवसेना युवासेना धर्मवीरयुथफाऊंडेशन पृथ्वीराजसंजयगायकवाड शेतकरीआंदोलन वीजप्रश्न