BJP 4 Parbhani Mahanagar

BJP 4 Parbhani Mahanagar Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Parbhani Mahanagar Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

08/08/2026

शत्रूला इशारा, देशवासीयांना अभिमान!
अग्नी-४’ मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण हे भारताच्या आत्मनिर्भरता, युद्धसज्जता आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाचे भक्कम प्रतीक आहे.
४,००० किमी मारक क्षमता, प्रगत नेव्हिगेशन आणि पारंपरिक तसेच न्यूक्लिअर पेलोड वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-४’चे यशस्वी प्रक्षेपण भारताच्या सामर्थ्याची साक्ष देते.

9 ते 17 ऑगस्ट 2026 दरम्यान हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊया आणि आपल्या राष्ट्रध्वजाला प्रत्येक घरावर, प्रत्येक मनात आ...
08/08/2026

9 ते 17 ऑगस्ट 2026 दरम्यान हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊया आणि आपल्या राष्ट्रध्वजाला प्रत्येक घरावर, प्रत्येक मनात आणि प्रत्येक हृदयात स्थान देऊया.

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमर हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना हीच खरी आदरांजली.

तिरंग्यासोबत सेल्फी काढा, harghartiranga.com वर अपलोड करा आणि या राष्ट्रीय अभियानाचा अभिमानाने भाग बना.

07/08/2026

राष्ट्रीय हँडलूम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी आंदोलनाची आठवण करून देणारा हा दिवस.

देशातील लाखो विणकर कुटुंबे आजही स्वदेशी परंपरा जपत आहेत. त्यांच्या कष्टाचे, कौशल्याचे आणि सामर्थ्याचे मोल जगाला समजू द्या , असे आवाहन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला केले.

आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल, तर आपल्या विणकरांना प्रोत्साहन द्या, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा आणि हँडलूमला प्राधान्य द्या.

या हँडलूम डेच्या निमित्ताने हँडलूम वस्तू खरेदी करा, त्याचा व्हिडिओ पोस्ट करा आणि आपल्या विणकर बांधवांना पाठिंबा द्या.

२०१४ नंतर काश्मीर बदलला आहे… आणि त्यामुळेच या बदलाबरोबरच इतिहास जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.नवीन पिढीने फक्त हेडल...
06/08/2026

२०१४ नंतर काश्मीर बदलला आहे… आणि त्यामुळेच या बदलाबरोबरच इतिहास जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

नवीन पिढीने फक्त हेडलाईन्स नाही, तर इतिहास, संविधान, विकास आणि सामाजिक बदल यांची माहितीही समजून घेतली पाहिजे. माहितीपूर्ण चर्चा हीच मजबूत लोकशाहीची ओळख आहे.

05/08/2026

कलम ३७० हटवून 'एक देश, एक संविधान' हे ध्येय पूर्ण करण्यापासून ते भारताला डिजिटल महासत्तेच्या शिखरावर नेण्यापर्यंत... भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंस्कृतीतून साकारलेल्या नव्या भारताचा हा प्रवास.

05/08/2026

५०० वर्षांचं स्वप्न, ६ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास!

04/08/2026

शिक्षण विश्वातील एक दूरदर्शी आधारवड हरपला

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन ही अत्यंत दु:खद घटना आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.

शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी गुरुकिल्ली आहे, या भावनेतून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत दर्जेदार शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षणाची ज्ञानगंगा लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेला हा वारसा आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सामील आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

भावपूर्ण श्रद्धांजली
ॐ शांती

04/08/2026

गाडीचे मायलेज फक्त इंधनावर ठरत नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मायलेजवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो: गाडी चालवण्याची पद्धत, ट्रॅफिकमधील वेळ, टायरमधील हवेचा योग्य दाब, AC चा वापर, इंजिनचे मेंटेनन्स, वाहनाची स्थिती आणि ड्रायव्हिंग कंडिशन्स.
म्हणूनच मायलेजमध्ये बदल दिसला तर त्यासाठी केवळ E20 ला जबाबदार धरणे योग्य नाही. कोणत्याही निष्कर्षापूर्वी सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. तांत्रिक माहिती, प्रत्यक्ष अनुभव आणि फॅक्ट्सवर विश्वास ठेवा, अफवांवर नाही..

Address

Parbhani

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Parbhani Mahanagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share