Nationalist Congress Party

Nationalist Congress Party शहराध्यक्ष:- मा.योगेश मंगलसेन बहल
मध्यवर्ती पक्ष कार्यालय, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

27/08/2026

या माझ्या हातावर बांधलेल्या राख्यांची शपथ घेऊन चालतो राज्यातल्या याच योजनेमध्ये बसणाऱ्या एकाही माय माऊलीला बहिणीला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. .. विविध विकासाचे कार्यक्रम करून आम्हाला या माध्यमातून सांगायचं... हा शब्द मी तुम्हाला देतो...

26/08/2026

नमस्कार... 🙏🏻

जुलूस-ए-मोहम्मदिया कमिटी ट्रस्ट, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र व मंगलमय सोहळ्यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते.

हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला प्रेम, बंधुभाव, शांतता, मानवता आणि एकतेचा संदेश समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि शिकवणीचा प्रसार करणारे असे धार्मिक व सामाजिक उपक्रम समाजामध्ये सौहार्द, परस्पर स्नेह आणि बंधुभाव वाढविण्यास निश्चितच हातभार लावतात.

जुलूस-ए-मोहम्मदिया कमिटी ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी या कार्यक्रमाचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे. हा पवित्र सोहळा उत्साहात, शांततेत आणि आनंदात पार पडावा, तसेच या निमित्ताने समाजामध्ये प्रेम, शांतता, एकता व सद्भावनेची भावना अधिक दृढ व्हावी, ही मनःपूर्वक सदिच्छा.

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..!

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात  भारतीय काँग्रेस पक्षाच्य...
05/08/2026

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याचा तसेच पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे, त्वरित हटवून महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनात दरम्यान पक्षाकडून करण्यात आली.
याबद्दल बोलताना शहराध्यक्ष म्हणाले, स्वर्गीय अजितदादांच्या आकाली जाण्याने जे दुःख वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोसळले असताना देखील, केवळ या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्या सक्रिय झाल्या. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने आज वापरलेली “गुंगी गुडिया” ही भाषा केवळ एका कर्तृत्वान महिला नेत्याचा अपमान नाही, तर प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानाचा अपमान आहे. ज्या पक्षाच्या इतिहासात इंदिरा गांधींसारख्या मोठ्या नेत्या अशाच शब्दांनी हिणवल्या गेल्या, त्याच पक्षाने आज पुन्हा तीच चूक केली आहे. महिला सन्मानाच्या घोषणा देण्यापेक्षा स्वतःच्या शब्दांत आणि कृतीमधे तो सन्मान दिसला पाहिजे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान करणारी भाषा कधीच स्वीकारली जाणार नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण महिलांचा अपमान कधीच असू शकत नाही. महाराष्ट्र काँग्रेसने याबद्दल जाहीर माफी मागावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्यावतीने शहराध्यक्ष बहल यांनी केली.
यावेळी पक्षाचे आजी माजी नगरसेवक, सेल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

. 🛑.... जाहीर निषेध आंदोलन....🛑    सर्व आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक- नगरसेविका, सेल अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते, य...
04/08/2026

. 🛑.... जाहीर निषेध आंदोलन....🛑

सर्व आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक- नगरसेविका, सेल अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.सुनेत्रावहिनी पवार यांच्या बद्दल "आक्षेपार्ह विधान" केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात उद्या, बुधवार, दिनांक, ०५ ऑगस्ट, २०२६* रोजी "जाहीर निषेध आंदोलन" आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे.

स्थळ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई पुणे हायवे, पिंपरी.

वेळ:- सकाळी, ठीक ११:३० वाजता.
⏰ निमंत्रक⏰
श्री.योगेश मंगलसेन बहल
शहराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

श्री.भाऊसाहेब सोपानराव भोईर
विरोधी पक्षनेते
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

02/08/2026

सर्वांना मैत्री दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

30/07/2026

महाराष्ट्राच्या जनतेला आज ज्या क्षणाची कमी आज सर्वात जास्त भासणार तो क्षण ..!

30/07/2026

मा.पार्थदादा पवार यांचा साखरपुडा संपन्न...

Parth Pawar Engagement

Address

Pimpri Chinchwad
Pimpri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nationalist Congress Party posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share