Amdar Sanskrutik Mahotsav Centre Nagpur

Amdar Sanskrutik Mahotsav Centre Nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amdar Sanskrutik Mahotsav Centre Nagpur, Social service, Centre Nagpur, Nagpur.

10/08/2026

सुरांची जादू… संगीताची मैफल… आणि एक अविस्मरणीय संध्याकाळ!

🎤 गजेंद्र प्रताप सिंह LIVE
Live Singing Concert

मनमोहक आवाज, दमदार सादरीकरण आणि सुरांची रंगत अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

📅 रविवार, 23 ऑगस्ट 2026
📍 भारत माता चौक, जागनाथ बुधवारी, नागपूर
🕕 सायंकाळी ६ वाजता

चला, सुरांच्या या अविस्मरणीय मैफलीचा आनंद एकत्र घेऊया!

भव्य मंगळागौरी स्पर्धा २०२६       #भव्य_मंगलागौरी_स्पर्धा_2026
09/08/2026

भव्य मंगळागौरी स्पर्धा २०२६


#भव्य_मंगलागौरी_स्पर्धा_2026

भजनात विठू डोलतो....आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती, मध्य नागपूरच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त मध्य नागपुरातील भजन मंडळां...
28/07/2026

भजनात विठू डोलतो....

आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती, मध्य नागपूरच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त मध्य नागपुरातील भजन मंडळांसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

वय हा केवळ आकडा आहे, आपली कला कोणत्याही वयात जपता येतेच. तब्बल १५६ भाजनी मंडळांचा सहभाग व पारंपरिक वेशभूषा, भक्तिमय वातावरण, कला-कौशल्य आणि संघभावनेमुळे या स्पर्धेला विशेष रंगत आली. विठ्ठल भक्तीबरोबरच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे सुंदर दर्शन यानिमित्ताने घडले.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळाना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देऊन, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आपल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा वारसा जपणाऱ्या या भजन मंडळाचा उत्साह खरोखरच प्रेरणादायी आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन...!

*बुधवारी २२ जुलै ला वारकरी अभंग भजन स्पर्धेचे आयोजन*          *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस...
22/07/2026

*बुधवारी २२ जुलै ला वारकरी अभंग भजन स्पर्धेचे आयोजन*
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य मध्य नागपूरात १५६ भजनी मंडळ करणार विठ्ठल भक्तीचा जागर*
—-संकल्पना—-
*श्री प्रवीणजी दटके , आमदार- मध्य नागपूर*
——————————
आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर द्वारे आमदार प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून *महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आषाढ पर्वनिमित्ताने मध्य नागपूरात १५६ वारकरी भजन मंडळ विठ्ठल भक्तीचा जागर* करणार आहेत. वारकरी अभंग भजन स्पर्धेच्याप्राथमिक फेरीच *आयोजन बुधवार २२ जुलै रोजी शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधीसागर महाल येथे तर गुरुवार २३ जुलै रोजी ब्राह्मणी माता मंदिर, नाईक तलाव येथे सकाळी ९ ते ५ वेळेत संपन्न होईल. भजन *स्पर्धेचे उद्घाटन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी आमदार श्री अनिलजी सोले यांचे हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे, भाजप शहर अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, माजी आमदार विकासजी कुंभारे, माजी आमदार नागो गाणार, भाजप महिला आघाडी अध्यक्ष सौ दिव्याताई धुरडे, माजी महापौर सौ अर्चनाताई डेहनकर, महामंत्री श्रीकांत आगलावे , श्री अनिल मानापुरे, श्याम चांदेकर, श्री संजय बालपांडे, मध्य नागपूरचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी पदाधिकारी* उपस्थित राहतील.
या स्पर्धेत जवळपास मध्य नागपुरातील १५६ भजनी मंडळांनी सहभाग घेतला असून त्यामधील *निवडीत २१ उत्तम विजेत्यां भजनी मंडळांची महाअंतिम फेरी सोमवार दि २७ जुलै रोजी शिक्षक सहकारी बँक सभागृह महाल येथे सकाळी ११ ते ४ पर्यंत आयोजित असून संध्या ४.३० वाजता बक्षीस वितरण सोहळा मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत संपन्न* होईल. या सामूहिक अभंग गायन स्पर्धेत भजनी मंडळांना तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि १ विठ्ठलाचे भक्तीगीत, गवळण किवा भारूड अशी २ गीत ८ मिनिटांच्या आत सादर करायची आहेत. या *स्पर्धेची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची आहे.* विठ्ठलभक्तांनी आषाढी निमित्त होणाऱ्या विठ्ठल भक्तीच्या जागरात उपस्थित राहून भजनी मंडळांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर द्वारे करण्यात आले आहे.

🙏🙏विनीत🙏🙏
आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती- मध्य नागपूर

20/07/2026

🙏 गजर विठ्ठल नामाचा 🙏

आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने विठ्ठलभक्तीच्या रंगात चिंब भिजवणाऱ्या अविस्मरणीय संगीतमय वारीचा आनंद घ्या!

🎤 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांच्या सुमधुर स्वरांत विठ्ठलनामाचा गजर अनुभवण्याची सुवर्णसंधी.

🗓 शुक्रवार, २४ जुलै २०२६
🕕 सायं. ६.०० वा.
📍 कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर

🎟 प्रवेश विनामूल्य

आपण, आपल्या परिवारासह आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

#गजरविठ्ठलनामाचा #आषाढीएकादशी

गजर विठ्ठल नावाचा....!
20/07/2026

गजर विठ्ठल नावाचा....!


15/04/2026

उद्या, गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी,
सायं ०६:३० वा.
बारसे नगर, पाचपावली, नागपूर येथे ऐकुया
“भीम संध्या"
"गजर भीम गीतांचा"

बाबासाहेबांच्या विचारांना वंदन करत, भीमगीतांच्या स्वरांतून प्रेरणादायी संध्या अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती...!

#भीम_संध्या

Address

Centre Nagpur
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amdar Sanskrutik Mahotsav Centre Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share