अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai

अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai मनसे प्रतिनिधि प्रभाग क्रमांक ३१ नवी

खांद्याला खांदा लावून लढणारा सहकारी...एकनिष्ठता आणि अफाट संघटन कौशल्याचा उत्तम संगम!सर्वांशी मिळून-मिसळून राहणारा आणि आप...
05/09/2026

खांद्याला खांदा लावून लढणारा सहकारी...
एकनिष्ठता आणि अफाट संघटन कौशल्याचा उत्तम संगम!
सर्वांशी मिळून-मिसळून राहणारा आणि आपल्या आपुलकीच्या स्वभावाने प्रत्येकाला सदैव हवाहवासा वाटणारा आमचा सच्चा बंधू...
​माझ्या निवडून येण्याच्या संपूर्ण प्रवासात, प्रचाराच्या धुमाळ्यात आणि प्रभागातील प्रत्येक संघर्षात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे प्रभाग क्र. २२ चे आमचे धडाडीचे विभाग अध्यक्ष श्री. अक्षय भोसले यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
​ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवन देवो. तुमच्या पाठीशी आमची साथ आणि प्रेम कायम राहील!

​शुभेच्छुक:
अभिजीत अनंत देसाई
नगरसेवक मनसे

अनुष्का अभिजीत देसाई
समाज सेविका

🚌 एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! 🚌एसटी बसमध्ये मिळणाऱ्या सवलतींचा (महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, ...
18/07/2026

🚌 एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! 🚌
एसटी बसमध्ये मिळणाऱ्या सवलतींचा (महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग इ.) लाभ घेण्यासाठी आता NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. जुनी आधार कार्डवरील सवलत लवकरच बंद होणार आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, नेरुळ येथे NCMC कार्ड नोंदणी शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
🗓️ दिनांक: २१ जुलै २०२६
⏰ वेळ: सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
📍 स्थळ: मनसे जनसंपर्क कार्यालय, दत्तात्रय कॉम्प्लेक्स, ऑफिस क्र. ७, सेक्टर-२, नेरुळ, नवी मुंबई.
📄 आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड आणि स्वतःचा मोबाईल (OTP साठी).
💵 सरकारी शुल्क: फक्त ₹१९९/-
सुट्ट्या पैशांची कटकट विसरा आणि कॅशलेस प्रवासाचा आनंद घ्या! आजच आपली नोंदणी करा. अधिक माहितीसाठी पोस्टरवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.

*संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम! ✨*सालाबाद प्रमाणे काल ७ फेब्रुवारी २०२६ रोजी, नेरुळ सेक्टर २ येथील नगरसेवक अभिजीत देस...
08/02/2026

*संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम! ✨*
सालाबाद प्रमाणे काल ७ फेब्रुवारी २०२६ रोजी, नेरुळ सेक्टर २ येथील नगरसेवक अभिजीत देसाई कार्यालय' मध्ये 'हळदी-कुंकू' समारंभ मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. 🚩
नवनिर्वाचित नगरसेवक श्री.अभिजीत देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्याला हजारो सुवासिनींनी उपस्थिती दर्शवली. वाण वाटप, तिळगुळाचा गोडवा आणि आपुलकीच्या गप्पांनी कार्यक्रमात चैतन्य भरले होते. आपल्या संस्कृतीचा हा वारसा असाच जपला जावा, हाच यामागचा मुख्य उद्देश होता.
उपस्थित सर्व भगिनींचे आणि मैत्रीनिची मनापासून आभार! 🙏

आपली
अनुष्का अभिजीत देसाई

#हळदीकुंकू #सांस्कृतिकवारसा #अभिजीतदेसाई #नेरुळ #नवीमुंबई #मराठीसण

07/02/2026

मनसे महिला हळदी कुंकू समारंभ २०२६ ( नेरूळ - जुईनगर विभाग )

नेरुळ जुईनगर मधील सर्व महिलांना कळविण्यात येते की आज ७ फेब्रूवारी (शनिवार ) संध्याकाळी ७~१० वाजेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्...
07/02/2026

नेरुळ जुईनगर मधील सर्व महिलांना कळविण्यात येते की आज ७ फेब्रूवारी (शनिवार ) संध्याकाळी ७~१० वाजेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फ़े हळदीकुंकू कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे तरी प्रभाग क्रमांक २२ मधील सर्व महिलांनी अभिजीत देसाई यांचे नगरसेवक कार्यालय सेक्टर २ नेरुळ येथे जमून हळदीकुंकू कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

आपली मैत्रीण
अनुष्का अभिजीत देसाई
मनसे प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 22

Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share