Ravsaheb Mokashe Offical

Ravsaheb Mokashe Offical ग्रामपंचायत सदस्य : कान्हेगाव
संस्थापक अध्यक्ष : रावसाहेब मोकाशे मित्र मंडळ

विनम्र अभिवादन!! आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समिती व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृति...
01/08/2025

विनम्र अभिवादन!!
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समिती व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह कानेगाव येथे मोठ्या उत्साहाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी माझ्या हस्ते समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले !!!

 satputeवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
11/07/2025

satputeवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

11/07/2025

आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहिचे वाकून!! #
मा आ राजेश विटेकर यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचा परिणाम सेलू तालुक्यात सामान्य माणसाने नियमांचे उल्लंघन करून काढलेल्या लेबर कार्ड धारक व्यक्तीवर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल!!

ग्रामपंचायत सदस्य : कान्हेगाव
संस्थापक अध्यक्ष : रावसाहेब मोकाशे मित्र मंडळ

04/07/2025

#शक्तीपीठ महामार्ग, #शेतकऱ्यांच्या पिकविम्यावर गप्प राहणारे #आमदार #टक्केवारी साठी बोलू लागले!

पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत परभणी जिल्ह्यात स्थानिक अधिकाऱ्यांनी दलालांशी संगनमत करून अनोंदणीकृत बांधकाम ठेकेदारांचे बोगस कागदपत्र मान्य करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, २०२३ आणि २०२४ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बोगस पीकविमा काढण्यात आला. हा पीकविमा घोटाळा कोणी केला हे सर्व जनतेला सर्वश्रुत आहे. माञ, त्यावर आपण एक शब्दही बोलला नाहीत.

आमदार साहेब, जनतेला सगळ्यातलं सगळं कळतं!
#परभणी #पीकविमा #घोटाळा #बांधकाम_कामगार_घोटाळा #शक्तीपीठ_महामार्ग
#आमदार #पाथरी_विधानसभा

#पावसाळी_अधिवेशन #कामगार_हक्क #विधानसभा_मागणी

#परभणी #घोटाळा #बोगसकामगारनोंदणी #कामगारकल्याण
Dr Rahul Patil - राहुल पाटील परभणी लोकसभा आपली परभणी- Apli Parbhani Babajani Durrani Uddhav Thackeray Ajit Pawar Sanjay Raut Sanjay Jadhav Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis सोनपेठ Meghna Sakore Bordikar Collector & District Magistrate Parbhani परभणी लोकसभा

इतिहास माहिती नसणाऱ्यांना आठवण करुन द्यावी लागते....कान्हेगाव-शेळगाव रस्त्याच्या कामाच्या संदर्भात सोमवारी (दि.१६) परभणी...
24/06/2025

इतिहास माहिती नसणाऱ्यांना आठवण करुन द्यावी लागते....

कान्हेगाव-शेळगाव रस्त्याच्या कामाच्या संदर्भात सोमवारी (दि.१६) परभणीच्या आदरणीय पालकमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेतली होती. याबाबत ताईंनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांस सुचना केल्या होत्या. त्यानुसार मंगळ‌वारी (दि.१७) लगेच कर्मचाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली. आजपासून मुरुम टाकण्याच्या कामाला सुरुवातही झाली. त्याबद्दल आदरणीय पालकमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचे कान्हेगावकरांच्या वतीने मनापासून आभार.

थोडी इतिहासाची आठ‌वण...
कान्हेगाव-शेळगाव या पांदण रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे. यामुळे गावातील व वस्तीवरील नागरिकांना दळणवळण सोयीचे व्हावे, अशी मागणी गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांची खूप दिवसांपासून होती. आमची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आल्यानंतर याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. त्यावर बांधकाम विभागाने
या पांदण रस्त्याच्या डागडुजी आणि मजबुतीकरणासाठी २०१३-१४ च्या आर्थिक वर्षांत निधी मंजूर केला. निदान मजबुतीकरणाने का होईना, या रस्त्याच्या कामाला आमच्या कार्यकाळात सुरुवात झाली, याचे मनोमन समाधान होते. मात्र, तत्कालीन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील राजकीय पदाधिकाऱ्यांनी आर्थिक घोटाळा करत हे काम अर्धवट करत परस्पर निधी पळवला. तसेच ठेकेदाराला काम नको करु, म्हणून काहींनी विरोध करत धमक्याही दिल्या. त्यामुळे हे मजबुतीकरणाचे काम अर्धवट राहिले. तसेच या मजबुतीकरणात झालेल्या निकृष्ट कामाबाबत आणि आर्थिक घोटाळ्याबाबत मी स्वत: आवाजही उठवला होता. याचा आपल्या गावातील काही सन्माननीय व्यक्तींना विसर पडला आहे. त्याची आजच्या मितीला आठवण करुन देणे खूप गरजेचे वाटले, म्हणून हा किस्सा सांगण्याचा प्रपंच.

आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास होत होता. त्यावेळीही पोकलेनने रस्त्याची डागडुजी केली होती. कोणी कितीही आटापिटा केला तरीही नागरिकांच्या चांगल्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव तयार असतोच असतो.
-
आपलाच....
श्री. रावसाहेव मोकाशे
ग्रामपंचायत सदस्य, कान्हेगाव

#आमचं_काम_बोलतं
#आम्ही_कान्हेगावकर
सोनपेठ

आम्ही सत्तेत नसलो तरीही विकासकामांना प्राधान्य देतो! शेळगाव-कान्हेगाव रस्त्याच्या कामाचे उ‌द्घाटन दि.18/08/2024 रोजी झाल...
17/06/2025

आम्ही सत्तेत नसलो तरीही विकासकामांना प्राधान्य देतो!

शेळगाव-कान्हेगाव रस्त्याच्या कामाचे उ‌द्घाटन दि.18/08/2024 रोजी झाले आहे. मात्र, अद्याप या कामास मजबुतीकरणाची कुठलीही हालचाल होत नाही. या रस्त्यावर कान्हेगाव पासुन दिड किलोमीटर अंतराव नवीन वस्ती आहे तेथील लोकसंख्या अंदाजे दीड हजार आहे. या लोकांना व गावातील शेतकऱ्यांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता प्रामुख्याने आहे तरी संबधित गुत्तेदार याला वारंवार विनंती करूनही मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात येत नाही. याबाबत रावसाहेब मोकाशे यांनी गावकऱ्यांच्या वतीने परभणीच्या पालकमंत्री मा. आमदार मेघनाताई बोर्डीकर यांना निवेदन देऊन विनंती केली. पालकमंत्र्यांनी तात्काळ संबंधित विभागाला तसेच त्या गुत्तेदारास मुरूम व मजबुतीकरणाचे काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रावसाहेब मोकाशे, धीरज मोकाशे, संदीप सातपुते, मुंजा गोरे आदी उपस्थित होते.

#आमचं_काम_बोलतं
#आम्ही_कान्हेगावकर

#शेळगाव_कान्हेगाव_रस्ता

आमचे मित्र कान्हेगाव ग्रामपंचायतचे सदस्य श्री गणेश भैय्या मोकाशे व श्री ऋतुराज भैय्या मोकाशे आपणांस वाढदिवसा निमित्त हार...
13/06/2025

आमचे मित्र कान्हेगाव ग्रामपंचायतचे सदस्य श्री गणेश भैय्या मोकाशे व श्री ऋतुराज भैय्या मोकाशे आपणांस वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणास दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

माझा राजा "छत्रपती" झाला!शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३५१ कुटुंबाना देणार वृक्ष भेट!श्रीमंतयोगी, बहुजनप्रतिपालक, छत्रपती श...
06/06/2025

माझा राजा "छत्रपती" झाला!

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३५१ कुटुंबाना देणार वृक्ष भेट!

श्रीमंतयोगी, बहुजनप्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा कान्हेगाव येथे वृक्ष लागवड करून साजरा केला. गावातील दत्तराव कोरडे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी मुबलक प्राणवायू देणाऱ्या "कदंब" या वृक्षाची लागवड केली. या सोहळ्याला गावातील सर्व समाजातील शिवप्रेमींची उपस्थितीही लक्षणीय होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचा कारभार हाकला. महाराजांनी रयत सुखी राहावी, यासाठी जल, जमीन, जंगले जपली. वृक्षसंवर्धन करत ती वाढवली. मात्र, आता प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणावर मात करायची असेल तर हिरवाई वाढून जास्तीत जास्त प्राणवायू निर्माण करणे हे गरजेचे बनले आहे. पर्यावरण हितासाठी रावसाहेब मोकाशे मित्र मंडळाच्या वतीने 'वृक्षदान' चळवळीला सुरुवात केली. याला गावातील तरुणाई आणि जेष्ठांचीही चांगली साथ मिळत आहे.

या वृक्षदान चळवळीत गावातील ३५१ कुटुंबांना "एक फळझाड व दोन सावलीची झाडे" भेट देणार आहोत. उपक्रमाची सुरुवात शुक्रवारपासून वृक्षलागवड करून प्राथमिक स्वरूपात करण्यात आली. यावेळी श्री. हेमंतराव मोकाशे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष (चेअरमन) श्री. लक्ष्मणराव कोरडे, श्री. रामचंद्र (काका) मोकाशे, श्री. तातेराव मोकाशे, शौकत सैलानी, मोईन निसार सर, श्री. बालासाहेब भंडारे, श्री. मेघराज मोकाशे, श्री. नरहरी दुगाने, संदीप सातपुते, संतोष भंडारे, परमेश्वर दुगाणे, राजू राठोड, विशाल मोकाशे, ऋषी देशमुख, रामदास खरात, बबलू साळवे, चक्रधर घनघाव उपस्थित होते.

--
आपलाच,
रावसाहेब मोकाशे,
ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष, रावसाहेब मोकाशे मित्र मंडळ

#छत्रपतीशिवराय
#शिवराज्याभिषेक #वृक्षारोपण #शिवराय #६जून #वृक्षदान

जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन यावर्षी साजरा होत आहे. या आपल्या रयतेच्या राज्याच्या शि...
05/06/2025

जय शिवराय,

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन यावर्षी साजरा होत आहे. या आपल्या रयतेच्या राज्याच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कान्हेगावमध्ये ३५१ वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येकी एक झाड लाऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी आम्ही घेत आहोत. रावसाहेब मोकाशे मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. ६) सकाळीच वृक्षारोपण करुन या मोहिमेचा शुभारंभ करत आहोत. तरी या निसर्गसंवर्धनाच्या उपक्रमाला आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

टीप: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रत्येकाला एक झाड मोफत देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
--
तातेराव मोकाशे (मुकादम) : +91 86005 45807
नवनाथ क्षिरसागर : +91 90757 36679
बबलू साळवे : +91 88477 12476
सुर्यकांत दुगाने: +91 92846 90519
तुकाराम जाधव : +91 93077 34101
सैलानी : +91 93594 00347

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या रक्तदान उपक्रमाची विविध माध्यमांनी घेतलेली दखल! धन्यव...
03/06/2025

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या रक्तदान उपक्रमाची विविध माध्यमांनी घेतलेली दखल!

धन्यवाद !
दै. लोकमत
दै. सकाळ
दै. पुण्यनगरी
दै. लोकसंपर्क
#अहिल्याबाई_होळकर_जयंती

माझी माणसं लाखमोलाची... पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव जगभर साजरा होत आहे. त्या पार्श्...
31/05/2025

माझी माणसं लाखमोलाची...

पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव जगभर साजरा होत आहे. त्या पार्श्वभुमीवर आपणही गावात काहीतरी उपक्रम राबवुयात, असा विचार आला. माता अहिल्याबाईंनी त्याग आणि समर्पण आणि सर्व समाजाला एकत्र घेत आपला राज्यकारभार हाकला. त्यांच्या याचं त्याग आणि समर्पणाच्या वृत्तीला अनुरुप राहून यावर्षीची जयंती साजरी करण्याचे ठरले. सध्या महाराष्ट्रात असलेला रक्ताचा तुटवडा पाहता, रक्तदान करुनच माता अहिलेल्या अभिवादन करुयात, असा सर्वांचा सूर आला. त्याला सर्वांनी मोठ्या मनाने अनुमोदन दिले. बघता-बघता रक्तदानाची तारीख-वार ठरला. योगायोग म्हणजे लागोलाग परभणीच्या जिल्हा शासकीय महाविद्यालयाची रक्तपेढीही मिळाली. इरेला पेटलेली गावातील तरुणाई अगदी झाडून कामाला लागली. अगदी आदल्या दिवशीच्या तयारीपासून ते शेवटच्या रक्तदात्यांपर्यंत प्रत्येकजण झटत होता. त्यात प्रत्येकाचा भाव हा समर्पण आणि कामाचा होता. यात अगदी गावातील प्रत्येकजण राबत होता. उच्च-नीच भेद न बघता प्रत्येकजन झटत होता. हे पाहून मी उपकृत झालो. गावातील सगळी तरुणाई आणि मायबाप जनता म्हणजे माझे कुटुंब आहे. त्यामुळे घरच्या माणसांचे आभार मानणार नाही. तुम्ही सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल खरंच आज धन्य झालो. माझ्या आयुष्यातील ही लाखमोलाची माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे, हे आज पुन्हा नव्याने सिध्द झालं. आता अजून जबाबदारी वाढली आहे.
-
तुमचा सर्वांचा
रावसाहेब मोकाशे,
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष, रावसाहेब मोकाशे मित्र मंडळ, कान्हेगाव

#कामाला_जोड_माणुसकीची #अहिल्याबाई_होळकर_जयंती #रक्तदान_श्रेष्ठ
आहिल्यादेवी होळकर धनगरसमाज कान्हेगाव

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कान्हेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे ...
30/05/2025

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कान्हेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे आवाहन करण्यासाठी कान्हेगाव वस्तीवर नागरिकांशी संवाद साधला. या उपक्रमाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून नागरिकही उत्स्फूर्तपणे दाद देत आहेत.
#अहिल्याबाई_होळकर #रक्तदान_श्रेष्ठ

#कामाला_जोड_माणुसकीची!

Address

Parbhani
Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ravsaheb Mokashe Offical posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share