03/09/2026
📰 पुण्यात मध्यरात्री संतोष पंडित यांना पोलिसांकडून अटक; कारण अद्याप अस्पष्ट
पुणे : संतोष पंडित यांना पोलिसांनी रात्री सुमारे १ वाजता त्यांच्या घरी जाऊन अटक केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, त्यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात किंवा कोणत्या कारणामुळे अटक करण्यात आली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.
काही दिवसांपूर्वी संतोष पंडित यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाच्या HSRP नंबर प्लेटबाबत सवाल उपस्थित करत जाब विचारला होता. त्यामुळे सध्या त्यांच्या अटकेचा आणि त्या घटनेचा काही संबंध आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, अटकेचे कारण अधिकृतपणे समोर आलेले नसल्याने या दोन्ही घटनांमध्ये थेट संबंध असल्याचे सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही. पोलिसांकडून अधिकृत माहिती किंवा कारवाईचे कारण समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
या अटकेमागे नेमके काय कारण आहे? संतोष पंडित यांनी उपस्थित केलेल्या HSRP नंबर प्लेटच्या प्रश्नाशी याचा काही संबंध आहे का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
— बारुळ ग्रामवृत्त #सतोषपंडित