Mi Punekar - मी पुणेकर

Mi Punekar - मी पुणेकर News • Events • Lifestyle • Places • Food • Updates
(5)

पुण्यात ‘केएफसी’च्या बावधन सेंटरवर एफडीएची कारवाई.FSSAI परवान्याविना कोल्ड स्टोरेज, दूषित पाणी आणि अस्वच्छता आढळल्याने ब...
21/08/2026

पुण्यात ‘केएफसी’च्या बावधन सेंटरवर एफडीएची कारवाई.

FSSAI परवान्याविना कोल्ड स्टोरेज, दूषित पाणी आणि अस्वच्छता आढळल्याने बावधनमधील KFC सेंटर बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? 🏔️आता गडावर जाण्यासाठी ‘किल्ले सिंहगड’ ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग/पूर्वनोंदणी करणे बंधनकारक ...
21/08/2026

सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? 🏔️

आता गडावर जाण्यासाठी ‘किल्ले सिंहगड’ ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग/पूर्वनोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवली जाणार असून, AI कॅमेरे आणि डिजिटल सिस्टीमद्वारे गडावर नजर ठेवली जाणार आहे.

गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

तुम्हाला हा नियम योग्य वाटतो का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. 👇

#सिंहगड #पुणे

21/08/2026

निलंबनाची नोटीस आल्यानंतर अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांची प्रतिक्रिया.
न्याय मिळालाच पाहिजे.

#अंगणवाडी

21/08/2026

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमध्ये (CAR) झांबोये गावाजवळ सोन्याची खाण अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 100 हून अधिक खाणकामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. काही कामगार अद्याप बेपत्ता आहेत.

कॅमेरूनच्या सीमेजवळ घडलेल्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तुकाराम मुंढे Effect 🔥
21/08/2026

तुकाराम मुंढे Effect 🔥

🍬 साखरेच्या दरात पुन्हा मोठी वाढ! सणासुदीत गोडवा महागणार?गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, ...
20/08/2026

🍬 साखरेच्या दरात पुन्हा मोठी वाढ! सणासुदीत गोडवा महागणार?

गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, किरकोळ बाजारात 61 रुपये किलो असलेली साखर आता 65 रुपये किलोच्या पुढे पोहोचली आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या दरवाढीमागे इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वाढता वापर हे एक कारण असल्याची चर्चा आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवून कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, ऊसाचा काही भाग साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळल्यास बाजारात उपलब्ध साखरेचे प्रमाण कमी होऊन दरांवर दबाव निर्माण होऊ शकतो.

📌 मुद्दा फक्त साखरेच्या दराचा नाही!
भारताला एकीकडे ऊर्जा सुरक्षा मजबूत करायची आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत साखरेचा पुरेसा पुरवठा आणि अन्नसुरक्षाही सुनिश्चित करावी लागणार आहे.

👉 त्यामुळे आगामी काळात सरकार साखरेचा पुरवठा, साठा आणि इथेनॉल उत्पादन यांच्यात कसा समतोल साधते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

तुमच्या मते इथेनॉल उत्पादन वाढवताना साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने काय करायला हवे? कमेंटमध्ये तुमचे मत सांगा. 👇

20/08/2026

अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी व्हिडिओद्वारे निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराबाबत आवाज उठवत तुकाराम मुंढे यांच्याकडे थेट दाद मागत प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शासनाकडून त्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुलांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेविकेवरच कारवाईची नोटीस का? या प्रकरणामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमकं सत्य काय? प्रशासन यावर काय भूमिका घेणार?

#अंगणवाडी

PM CARES Fund च्या 2024-25 च्या ऑडिट अहवालातील आकडेवारी चर्चेत आली आहे. 31 मार्च 2025 अखेर फंडाची शिल्लक ₹8,452.07 कोटी,...
20/08/2026

PM CARES Fund च्या 2024-25 च्या ऑडिट अहवालातील आकडेवारी चर्चेत आली आहे. 31 मार्च 2025 अखेर फंडाची शिल्लक ₹8,452.07 कोटी, Fixed Deposits मधून ₹469.37 कोटी व्याज, तर वर्षभरातील खर्च केवळ ₹87.85 लाख नोंदवला गेला आहे. त्यामुळे मोठी शिल्लक आणि अत्यल्प खर्च यावरून सार्वजनिक चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

तुमच्या मते, एवढ्या मोठ्या निधीचा वापर अधिक प्रमाणात करायला हवा का? तुमचे मत Comment मध्ये सांगा.

भारतातल्या Popular Careers ची Ground Reality
20/08/2026

भारतातल्या Popular Careers ची Ground Reality

पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय! 🚦रस्त्यावर वाहनचालकांना अडवून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याची पद्...
19/08/2026

पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय! 🚦

रस्त्यावर वाहनचालकांना अडवून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याची पद्धत तूर्तास थांबवण्यात आली आहे. आता वाहतूक पोलिसांचा भर केवळ वाहतूक सुरळीत करण्यावर राहणार आहे. हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला असून, यामुळे कोंडी कमी होऊन पुणेकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mi Punekar - मी पुणेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mi Punekar - मी पुणेकर:

Shortcuts

Share