नगरसेविका शशिकला रंगनाथ औटी

नगरसेविका शशिकला रंगनाथ औटी नगरसेविका - प्रभाग 22 क
न. मुं. मा. पा
महिला उपशहर संघटक
शिवसेना 🏹

06/06/2026

आपल्या प्रभागातील आदर्श सोसायटी, सेक्टर-२, नेरूळ येथे झाड पडल्याची दुर्घटना घडली. सदर घटनेची माहिती सोसायटीचे सचिव श्री. राजेश पुजारी यांनी तत्काळ आपल्या प्रभागाचे कार्यसम्राट मा. नगरसेवक श्री. रंगनाथ औटी साहेब यांना दिली.

माहिती मिळताच औटी साहेबांनी तात्काळ दखल घेत फायर ब्रिगेडला पाचारण करून आवश्यक कार्यवाही केली व पडलेल्या झाडामुळे निर्माण झालेली अडचण त्वरित दूर करण्यात आली.

संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे, हीच आमची बांधिलकी.

सौ. शशिकला रंगनाथ औटी
नगरसेविका, शिवसेना 🚩

स्वराज्याचा विजय, स्वाभिमानाचा उत्सव आणि शिवविचारांचा जागर!🚩 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩         😍
06/06/2026

स्वराज्याचा विजय, स्वाभिमानाचा उत्सव आणि शिवविचारांचा जागर!
🚩 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

😍

मी दोन-तीन सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाण्याचे नमुने तपासले. बाहेरील जलवाहिनीमधून येणारे पाणी आता पूर्वीइतके एवढे  ख...
05/06/2026

मी दोन-तीन सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाण्याचे नमुने तपासले. बाहेरील जलवाहिनीमधून येणारे पाणी आता पूर्वीइतके एवढे खराब येत नसून बऱ्याच प्रमाणात स्वच्छ आहे.
तथापि, मागील १५ दिवसांत जे दूषित पाणी पुरवठ्यात आले होते, त्यामुळे अनेक सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ व घाण साचलेली असण्याची शक्यता आहे. नवीन पाणी टाकीत आल्यानंतर हा साचलेला गाळ वर येतो आणि तेच पाणी घरांमध्ये पुरवले जाते.
तरी सर्व सोसायटीच्या कमिटी सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की, कृपया आपल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात, जेणेकरून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यास मदत होईल

*नगरसेविका*
*सौ शशिकला रंगनाथ औटी*

I personally visited two to three housing societies and inspected the water samples. The water being supplied through the external pipeline is now much cleaner than before and is no longer as contaminated as it was earlier.

However, since contaminated water was supplied over the past 15 days, there is a possibility that sludge, sediment, and dirt have accumulated in the water storage tanks of many societies. When fresh water enters these tanks, the accumulated deposits can get disturbed and mix with the water being supplied to households.

Therefore, I humbly request all society committee members and office bearers to kindly arrange for the cleaning of their society water tanks. This will help ensure that residents receive clean and safe drinking water.

Corporator
Mrs. Shashikala Ranganath Auti

❤️

ॲक्शन - रिऍक्शन 🚩आज सुरभी पॅराडाईज सोसायटी मधील रहिवासी माझ्या सर्व बहिणी पाण्याच्या समस्येसंदर्भात माझ्याकडे आल्या होत्...
03/06/2026

ॲक्शन - रिऍक्शन 🚩

आज सुरभी पॅराडाईज सोसायटी मधील रहिवासी माझ्या सर्व बहिणी पाण्याच्या समस्येसंदर्भात माझ्याकडे आल्या होत्या.

रात्री ११ वाजता मा. नगरसेवक श्री. रंगनाथ औटी साहेबांनी तात्काळ दखल घेत पाण्याचा 2 टँकर उपलब्ध करून देत तात्पुरती समस्या सोडवली.

तसेच, पुढील २ दिवसांत सुरभी पॅराडाईज सोसायटी मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे.

जनतेची समस्या हीच आमची जबाबदारी! 🚩

सौ. शशिकला रांगनाथ औटी.
नगरसेविका, शिवसेना 🚩

आज सकाळी महापौर महोदयांसमवेत प्रयोगशाळेत जाऊन पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालानुसार पाणी पिण्यायोग्य ...
03/06/2026

आज सकाळी महापौर महोदयांसमवेत प्रयोगशाळेत जाऊन पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालानुसार पाणी पिण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तरीही ज्या सोसायट्यांमध्ये पाण्याबाबत अधिक तक्रारी किंवा समस्या जाणवत असतील, त्या सोसायट्यांमध्ये स्वतंत्रपणे पाण्याची तपासणी करून घेतली जाईल. नागरिकांनी अशा समस्या असल्यास कृपया त्वरित कळवावे.

– *नगरसेविका*
*सौ शशिकला रंगनाथ औटी*💧🙏
महिला व बालकल्याण समिती सदस्य

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Alerts

Be the first to know and let us send you an email when नगरसेविका शशिकला रंगनाथ औटी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share