Nishant Bhagat - निशांत भगत

Nishant Bhagat - निशांत भगत Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nishant Bhagat - निशांत भगत, NAVI MUMBAI.

नगरसेवक, प्रभाग क्र. १८ (ड) नवी मुंबई महानगरपालिका
सदस्य – क्रीडा, संस्कृती व युवक कल्याण समिती
════════════
🔗www.nishantbhagat.com
🔗 Insta : nishant_bhagat
🔗 Twitter : bhagat_nishant
📧 [email protected]

सिंधी समाजाच्या अढळ श्रद्धेचा प्रतीक असलेला 'चालिया साहेब मेळावा' आज वाशीतील APMC फ्रूट मार्केट येथे उत्साहात पार पडला. ...
01/09/2026

सिंधी समाजाच्या अढळ श्रद्धेचा प्रतीक असलेला 'चालिया साहेब मेळावा' आज वाशीतील APMC फ्रूट मार्केट येथे उत्साहात पार पडला. सिंधी यूथ मंडल ट्रस्टच्या या कार्यक्रमात उपस्थित राहून भगवान श्री झूलेलाल जी यांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.

हा उत्सव आपल्याला संयम आणि समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची शिकवण देतो. या शुभमुहूर्तावर वरुण देव भगवान श्री झूलेलाल जी यांच्याकडे सर्वांच्या सुख-समृद्धीची आणि निरोगी आयुष्याची मनोभावे प्रार्थना केली.

कोळी बांधवांचा सणआलं आनंदाला उधाणशुभकार्याला करु सुरुवात नारळ अर्पूनी समुंदरात नारळी पौर्णिमा सणाच्या सर्वांना मनःपूर्वक...
27/08/2026

कोळी बांधवांचा सण
आलं आनंदाला उधाण
शुभकार्याला करु सुरुवात
नारळ अर्पूनी समुंदरात

नारळी पौर्णिमा सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#नारळीपौर्णिमा #कोळी

Eid-Milad-Un-Nabi Mubarak!ईद-ए-मिलाद मुबारक!
26/08/2026

Eid-Milad-Un-Nabi Mubarak!
ईद-ए-मिलाद मुबारक!

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाशी खाडी किनाऱ्यावरील 'नाखवा सिताराम भगत मार्ग' परिसराच्या साफसफाईसंदर्भात आज वन विभ...
24/08/2026

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाशी खाडी किनाऱ्यावरील 'नाखवा सिताराम भगत मार्ग' परिसराच्या साफसफाईसंदर्भात आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करून सविस्तर चर्चा केली. बाप्पाच्या आगमनापूर्वी हा परिसर स्वच्छ आणि भाविकांसाठी सुरक्षित व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

#गणेशोत्सव२०२६ #स्वच्छताअभियान

वाशीगांव 'नगरसेवक चषक २०२६' चा थरार संपन्न! 🏆 वाशीगांवच्या शिवतीर्थ मैदानावर रंगलेल्या या सामन्यांमध्ये तुर्भे गाव  आणि ...
23/08/2026

वाशीगांव 'नगरसेवक चषक २०२६' चा थरार संपन्न! 🏆

वाशीगांवच्या शिवतीर्थ मैदानावर रंगलेल्या या सामन्यांमध्ये तुर्भे गाव आणि करावे गाव या संयुक्त संघांमधील बाजी मारत प्रथम क्रमांकावर नाव कोरले! तर सानपाडा अ / सानपाडा ब संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांचे आणि सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! खेळाडूंचा उत्साह आणि थरार यामुळे ही स्पर्धा अविस्मरणीय झाली.

#नगरसेवकचषक२०२६ #क्रिकेटस्पर्धा #वाशीगांव

वाशी गावातील गणेश रामा पाटील यांच्या घराजवळील परिसरात पावसाचे पाणी आणि चिखल साचल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल...
23/08/2026

वाशी गावातील गणेश रामा पाटील यांच्या घराजवळील परिसरात पावसाचे पाणी आणि चिखल साचल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत NMMC च्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन संयुक्त पाहणी केली.

नागरिकांना या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

नवी मुंबईतील सानपाडा (सेक्टर १७) येथील ‘द अफेअर्स सीएचएस’ इमारतीत प्रस्तावित असलेल्या ‘मे. हौसा रेस्टॉरंट’ (बार अँड रेस्...
22/08/2026

नवी मुंबईतील सानपाडा (सेक्टर १७) येथील ‘द अफेअर्स सीएचएस’ इमारतीत प्रस्तावित असलेल्या ‘मे. हौसा रेस्टॉरंट’ (बार अँड रेस्टॉरंट / आर्केस्ट्रा बार) च्या परवान्याला आमचा आणि सर्व स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

आज राज्याचे वनमंत्री मा. गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि यासंदर्भातील निवेदन सादर करून सानपाडावासीयांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या.

शासनाकडे मांडलेले प्रमुख मुद्दे आणि हरकती:
* शासकीय धोरण: राज्य सरकारच्या २७ जुलै २०२६ च्या परिपत्रकानुसार नवीन ऑर्केस्ट्रा बार परवाने न देणे आणि जुन्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे स्पष्ट धोरण आहे.
* नागरिकांची सुरक्षितता: या इमारतीत ‘ॲडव्हान्स आय हॉस्पिटल’ आहे. तसेच अवघ्या २०० मीटरच्या परिघात ‘जयपुरीयार शाळा’ आणि नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आहे. येथे दारूचा आणि ऑर्केस्ट्रा बार सुरू झाल्यास महिला, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.
* जनतेचा तीव्र विरोध: या परवान्याविरोधात परिसरातील ५०० हून अधिक नागरिक आणि गृहनिर्माण सोसायट्यांनी लेखी हरकती नोंदवल्या आहेत.
सानपाडा परिसरातील सुसंस्कृत वातावरण, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू देणार नाही. स्थानिक रहिवाशांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील!

सेक्टर-१६ए, सानपाडा-पामबीच येथील Satyam Altura परिसरात गॅस पाइपलाइन कामाचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, सोय...
18/08/2026

सेक्टर-१६ए, सानपाडा-पामबीच येथील Satyam Altura परिसरात गॅस पाइपलाइन कामाचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

नवी मुंबईतील घणसोली येथे 'मेटा मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल'चे आज आदरणीय श्री. गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन क...
17/08/2026

नवी मुंबईतील घणसोली येथे 'मेटा मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल'चे आज आदरणीय श्री. गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल अनुभवी डॉक्टर आणि सर्वोत्तम सेवेच्या जोरावर उत्तम वाटचाल करेल यात शंका नाही. याप्रसंगी उपस्थित राहून हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रावणातील पवित्र आणि मंगलमय सण नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  #नागपंचमी
17/08/2026

श्रावणातील पवित्र आणि मंगलमय सण नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#नागपंचमी

Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nishant Bhagat - निशांत भगत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nishant Bhagat - निशांत भगत:

Shortcuts

Share