Seema Hiray-सीमा महेश हिरे

Seema Hiray-सीमा महेश हिरे MLA From Nashik West Constituency | President Samarth Mahila Mandal | Bjp Maharashtra 🇮🇳 I will try my best to revert back at the earliest to all your feedback.

Everybody is welcome to post their comments, suggestions and complaints pertaining to our ward.

📍 पांगरे नगर, नाशिक🕒 ४ सप्टेंबर २०२६ | सायं. ७:०० वा.प्रभाग क्रमांक २४ मधील वेदांत गॅलेक्सी अपार्टमेंट, पांगरे नगर परिसर...
05/09/2026

📍 पांगरे नगर, नाशिक
🕒 ४ सप्टेंबर २०२६ | सायं. ७:०० वा.

प्रभाग क्रमांक २४ मधील वेदांत गॅलेक्सी अपार्टमेंट, पांगरे नगर परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. माझ्या आमदार निधीतून हाती घेण्यात आलेल्या या कामामुळे परिसरातील रस्त्यांना अधिक मजबुती मिळणार असून, नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. भूमिपूजनानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

यावेळी महेश हिरे, राजेंद्र जडे, नगरसेवक बंटी तिदमे, पल्लवी गणोरे, पुनम महाले, प्रकाश चकोर, राहुल गणोरे, रोहन काणकाटे, महेंद्र पाटील, रवी पाटील, यतिन कुलकर्णी, पारख साहेब, रितेश पाटील, प्रशांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

ज्ञानाच्या दिव्याने अज्ञानाचा अंधार नाहीसा करून, जीवनात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा...
05/09/2026

ज्ञानाच्या दिव्याने अज्ञानाचा अंधार नाहीसा करून, जीवनात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस म्हणजेच शिक्षक दिन. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवतात, त्यांच्या जीवनात योग्य मूल्यं, संस्कार आणि ध्येयदृष्टी निर्माण करतात.

एक चांगला शिक्षक म्हणजे प्रेरणास्त्रोत, आदर्श आणि आयुष्यभर मार्गदर्शक ठरतो. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनाच्या यशाचा वाटा हा आपल्या गुरुजनांच्या ऋणात आहे. आजच्या या दिवशी सर्व शिक्षकांना वंदन करते, त्यांच्यामुळेच आपले भविष्य उज्ज्वल आहे. त्यांच्या त्याग, संयम आणि अथक परिश्रमांना माझा सलाम.

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#शिक्षकदिन

भगवान श्रीकृष्णाने आपल्या बाललीला, गोकुळातील मुरलीच्या गोड स्वरांनी, प्रेम व मैत्रीच्या बंधांनी आणि दहीहंडीच्या उत्साहात...
04/09/2026

भगवान श्रीकृष्णाने आपल्या बाललीला, गोकुळातील मुरलीच्या गोड स्वरांनी, प्रेम व मैत्रीच्या बंधांनी आणि दहीहंडीच्या उत्साहातून आपल्याला श्रम, संघटन, परिश्रम व एकतेचा संदेश दिला. “उंच टांगलेल्या दहीहंडीपर्यंत पोहोचण्यासाठी जशी साखळी बनवून सर्वांनी मिळून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावला, तसेच आयुष्यातील प्रत्येक संघर्ष जिंकण्यासाठी एकता, धैर्य व परिश्रम हेच आपले खरे बळ आहे” असा सुंदर धडा श्रीकृष्णाच्या लीलांमधून मिळतो.

दहीहंडी म्हणजे उत्साहाचा, जिद्दीचा, समतेचा आणि निष्ठेचा सण. या पावन सणाच्या निमित्ताने सर्व गोविंदांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा ; आपल्या जीवनात नेहमीच आनंदाचे, ऐक्याचे, सुख-समृद्धीचे आणि यशाचे मटकी फुटत राहो.

#श्रीकृष्णजन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी - गोपाळकाला या पावन निमित्ताने श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. लहानग्या माखनचोराचा हा जन्मोत्सव आपल्...
04/09/2026

कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी - गोपाळकाला या पावन निमित्ताने श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

लहानग्या माखनचोराचा हा जन्मोत्सव आपल्याला नेहमी धर्म, सत्य आणि प्रेम या मूल्यांची जाणीव करून देतो. दहीहंडीच्या खेळकर सोहळ्यातील एकता, बंधुता आणि गोपाळकालाच्या आनंदमयी क्षणांनी समाजातील ऐक्य व सहकार्याची परंपरा जपली आहे.

श्रीकृष्णाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवोत हीच प्रार्थना.

#श्रीकृष्णजन्माष्टमी

रामलल्लांसमोर उभं राहिल्यावर शब्दही अपुरे पडतात… 🚩२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि देश...
03/09/2026

रामलल्लांसमोर उभं राहिल्यावर शब्दही अपुरे पडतात… 🚩

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि देशभरातील असंख्य रामभक्तांच्या मनात एकच इच्छा निर्माण झाली होती… कधी एकदा अयोध्येला जाऊन रामलल्लांचे दर्शन घेईन, तशीच तळमळ माझ्या मनात देखील सातत्याने होती, तीच आतुरता होती, की कधी डोळे भरून रामलल्लांना बघेल, त्यांच दर्शन घेईल आणि परवाच्या दिवशी तो क्षण प्रत्यक्ष अनुभवता आला.

अयोध्येत माझ्या मैत्रिणी, विधानसभेतील सहकाऱ्यांसोबत रामलल्लांचे दर्शन घेतले. समोर रामलल्लांची मूर्ती दिसताच मनात एक वेगळीच शांतता उतरली. डोळे पाणावले आणि मन भरून आलं. हे मंदिर पाहताना त्या असंख्य कारसेवकांचे बलिदान आठवत होते. मंदिरासाठी वर्षानुवर्षे अथक प्रयत्न करणाऱ्या असंख्य हिंदू बांधवांची श्रद्धा आणि संघर्ष आठवत होता. त्या सर्वांच्या भावनेचं सुंदर रूप आज आपल्या डोळ्यांसमोर उभं आहे.

अयोध्येच्या या भव्य मंदिराचा परिसर, स्वच्छता, हिरवाई, सोनेरी कळस आणि ध्वज… प्रत्येक गोष्ट मनाला स्पर्शून जाते. रामायणातील प्रसंगांची सुंदर मांडणी पाहताना आपण त्या काळातच पोहोचल्यासारखं वाटतं. आणि या सगळ्यापेक्षा मोठा अनुभव म्हणजे रामलल्लांसमोर उभं राहण्याचा तो क्षण.

आजही मनात रामनाम सुरू आहे.

रामलल्लांच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली… नाशिकचा आगामी कुंभमेळा सर्वांच्या सहकार्याने, आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडू दे. नाशिकवर आणि प्रत्येक भाविकावर रामलल्लांची कृपादृष्टी राहू दे.

हा दिवस आणि हे दर्शन… मनात कायमचं जपून ठेवेन.

Monica Rajeev Rajale Meghna Sakore Bordikar Rashmi Hiray Bendale BJP Maharashtra

देवगिरी निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी विविध विषयांवर...
02/09/2026

देवगिरी निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. अनेक महिला विषयक कल्याणकारी योजना, राज्यातील तसेच मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा यावेळी केली. यावेळी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती मोनिका राजळे देखील उपस्थित होत्या.

Sunetra Ajit Pawar

📍मंत्रालय | राखीच्या धाग्यासोबत विकासकामांचा विश्वासाचा धागाही…!लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, अनेक लोककल्याणकारी योजनांचे ...
01/09/2026

📍मंत्रालय | राखीच्या धाग्यासोबत विकासकामांचा विश्वासाचा धागाही…!

लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, अनेक लोककल्याणकारी योजनांचे जनक, राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना रक्षाबंधनानिमित्त आज मंत्रालयात राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामांसह इतर महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.

Devendra Fadnavis

मंत्रिमंडळ निर्णय !- नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ...
01/09/2026

मंत्रिमंडळ निर्णय !

- नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)

- शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)

- सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

- कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)

#मंत्रिमंडळनिर्णय

01/09/2026

भारताची प्रगती थांबवण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत…!

भारत वेगाने प्रगती करत असताना या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे अनेकजण आहेत. देशाला आणि देशाच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचेही प्रयत्न सातत्याने होत आहेत.

अशा वेळी कोणत्याही प्रचाराला किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रयत्नांना बळी न पडता, त्यामागची कार्यपद्धती समजून घेणे गरजेचे आहे. सत्य काय आहे, हे जाणून घेण्याची सवय ठेवली पाहिजे. देशाच्या हिताचा विचार करून प्रत्येक गोष्टीकडे पाहायला शिकले पाहिजे.

भारताच्या प्रगतीचा प्रवास थांबवण्यासाठी कितीही प्रयत्न झाले, तरी जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे.

Narendra Modi Devendra Fadnavis Nitin Nabin Ravindra Chavan BJP Maharashtra BJP INDIA

Address

Nashik
Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seema Hiray-सीमा महेश हिरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Seema Hiray-सीमा महेश हिरे:

Shortcuts

Share