19/08/2026
*रेल्वे पोलीस वसाहती येथील सभामंडपाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ*
घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार मा. *परागभाई शाह* साहेब यांच्या सहकार्याने आज दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस वसाहती येथे सभामंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
स्थानिक नागरिकांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभामंडप ही अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन या सभामंडपाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले असून, या कामामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगली, सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.
नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मा. *परागभाई शाह* साहेब यांच्या सहकार्याने हे महत्त्वपूर्ण विकासकाम प्रत्यक्षात साकार होत आहे. या कामाच्या शुभारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी उपस्थित —
हरीष बोलार, रेणुका राऊळ, मंदा दिघे, रेवती सपकाळ, संगीत ढिकले, नंदा घोडके, हरेंद्र यादव, विजय कदम, नितीन दर्जी, आशुतोष केदारे, संदीप शिंदे तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
मंडळ अध्यक्ष 125/133
सौ. अर्पिता शेलार
संघदीप मनोहर केदारे*
*अध्यक्ष – वॉर्ड क्र. १२५*
*वैभव पाचपुते*
*महामंत्री.१२५*
अनिल साळस्कर
बूथ प्रमुख एसईओ ,(Senior Executive officer )
Social Media president of ward 125 , BLA of SIR .
*सविताताई कापसे*
*महिला वॉर्ड अध्यक्षा १२५*