13/01/2026
अखिल भारतीय मराठा महासंघ एच. ए. एल. ओझर टाउनशिप शाखेच्या वतीने मराठा दर्पण दिनदर्शिका २०२६, विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्ती सत्कार सोहळा ओझर येथील शिंदे लॉन्स ला उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्री. अजित शिरसाठ, श्री. गणेश क्लिनिक ओझर यांनी उपस्थिती दिली व मार्गदर्शन केले.
श्री. भैय्यासाहेब देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपिठावर मार्गदर्शकांसह श्री. यतीन कदम, श्री. प्रशांत आहेर, श्री. सचिन ढोमसे, श्री. संजय मोरे, श्री. दीपक टावरे, श्री. अशोक कदम, श्री. दिपक पाटील, श्री. अशोक शिंदे, श्री. मनोहर खालकर, श्री. सूर्यभान ठाकरे व सौ. योगिता कदम होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले.
शाखा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली.
डॉ. अजित शिरसाठ यांनी आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी व मुलांना मोबाईल पासून दूर ठेऊन त्यांना खेळांमध्ये रुची वाढवावी, एकाग्रता कशी वाढवावी असे उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थांना पुढील वाटचालीस प्रोत्साहित केले.
श्री. यतीन कदम, श्री. प्रशांत आहेर, श्री. सचिन ढोमसे, श्री. अशोक कदम, श्री. संजय मोरे, श्री. दीपक टावरे यांनी कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व मार्गदर्शन केले
सेवानिवृत्त सभासदांना शाल, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सर्टिफिकेट, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
भैय्यासाहेब देशमुख यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र वाळुंज यांनी केले.
श्री. गजानन फासाटे यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी टाउनशिप शाखेचे अशोक शिंदे, कैलास रिकामे, प्रदीप दाते, ज्ञानेश्वर गुंड, गजानन फासाटे, विजय गायके, राहुल जाधव, अरुण शिंदे, गणेश चांदगुडे, संदीप झोमन, मंगेश चव्हाणके, जीभाऊ पाचोरे आणि कार्यकारणीने प्रयत्न केले.