Bhimshakti Goa

Bhimshakti Goa बहूजनांच्या न्याय व हक्कांसाठी धर्मनिरपक्षपणे लढणारी सामाजीक संघटना भीमशक्ती - संस्थापक अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे
(2)

Happy Marriage Anniversary Saheb & Madam
10/05/2026

Happy Marriage Anniversary Saheb & Madam

आखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी कमिटीचे सदस्य, भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मा.खा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब आणि चेंबूर वार्ड क्र. १५० च्या माजी नगरसेविका मा.सौ. संगिताताई चंद्रकांतजी हंडोरे यांना मंगल परिणय दिनाच्या मनःपूर्वक, हार्दिक शुभेच्छा!

आपल्या समाजकार्याचा व राजकारणातील समर्पित प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच आपल्या सहजीवनातील सहकार्य आणि एकमेकांवरील प्रेम हे सर्वांसाठी आदर्श आहे!

आपल्या सहजीवनात सदैव प्रेम, आनंद, आरोग्य व उत्तम यश लाभो हीच तथागतचरणी प्रार्थना!

भीमशक्ती परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा मंगल शुभेच्छा!

Chandrakant Handore










#भी

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!ज्यांनी स्वाभिमानासाठी मुठभर मावळ्यांसह मोठ्या सम्राटांशी लढा दिला, अ...
09/05/2026

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ज्यांनी स्वाभिमानासाठी मुठभर मावळ्यांसह मोठ्या सम्राटांशी लढा दिला, अशा अद्वितीय पराक्रमी योद्ध्याला कोटी कोटी वंदन!
त्यांचा शौर्य, त्याग आणि स्वाभिमान आजही आपल्याला प्रेरणा देतो.

जय महाराणा!
जय मेवाड!
जय स्वाभिमान!

#महाराणा_प्रताप #जयंती_निमित्त_अभिवादन #देशाभिमान #इतिहास_गौरव #महाराणा_म्हणजे_शौर्य

मानवतेची सेवा करणाऱ्या आणि  संकटाच्या वेळी मदतीचा हात देणाऱ्या सर्व रेड क्रॉस स्वयंसेवकांना जागतिक रेड क्रॉस दिनाच्या मन...
08/05/2026

मानवतेची सेवा करणाऱ्या आणि संकटाच्या वेळी मदतीचा हात देणाऱ्या सर्व रेड क्रॉस स्वयंसेवकांना जागतिक रेड क्रॉस दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

थोर साहित्यकार, नोबल पारितोषिक विजेते, भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....
07/05/2026

थोर साहित्यकार, नोबल पारितोषिक विजेते, भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

“वंचितांचा राजा, न्यायाचा दीपस्तंभ!”आज स्मृतीदिन आहे त्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा — ज्यांनी आपल्या राजसत्तेचा उप...
06/05/2026

“वंचितांचा राजा, न्यायाचा दीपस्तंभ!”

आज स्मृतीदिन आहे त्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा — ज्यांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग समाजातील शेवटच्या माणसासाठी केला. जाती-अंताच्या अंधारात ते एक प्रकाशवाटा होते.

शिक्षण, आरक्षण, सामाजिक समता या तत्वांचा पाया घालणारे शाहू महाराज हे भारतीय सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे वंचित, शोषित घटकांना नवसंजीवनी मिळाली.

आजही तेच विचार, तीच तळमळ आपल्याला संघर्षासाठी बळ देतात. त्यांच्या स्मृतीस हेच सच्चं अभिवादन की आपणही त्यांच्या विचारांची ज्योत पेटवत ठेवू!

“शाहू महाराज हे एक व्यक्ती नव्हते, ते एक संकल्प होते — समतेचा, शिक्षणाचा, आणि स्वाभिमानाचा!”

जय शाहू! जय भीम!

#शाहूमहाराज #आरक्षणाचेजनक #सामाजिकन्याय

“स्वतंत्र पत्रकारिता — लोकशाहीचा श्वास!”आज जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन!हा दिवस फक्त पत्रकारांचा नाही, तर प्रत्येक ...
03/05/2026

“स्वतंत्र पत्रकारिता — लोकशाहीचा श्वास!”

आज जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन!
हा दिवस फक्त पत्रकारांचा नाही, तर प्रत्येक नागरिकाचा आहे.
स्वतंत्र पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ — जो खऱ्या प्रश्नांना वाचा फोडतो, दबलेल्या आवाजाला शब्द देतो, आणि सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरवतो.

आजच्या काळात खरं बोलणं धाडसाचं झालंय…
जे पत्रकार सत्य बोलतात, त्यांना गप्प करण्याचे प्रयत्न होत आहेत.
म्हणूनच, पत्रकारिता स्वतंत्र राहणं ही तुमच्या-आमच्या भविष्याची हमी आहे!

जोपर्यंत पत्रकार जिवंत आहेत, तोपर्यंत सत्यही जिवंत राहील.



#पत्रकारिता_स्वातंत्र्य
#लोकशाहीचा_चौथा_स्तंभ

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!“घाम गाळणाऱ्यांना सलाम!”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ संविधान दिलं नाही,तर कामगार हक्क...
01/05/2026

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“घाम गाळणाऱ्यांना सलाम!”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ संविधान दिलं नाही,
तर कामगार हक्कांचंही भक्कम संरक्षण केलं!
८ तासांचा कामाचा दिवस, सुट्ट्या, वेतन –
हे सर्व त्यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालं.

आजचा दिवस आहे त्या हातांचा सन्मान करण्याचा
जे हात उंच इमारती उभ्या करतात,
पण स्वतःसाठी निवारा मिळत नाही…

कामगार म्हणजे केवळ मजूर नव्हे,
तर या जगाचा खरा शिल्पकार आहे!

या कामगार दिनी एक वचन द्या –
की आपण त्यांचा सन्मान करू,
त्यांचे हक्क जपू,
आणि बाबासाहेबांच्या विचारांची उजळणी करू!

जय भीम! जय कामगार!
कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#कामगारदिन #घामगाळणाऱ्यांचा_सन्मान

जगाला अहिंसा, शांतता व समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा
30/04/2026

जगाला अहिंसा, शांतता व समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन !ग्रामविकास, स्वच्छता, राष्ट्रभक्ती आणि समाजप्रबोधन यासाठी आयुष्य...
30/04/2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

ग्रामविकास, स्वच्छता, राष्ट्रभक्ती आणि समाजप्रबोधन यासाठी आयुष्य वेचणारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांच्या कीर्तनातून आणि भजनातून समाजाला जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले.

"स्वच्छ गाव, सुंदर गाव" आणि "ग्रामगीता" यांसारख्या विचारांमधून त्यांनी आदर्श ग्रामविकासाचा मार्ग दाखवला.

त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपणही समाजहितासाठी कार्य करूया, हीच खरी त्यांना अभिवादनाची भावना.

#लोकसभा

Address

Panjim

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimshakti Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share